Wednesday, December 16, 2020

साधे विवाह समारंभ काळाची गरज


 साधे विवाह समारंभ  काळाची गरज...



  समाजाने विवाह समारंभाचे रुपांतर विवाह संस्कारा मध्ये केले पाहिजे.

 करोनामुळे गर्दी नको म्हणून शासनाने विवाह, कार्यक्रमातील उपस्थितीला मर्यादा घातल्याने ही बाब आता प्रकर्षाने  लक्षात आली  आहे.

 आपण विनाकारण लाखो रूपयांची उधळपट्टी करून कर्जबाजारी होत आहोत .आतातरी आपण बदलले पाहिजे. नाही तर काळ आपणांस माफ करणार नाही.


१) शेतीचे उत्पन्न कमी होत आहे.


२) शेती मालाला भाव नाही.


३) नोकऱ्या सरकारी राहिल्या नाहीत.


४) खाजगी नोकरीत शाश्वती नाही.


५) मुलीच्या लग्नाला १०० रु खर्च येत असेल तर मुलालाही ८० रु खर्च येतो.


६) कर्जात जन्मलो, कर्जात वाढलो व कर्जात मरत आमच्या काही पिढ्या गेल्या.आता तरी डोळे उघडले पाहिजेत.


७) विवाह हा सोहळा नाही तर तो ' संस्कार ' आहे .१६ संस्कारातील एक संस्कार समजला पाहिजे.


८)  कितीही मोठं लग्न केलं तरी लोक विसरून जातात.


९) आपण शेती विकून गुंठ्यावर आलो, तर व्यापारी एका दुकानाचे चार दुकाने करत आहे. व्यापारीवर्गाला नाव ठेवण्यापेक्षा त्यांचे अर्थशास्त्र समजून घेतले पाहिजे.


१० ) इर्षा नको तर सुदृढ स्पर्धा असली पाहिजे.

 

११) भाऊ बंदकीतील जीवघेणी स्पर्धा कुठंच नको. विवाह प्रसंगी तर नकोच नको.


१२ ) वर-वधू यांना नेहमीच उपयोगी पडणारा पोशाख घेतला पाहिजे.


१३) वरमाईने सुध्दा रुसवे फुगवे करू नयेत. आपल्यालाही मुलगी आहे. सून उद्याची आपली काळजी घेणारी आपली मुलगीच आहे. ही भावना रुजली पाहिजे.


१४) जेवणावळी, मानपान वरील खर्च कमी करून वधू वरांच्या भावी प्रगतीला हातभार लावावा.

१५) संसारात कधीच उपयोगी न पडणारी भांडी / फर्नीचर तर नकोच.


१६) मेहंदी, वैदिक पध्दत, हळदीच्या कार्यक्रमात होणारी गर्दी टाळावी.स्वागत समारंभात साधेपणा आणावा.


१७) क्रिकेट ५ दिवसाचा, वन-डे वरुन २० - २० वर आला.तर आपण विवाह छोटेखानी / आटोपशीर करायला काय हरकत आहे ?


१८) मोजक्या लोकांत सगळ्या पाहुण्यांशी निवांत संवाद साधता येतो.


१९) कोरोनामुळे सर्व व्यावसायिकांनी त्यांचे भाव वाढवले आहेत.आपण मात्र बदल स्वीकारायला तयार नाही.


२०) आजची बचत उद्याची निर्मितीआहे बचतीला प्राधान्य दिले पाहिजे.*


२१) कोणत्याही जातीधर्मांतील चांगल्या गोष्टींचा स्विकार केलाच पाहिजे .*


२२) समाजातील उच्चपदस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे .(वकील,डाॅक्टर, प्राध्यापक , इंजिनियर सरकारी अधिकारी इ.) विवाह समारंभाबाबतीत काळाची गरज म्हणून आपण सर्वांनीच सुधारक होण्याची गरज आहे.त्यामध्ये आपल्या पुढील पिढ्यांचे उज्वल भविष्य दडले आहे. उच्चशिक्षित आणि सामान्य लोक यांच्यामधील दरी वाढत चालली आहे; समाजातील लोक आपणांस  आपले आदर्श मानतात. अशा वेळी सामाजिक सुधारणांचे नेतृत्व उच्च शिक्षितांनी केले पाहिजे.समाजाचे प्रबोधन करायला पाहिजे .*


 २३) कोणते तरी सरकार कायदा करेल आणि मग  बदल होतील हा पोकळ आशावाद आहे. कायद्याबरोबर प्रबोधन आणि जनजागृती करावी लागेल. यासाठी  समाजातील उच्चमध्यम व मध्यमवर्गिय यांना महत्त्वाची जबाबदारी पारपाडावी लागेल.*


 २४)  कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती एक संधी समजून समाज सूधारण्यासाठी सर्वांनी एक पाऊल पुढे टाकले पाहिजे.


चला तर मग सुधारणांची सुरुवात स्वतः पासून करुयात ! हळूहळू सर्व समाज बदलेल व एक दिवस समाजाची १००% प्रगती होईल !


👏👏👏👏👏👏

फक्त वाचू नका....!

विचारही करा....!


समाजातील प्रत्येक व्यक्ती पर्यंत हा मेसेज पोहचवा .....चला परिवर्तन घडवुया

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻



हाक तुमची......

     साथ आमची. ....


✊✊✊✊✊✊


सौजन्य:- भोई समाज युवा मंच महाराष्ट्र

Saturday, October 24, 2020

भोई समाज युवा मंच जिल्हाध्यक्ष प्रदीप भानारकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा


 प्रेस नोट.दि.22/10/2020,



एक अभिनव उपक्रम  भोई समाज युवा मंच यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रदिप नागोराव भनारकर,यांच्या  वाढदिवसा निमित्त भिक्षाधारी स्त्री शक्ती चा सन्मान !

 पांढरकवडा : दिनांक 22/10/20रोजी केळापुर मंदिरा समोर बसून भिक्षा मागून उपजीविका चालवणाऱ्या वृद्ध महिलांची ओटी भरून साडी चोळी व मास्क चे केले वाटप ऐका महिलेने केले  सामाजिक कार्यकर्ते प्रदिप नागोराव भनारकर जिल्हा अध्यक्ष भोई समाज युवा मंच यवतमाळ व ग्राहक प्रहार संघटनेचे तालुका प्रचार प्रमुख व युवा फाउंडेशन केळापूर चे अध्यक्ष सर्व सामान्य जनतेची बुलंद आवाज युवकांचे प्रेरणास्थान सामान्य परिवारातून सामाजिक क्षेत्रात  निस्वार्थपणे कार्य सक्रियतेने करत असून यांच्या वाढदिवसा निमित्त सर्व मित्र परिवार यांच्याकडून एक छोटासा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला आहे.  त्या निमित्य कार्यक्रम ग्राहक प्रहार संघटनेचे जिल्हा सचिव  प्रसाद नावलेकर अभय निकोडे बापू पारशिवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला . केळापुर येथील मित्र परिवार लोकमत चे वार्ताहर गणेश अनमुलवार ,रोशन मसराम ,विजय कोहचाडे ,सूरज पाटील, आकाश वहिले ,अजय शिवरकर ,आशु  चव्हाण ,अभी तोडसाम ,नितीन मडावी  ,उमरी येथील सहकारी  निलेश विभिडकर निरज गुरनुले प्रेम कोहळे संतोष पेंदोर हे उपस्थित  विश्वस्त मंडळाचे काशिनाथ शिंदे चे मौलाचे सहकार्य लाभले .  प्रसाद नावलेकर,  अभय नीकोडे,डॉ.निलेशजी परचाके,रामभाऊ जिड्डेवार, निलेश विभिडकर नीरज गुरूनले आदींनी प्रदीप भनारकरचा वाढदिवस आगळा वेगळा साजरा केल्याने परिसरात कौतुक केल्या जात आहे.

भोई समाज युवा मंच तर्फे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन💐💐💐💐

Wednesday, October 7, 2020

भोई समाज युवा मंच पारोळा तर्फे विविध मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन...



भोई समाज युवा मंच पारोळा तर्फे  आरक्षण व विविध मागण्यांसाठी तहसीलदार अनिल गवांदे यांना  निवेदन देण्यात आले.



निवेदन देताना जयेश भोई (भोई समाज युवा मंच जळगाव जिल्हा संघटक प्रमुख) मयुर भोई (भोई समाज युवा मंच तालुका अध्यक्ष) 

गौरव भोई ( भोई समाज युवा मंच तालुका सचिव)

  भोई समाज हा अत्यंत गरीब समाज असुन महाराष्ट्रातील समाजाची लोकसंख्या ४०लाखाच्या जवळपास आहे

समाजाला मुख्यप्रवाहात आणण्यासाठी भोई समाजाला  आरक्षण फार गरज आहे.

भोई समाजातील ९० %  लोक  पोटापाण्यासाठि  गावोगावी भटकंती करीत असता  आणि या समाजाला संविधान तरतूदीनुसार 

आरक्षणाचा सहारा  मिळाल्यास 

भोई समाजाला न्याय मिळु शकेल

१९७४ भोई समाजाला भटक्या विमुक्त जातीचे तुटपुंजे आरक्षण देण्यात आले परंतु त्यातही ३५ जातींचा समावेश करण्यात आला भोई समाज वर अन्याय झाला असुन या समाजाला मुख्यप्रवाहात येण्यासाठी आरक्षणाची  नितांत गरज आहे.तरी या मागण्या गांभिर्याने व विचार करावा.

प्रमुख मागण्या

१) महाराष्ट्रातील भोई समाजाला अनुसूचित जाती अथवा  जमातीच्या एस सी  किंवा एस टी च्या सवलती मिळाव्यात

२)तलाव ठेके फक्त भोई समाजालाच देण्यात यावे

३) महाराष्ट्रातील मत्स्योदयोग विकास मंडळाचे नाव मत्स्योसहार करावे.

४) भोई समाजाच्या गरीब विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्हा व तालुका स्तरावर शासकीय होस्टेलची  व्यवस्था करण्यात यावी. आणि सर्व विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळावी 

५) फ्रुटपथावर बसुन  चणे फुटाणे विकणारे समाज बांधवांना स्टॉल उपलब्ध करून द्यावे.

६) धरणामुळे डांगरवाडी धारक विस्थापित झाल्यामुळे त्यांना प्रकल्पग्रस्त  घोषित करुन शासनाकडून  उदरनिर्वाह करीता भुमीहीन प्रमाणे कमीत कमी ५ एकर सरकारी जमीन द्यावी 

७) भोई समाजाला मुख्यप्रवाहात आणण्यासाठी उद्योग व्यवसायात  कर्ज व सबसिडीच्या योजना  आणाव्यात.

८) भोई समाजातील मुलींना १० वी पर्यंत शिक्षणाचा मोफत लाभ मिळावा  ....

उपस्थित .किरण भोई . सचिन भोई. सागर भोई. नंदकिशोर भोई.प्रविण भोई. चेतन भोई .विशाल भोई . विनायक भोई विशाल प्रकाश भोई रवि भोई हिलाल भोई कोमल पाटील गणेश बारी अश्विन चौधरी योगेश चौधरी .व भोई समाज युवा मंच पारोळा तालुका व जळगाव जिल्हा संघटना पदाधिकारी

हाक तुमची ✊✊✊

साथ आमची🤝🤝🤝

भोई समाज युवा मंच महाराष्ट्र

Thursday, September 17, 2020

भोई समाज युवा मंचच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

 

भोई समाज युवा मंच व युवा फाउंडेशन  केळापूर तर्फे 

रक्तदान शिबिर संपन्न.......


प्रेस नोट.दि.15/09/2020,



*युवा फाउंडेशन व भोई समाज युवा मंच* च्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न 


केळापूर  जि.यवतमाळ येथे श्री जगदंबा संस्थान इथे रक्तदान शिबीर संपन्न झाले.  अनेक रुग्णांना रक्ताची गरज भासते नेहमीच सामाजिक चळवळीत *युवा फाउंडेशन व भोई समाज युवा मंच* अशा संकट काळी पुढाकाराने सक्रीय असतात कोरोना संकटातही रक्तदान शिबिरराचे आयोजन करून आपली जबाबदारी स्वीकारली तसेच 18, वर्षावरील युवक-युवतींनी या सामाजिक उपक्रमात चांगल्या सहभाग घेतला 

*प्रितेश शामजी बोरेले  युवा फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष  प्रदीप नागोराव भनारकर जिल्हा अध्यक्ष भोई समाज युवा मंच यवतमाळ तथा अध्यक्ष युवा फाउंडेशन नटवर शर्मा व सामाजिक कार्यकर्ते

आकाश नैताम, शुभम मोहजे, विजय कोहचाडे, रोशन मसराम, अक्षय पेंदोर, रामदास पारशिवे, शखर बदामवार, यश खपरे, प्रसाद जायसवाल,जितेन्द्र गागशटीवार, उदय बनकर,प्रविण गिंगुले, अजय शिवरकर आकाश वहिले, केतन मालेकर, गौरव मीरासे, कैलास भनारकर, रोहित कामतवार, स्वप्नील पारशिवे, गणेश नान्हे, दिलीप शिवरकर, कार्तिक भनारकर,  सुनिल बावणे, प्रेमराज पारशिवे यांनी सर्वांनी सहकार्य केल्या बद्दल त्यांचे धन्यवाद ...

हाक तुमची.....

   साथ आमची......

भोई समाज युवा मंच महाराष्ट्र


Tuesday, July 7, 2020

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScdibXGOoN51lHyn8sjwKtp-kgceNM6lNJdi-cdbYcCspvJHQ/viewform?usp=sf_link
 🚩 *सर्व समाज बांधवांना जय भोईराज* 🚩
कळविण्यात अत्यंत आनंद होतोय की, भोईसमाज युवामंच शासनाच्या *वर्क फ्रॉम होम* या आदेशाचे पालन करत,

*न भूतो,न भविष्यती!*
😊😊😊😊😊 
*भोई समाजाच्या इतिहासात प्रथमच राज्यातील भोई समाज जनगणना ती पण घरी बसूनच एका क्लिकवर.......*
👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
तरुणांचा जोश आणि भोई समाज युवा मंच च्या सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याने *भोई समाज युवा मंच महाराष्ट्र* एक गरुडझेप घेण्याचा प्रयत्न करत आहे.गरज आहे सर्वांनी ह्या उपक्रमास निःसंकोचपणे साथ देण्याची..
वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून या लॉकडाउनमध्ये मिळत असलेला वेळ समाज कार्यासाठी सत्कर्मी लावावा यासाठी सर्व संघटना यांनी  सामाजिक सहकार्य करावे.अगदी शेवटच्या घटकापर्यंत ही लिंक पोहचवून अडाणी समाज बांधवांना फोन करून किंवा माहिती विचारून सुशिक्षित बांधवांनी माहिती भरण्यास सहकार्य करावे.
*आरक्षण* या विषयावर हात घालायचा असेल तर भोई समाज जनगणना अतिशय महत्वाची असून सहकार्य करावे ही नम्र विनंती.

*आपण काय करायचे वाचा*
*सर्व माहिती मराठीतच भरायची आहे.*

1)फक्त वरील लिंकला कुटुंब प्रमुख यांची माहिती भरून घरातील सदस्य संख्या नमूद करावयाची आहे....
भोई समाज जनगणना
वरील लिंक मध्ये आपला जिल्हा dropdown मधून निवडा व बाकी माहिती भरा🙏🏻🙏🏻
2)आपली माहिती भरल्यानंतर इतरांना पन पाठवा
3)घरी राहुन माहिती भरा.
4)गर्दी करू नका.
5) *घरीच रहा,सुरक्षित रहा....*
6)आपल्या जवळ जेवढे भोई समाज संपर्क असतील त्यांना न चुकता पाठवा.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻


*मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंजिल*
🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻
*मगर लोग साथ आते गये कारवां बनता गया*
✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻



*सदैव आपलेच*
*भोई समाज युवा मंच महाराष्ट्र*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

*मनात आणलं तर या जगात अशक्य काहीच नाही...*

*सर्वात महत्वाची सूचना:-*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*ही जनगणना घरी बसूनच करायची आहे,कोणीही इतरत्र फिरून नये.*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
*विनंती:- ही पोस्ट फक्त समाज हित बघून फॉरवर्ड करावी*

Saturday, July 4, 2020

कोरोना योध्दा आभार...

*जय भोईराज*
महाराष्ट्रातील तमाम भोईराजास मी ज्ञानेश्वर खैरमोडे सादर प्रणाम करतो
सर्व प्रथम मी भोई समाज युवा मंच चे  महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पदाधिकारी ज्यांनी *कोरोना योद्धा सन्मान-पुरस्कार*  याची कल्पना मांडली व अंमलात आणली आणि प्रत्यक्षात ती राबवली अशा सर्वच पदाधिकाऱ्यांचे सर्वप्रथम आभार कारण महाराष्ट्रातील जे समाज बांधव या संकटकाळात आपापल्या परीने व काहींनी मोठ्या वतीने कोरोना विरुद्धच्या लढाईत सहभाग घेतला अशा योद्ध्यांचा सन्मान करून आपण समाजात आदर्श निर्माण केला आहे त्यासाठी पुन्हा एकदा आपले सर्वांचे *मनःपूर्वक अभिनंदन व आभार🌹🌹🙏🙏*

कोरोना योद्ध्यांनो आपल्या हातुन घडलेले हे कार्य समाजासाठी गौरवाची बाब आहे तसेच ह्या कठिण प्रसंगात आपण देशसेवेत निडरपणे उभे राहिलात त्या बद्दल भोईसमाज युवा मंच महाराष्ट्र तर्फे आपला सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येत आहे, हा गौरव आपल्या कार्यापुढे नगण्य आहे, हा गौरव करण्यास आम्हि आमचे भाग्य समजतो व आपल्या कार्याला मुजरा करतो.
✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨
*भोईसमाज युवा मंच महाराष्ट्र तर्फे महाराष्ट्रातील भोई समाजाची जी गरज आहे ओळखून एक नवा उपक्रम आम्ही आपल्या समोर घेऊन येणार आहोत त्याची संपूर्ण माहिती दिनांक 7/7/2020 रोजी ८ वाजता भोई समाज युवा मंचाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री किशोरजी शिवदे सर आपल्या सोशल मीडिया वरून समाजासमोर जाहीर करणार आहेत*आता गरज आहे सर्वांनी 7/7 येण्याची
त्यामूळे आपणासर्वांना विनंती की  समाजिक कर्तव्य म्हणुन सदर पोस्ट जास्तीत जास्त शेअर करावी


हाक तुमची...✊🏻✊🏻
    साथ आमची....✊🏻✊🏻
*सदैव आपलेच*
*भोई समाज युवा महाराष्ट्र*


*भोईसमाज युवा मंच महाराष्ट्राच्या विविध उपक्रमाच्या माहिती साठी आमच्या ब्लॉग ला अवश्य भेट द्या*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://bhoisamajyuvamanch1.blogspot.com

Sunday, June 28, 2020

कोरोना योद्धा सन्मान






🎖️🎖️ *कोरोना योद्धा सन्मान*🎖️🎖️


*भोईसमाजास आपला सार्थ अभिमान संकट काळात आपण दिली माणुसकीची जाण*
✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻

*मा सौ शुभांगी जगदीश ढोले.*
*आरोग्य सेविका* 

फैजपूर नगरपरिषदने कोरोना सर्वेक्षणासाठी दिलेले ५०० घरांतील वयोवृद्ध व दहा वर्षाखालील मुलांचे सर्वेक्षण . फैजपूर नगरपरिषद शिवाजीनगरपरिसर ७५० घरातील प्रत्येक व्यक्तीचा  पल्स आॅक्सिमिटर द्वारे रक्तातील आॅक्सिजन सॅच्युरेशन लेव्हल चेक करणे. थर्मल स्कॅनर द्वारे टेंपरेचर चेक करणे.


*मा. श्री गजानन नामदेव आमझरे*
*आरोग्य सेवक*
कोरोणा पेशंटच्या सानिध्यात राहून बेड व्यवस्था, जेवन व्यवस्था, चहा पाणी असे कार्य आपल्या हातुन घडले

*मा श्री यशवंत गोविंद निकवाडे*
*शिरपुर*

निराधार लोकांना अन्यधान्य व फळभाज्या वाटप केले,

*मा श्री चंद्रकांत आसाराम डहांके*
*नाशिक*

रक्तदान, अन्यधान्य वाटप केले या वर हमोपॅथी गोळ्यांचे घरोघरी जाऊन वाटप केले

*मा श्री किरण परशुराम तावडे*
*सुरत*
लहान मुलांना शिक्षण साहित्य तथा अन्न धान्य वाटप केले

आपल्या हातुन घडलेले कार्य 
हि समाजासाठी गौरवाची बाब आहे तसेच ह्या कठिण प्रसंगात आपण देशसेवेत निडरपणे उभे राहिलात त्या बद्दल भोईसमाज युवा मंच महाराष्ट्र तर्फे आपला सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येत आहे, हा गौरव आपल्या कार्यापुढे नगण्य आहे, हा गौरव करण्यास आम्हि आमचे भाग्य समजतो व आपल्या कार्याला मुजरा करतो.
✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨
*भोईसमाज युवा मंच महाराष्ट्र तर्फे आपणास भावी कार्यास खुप खुप शुभेच्छा...!*

*विनंती - समाजिक कर्तव्य म्हणुन सदर पोस्ट जास्तीत जास्त शेअर करावी तसेच भोईसमाजाचे आपल्या परीसरातील किंवा परीचयाचे कोरोना योद्धांची माहिती खालील नंबर वर देऊन सहकार्य करावे.*

तुषार साटोटे:95523 65423
किशोर शिवदे:9404761567
निलेश वाडीले:9011494777
संजय इंगळे:8888066486
महारू शिवदे:92606 01964
निलेश साटोटे:9975054010
चेतन मोरे:9403717446
राहुल भोई:7387816721


हाक तुमची...✊🏻✊🏻
    साथ आमची....✊🏻✊🏻
*सदैव आपलेच*
*भोई समाज युवा महाराष्ट्र*


*भोईसमाज युवा मंच महाराष्ट्राच्या विविध उपक्रमाच्या माहिती साठी आमच्या ब्लॉग ला अवश्य भेट द्या* 
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://bhoisamajyuvamanch1.blogspot.com

Saturday, June 27, 2020

कोरोना योध्दा सन्मान

*कोरोना योद्धा सन्मान*

*मा श्री चंद्रशेखर प्रभाकर असोलकर* 
ओ टिव्ही न्युज रिपोर्टर म्हणुन अोझर, नाशिक येथे कोरोना काळात परीसरातील वित्तम बादमी देऊन लोकांना जागृत करणे, कंटेन्मेंट परीसर तथा लोकांनकडुन घेतल्या जाणा-या काळजीचे कव्हरेज, आरोग्य सेवक, नर्सेस यांची कर्तव्य बजाऊन आल्यावर परीसरातुन होणारे कौतुक त्यांचे स्वागत  करतांनाचे कव्हरेज करुण त्यांच्या कार्याला प्रोत्साहित केले आता हि ती सेवा देऊन प्रोत्साहित करीत आहात हि समाजासाठी गौरवाची बाब आहे तसेच ह्या कठिण प्रसंगात आपण देशसेवेत निडरपणे उभे राहिलात त्या बद्दल भोईसमाज युवा मंच महाराष्ट्र तर्फे आपला सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येत आहे, हा गौरव आपल्या कार्यापुढे नगण्य आहे, हा गौरव करण्यास आम्हि आमचे भाग्य समजतो व आपल्या कार्याला मुजरा करतो.
✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨
*भोईसमाज युवा मंच महाराष्ट्र तर्फे आपणास भावी कार्यास खुप खुप शुभेच्छा...!*

*विनंती - समाजिक कर्तव्य म्हणुन सदर पोस्ट जास्तीत जास्त शेअर करावी तसेच भोईसमाजाचे आपल्या परीसरातील किंवा परीचयाचे कोरोना योद्धांची माहिती खालील नंबर वर देऊन सहकार्य करावे.*

तुषार साटोटे:95523 65423
किशोर शिवदे:9404761567
निलेश वाडीले:9011494777
संजय इंगळे:8888066486
महारू शिवदे:92606 01964
निलेश साटोटे:9975054010
चेतन मोरे:9403717446
राहुल भोई:7387816721


हाक तुमची...✊🏻✊🏻
    साथ आमची....✊🏻✊🏻
*सदैव आपलेच*
*भोई समाज युवा महाराष्ट्र*



https://bhoisamajyuvamanch1.blogspot.com

Friday, June 26, 2020

कोरोना योध्दा सन्मान....


*कोरोना योद्धा सन्मान*

*मा श्री प्रशांतजी मधुकर शिंगाने* 
ब्लड बँक टेक्नेशियन म्हणुन छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पीटल कळवा, ठाणे येथे कोरोना काळात व आता हि आपली सेवा आपण देत आहात हि भोईसमाजासाठी गौरवाची बाब आहे तसेच ह्या कठिण प्रसंगात आपण देशसेवेत निडरपणे उभे राहिलात त्या बद्दल भोईसमाज युवा मंच महाराष्ट्र तर्फे आपला सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येत आहे, हा गौरव आपल्या कार्यापुढे नगण्य आहे, हा गौरव करण्यास आम्हि आमचे भाग्य समजतो व आपल्या कार्याला मुजरा करतो.
✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨
*भोईसमाज युवा मंच महाराष्ट्र तर्फे आपणास भावी कार्यास खुप खुप शुभेच्छा...!*

*विनंती - समाजिक कर्तव्य म्हणुन सदर पोस्ट जास्तीत जास्त शेअर करावी तसेच भोईसमाजाचे आपल्या परीसरातील किंवा परीचयाचे कोरोना योद्धांची माहिती खालील नंबर वर देऊन सहकार्य करावे.*

तुषार साटोटे:95523 65423
किशोर शिवदे:9404761567
निलेश वाडीले:9011494777
संजय इंगळे:8888066486
महारू शिवदे:92606 01964
निलेश साटोटे:9975054010
चेतन मोरे:9403717446
राहुल भोई:7387816721


हाक तुमची...✊🏻✊🏻
    साथ आमची....✊🏻✊🏻
*सदैव आपलेच*
*भोई समाज युवा महाराष्ट्र*



https://bhoisamajyuvamanch1.blogspot.com

भाग्यश्री शिवदे प्रथम क्रमांक विजेती....


आपल्या समाजाची कन्या *कु.भाग्यश्री लक्ष्मण शिवदे* चेंबूर हिचा राज्यस्तरीय गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन🎁🎁🎁🎁
तिच्या विजयासाठी मेहनत घेणारे सर्व समाज बांधव आप्तेष्ट यांचे भोई समाज युवा मंच तर्फे मनःपूर्वक आभार....
असेच आपल्या लोकांना पुढे नेण्यासाठी सहकार्य करा.नक्कीच समाज प्रगती पथावर येईल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*जय भोईराज*
शुभेच्छूक
भोई समाज युवा मंच महाराष्ट्र

Wednesday, June 24, 2020

सन्मान कोरोना योद्धांचा.....

*सर्व समाज बांधवांना सस्नेह जय भोईराज*

*सन्मान करोना योद्धाचा*

सध्या सुरू असलेल्या कोरोना मध्ये आपले बरेच समाज बांधव स्वतःचा जीव धोक्यात टाकून कोरोना रूग्ण सेवा,किंवा इतर अत्यावश्यक सेवा बजावताना दिसत आहेत.सामाजिक बांधिलकीची जाणीव वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने
*भोई समाज युवा मंच महाराष्ट्र प्रदेश* तर्फे आपल्या समाजातील अशा कोरोना योध्दाचा सन्मान करणे आम्ही आमचे आद्य कर्तव्य समजतो. 'कोरोना' या आजाराविरोधात कार्य केलेल्यांचा *'कोरोना योद्धा'* म्हणून सन्मानार्थ प्रमाणपत्र देऊन कर्तव्य बजाऊ इच्छितो आहे.
सर्व समाज बांधव यांना विनंती करण्यात येते की आपण किंवा आपल्या परिचयाचे कोणीही कोरोना काळात केलेल्या सेवेची माहिती आमच्या भोई समाज युवा मंच  पदाधिकारी यांना पाठवून सहकार्य करावे.
पाठवतांना फोटो व आपण केलेले काम याची थोडक्यात माहिती आमच्या खालील पदाधिकारी मार्फत पाठवा.
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
तुषार साटोटे:+91 95523 65423
किशोर शिवदे:9404761567
निलेश वाडीले:9011494777
संजय इंगळे:8888066486
महारू शिवदे:92606 01964
निलेश साटोटे:9975054010
चेतन मोरे:9403717446
राहुल भोई:7387816721

हाक तुमची....✊🏻✊🏻
     साथ आमची...✊🏻✊🏻

*सदैव आपलेच*
*भोई समाज युवा मंच महाराष्ट्र प्रदेश*

https://bhoisamajyuvamanch1.blogspot.com

Tuesday, June 23, 2020

समाजासाठी चांगले कार्य करण्याचा प्रयत्न करा...


समाजासाठी चांगले कार्य करण्याचा प्रयत्न करा व आदर्श जीवन जगा...
महारू शिवदे जळगाव


                        ✍️शुद्ध आचार, विचार, निष्कलंक जीवन, जीवनात त्याग आणि अपमान सहन करण्याची शक्ती ही पाच तत्त्वे ज्यांच्याजवळ असेल तो समाजात परिवर्तन आणि देशाचा विकास करूशकतो. जन्म आणि मरणाच्यावेळी आपण काही घेऊन जात नाही, त्यामुळे समाजासाठी जे काही चांगले कार्य करता येईल ते करण्याचा प्रयत्न करा आणि आदर्श जीवन जगा,आजचा युवक हा देशाची खरी शक्ती असून तीच समाजात परिवर्तन करू शकते हे अनेकदा आंदोलनातून सिद्ध झाले आहे. युवकांमुळे अनेक देशात क्रांती झाली ते देश विकसनशील देश म्हणून ओळखली जात आहे. आपल्यामध्ये ती शक्ती आहे. मात्र, त्याचा उपयोग ज्या पद्धतीने केला पाहिजे तो केला जात नाही. जन्माला येतो त्यावेळी आपण काही घेऊन येत नाही आणि मरण येते तेव्हा काही घेऊन जात नाही. तरीही आयुष्य जगत असताना हे माझे आहे, ते तुझे आहे, तेही माझे आहे, असे करीत आयुष्यात भांडत असतो. या मानसिकतेतून बाहेर येण्याची गरज आहे. आपल्याला जन्म हा निष्काम सेवेसाठी मिळाला आहे ही मानसिकता ठेवून काम केले तर जीवनाचे सार्थक होते आणि काम करण्याचा आनंद मिळतो. प्रपंच करावा. मात्र, तो करताना केवळ आपल्या घरापुरता सिमित न ठेवता समाजासाठी आपण काय करू शकतो त्याचाही विचार करावा.
    रेल्वे स्थानकावर फिरत असताना स्वामी विवेकानंदांचे पुस्तक हाती लागल्यावर ते वाचले आणि त्या दिवसांपासून समाजसेवा करण्याचा निर्णय घेतला. तरी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत या समाजाच्या व राष्ट्राच्या विकासासाठी लढत राहणार आहे. सेवेचा आनंद हा वेगळा असतो. तो प्रत्येकाच्या जीवनात येत नाही. भ्रष्ट,खोटे बोलणारे,फुट पाडणारे,लावा लावी करणारे,एकत्रीकरण न होऊ देणारे,स्वार्थी  असे लोंक आजु बाजुला  खूप आहे. मात्र, ती आज सुखी नाही. त्यांना सुखाने झोप घेता येत नाही.माझ्याजवळ  जे आहे ते मी समाजकार्य केलेल्या समाज बाधंवाचा आशिर्वाद  स्वरूपात मिळाले आहे ते सर्व समाजसेवेसाठी आहे. आजचा युवक भरकटला असून त्यांच्याजवळ विचार नाही, असे बोलले जात असले तरी त्यात तथ्य नाही. युवकांना योग्य दिशा दिली तर त्यांच्यामध्ये बदल होऊ शकतो, हे विविध कार्यातुन सिद्ध झाले आहे. युवकांची मोठी शक्ती समाजकार्यात सहभागी झाली तर. त्यांच्यामुळे समाजात काही प्रमाणात परिवर्तन होऊ शकते
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*महारू भाऊ शिवदे*
 *जळगांव*
*भोई समाज युवा मंच महाराष्ट्र*

Saturday, June 13, 2020

मी पणा सोडा सर्वांना जोडा.....




*मी पणा सोडा व सर्वांना जोडा*
कवी:- महारू पंडित शिवदे
अहंकार या शब्दाचा मी पणा
किती जवळ घेऊन बसतोस रे
किती स्वतःचीच स्वतःच्या हाताने पुजा करुन घेतोस रे
दिस संपला की रात येते रात संपली की परत दिस
वारा येतो वादळाचा मारा घेऊन तो ही संपून जातो रे
तूझा अहंकार संपणार आहे का
तुझी कडक इस्त्री, तुझी कडक शायनिंग, तुझी कडक भाषा, तुझी कडक राहणी कधी संपणार आहे का रे
तुझी तूच चालवली आहेस स्वतःच्या हाताने स्वतःची निंदा
समाजाच्या जीवावर तू आहेस रे मिंदा
सोड आता तूझा अहंकारी मी पणा
अध्यक्ष म्हणून तू मिरवतोस
कधी तरी कार्यकर्ता म्हणून वाग रे
कार्यकर्त्याच जिन कधी तरी जग रे
तुला तुझीच लाज वाटेल किती झटतो रे
तो मी पणा सोडून समाजासाठी समाजाच्या, एकतेसाठी, हक्कासाठी, समाजाच्याहितासाठी रे
एकदा तरी त्याचा विचार कर त्याची नाही रे कडक इस्त्री, त्याची नाही रे कडक शायनिंग, त्याची नाही रे कडक भाषा, त्याची नाही रे कडक राहणी, वेळ आली तर सतरंजी सुद्धा उचलण्याची तयारी ठेवतो तो रे
त्याच्याकडून तू थोड काही तरी शिक रे
तुझ्या अहंकारी पणाचा मी पणा बाजुला ठेव रे,
दुसर्याचा छळ करून तू सुखी होणार नाही रे....
पॅकेज कितीही मोठं असू दे जगण्यात मजा राहणार नाही रे.....
थोडा समाजासाठी झट रे
स्वतःचाच भरू नकोस खिसा रे.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*महारू शिवदे*
प्रदेश कार्याध्यक्ष
भोई समाज युवा मंच महाराष्ट्र
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Monday, June 8, 2020

समाज सेवा करत असतांना... ज्ञानेश्वर खैरमोडे


           समाज सेवा करत असतांना.....
                  ज्ञानेश्वर खैरमोडे येवला...
सर्व सन्मानिय भोई समाज युवा मंच पदाधिकारी बंधूंना मानाचा जय भोईराज 🙏🙏🙏🙏🙏
आज मी ज्ञानेश्वर खैरमोडे 
#Let It #Go.... यावर काही माझे व काही कॉपी पेस्ट परंतु समाजकार्यात कलाटणी देणारे मनोगत व्यक्त करत आहे🙏🙏🙏
बघा पटतय का....?????
*#Let It #Go....* (हे...जाऊ द्या)

समाजकार्य करत असतांना कितीही जपून वागलं तरी काही लोक फक्त आपल्या चुकाच पकडायला बसलेले असतात. म्हणजे आपल्या ध्यानी मनी नसलेल्या गोष्टींनी सुद्धा कोणी दुखावून घेत असतं. माणसं नेहमीच महत्त्वाची वाटतात आपल्याला म्हणून आपण दरवेळी स्पष्टीकरणं देत राहतो. कधी चटकन माफीही मागून टाकतो (आपल्या इगोपेक्षा माणसं महत्त्वाची हे तत्त्व डोक्यात ठेवून). पण हे सतत घडत राहील तर पोरखेळ होऊन बसतो 

मंग. जपून तरी किती वागावं नेहमी? मग भीती तयार होते नात्यांत एक अदृश्य! अरे आपण थोडंसं जरी चुकलो तरी आपल्याला कोणी झाडणार. किंवा सतत ही देखील टांगती तलवार राहते डोक्यावर, की आपल्याकडून नकळत काही गोष्ट घडली, जिच्यामागे कोणाला हेतूत: दुखावण्याचा उद्देश नसला तरी कोणी आपल्याबद्दल गैरसमज करून घेणार आहे, आपल्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणार आहे. ही भीती मोठाल्या भिंती उभ्या करते नात्यांत. आतून तुटण्याची प्रक्रिया कधीच सुरू झालेली असते, तरीही आपण चिवटपणे तगून राहिलेलो असतो नात्यात, धरून असतो आपल्या माणसांना. (कारण आपल्याला आयुष्यातलं माणसांचं मोल फार अधिक वाटलेलं असतं.)

पण उंटाच्या पाठीवर शेवटची काडी कधीतरी पडतेच. असह्य होतात स्पष्टीकरणं, नको होतं वारंवार रिव्हर्स गिअरवर जाऊन कोणाची सतत समज काढत बसणं. 'जाणाऱ्याला कधी अडवू नये,' असं एक सुहृद व्यक्तीने मला कधी सांगितलेलं. ज्यांना आपल्या आयुष्यात थांबायचं आहे, ज्यांना आपण कोणत्याही अटी शर्तीशिवाय हवे आहोत, जे लोक आपल्या as it is असण्यावर प्रेम करतात त्यांना आयुष्यात थांबू द्यावं, नव्हेनव्हे तर आवर्जून वेळ देऊन मेंटेन करावं. पण जे लोक आपल्या आयुष्यात येताना परतीचा दरवाजा उघडा ठेवून आले आहेत, जे अस्थिर आहेत, पुढे जाऊन पुन्हा फार फार मागे येत आहेत अशा लोकांनी 'मी तुमच्या आयुष्यातून जातो/जाते' म्हटल्यावर त्यांना थांबण्याचा फार आग्रह करू नये. तसं केल्याने फार तर तेवढी वेळ टळू शकते, आजच मरण उद्यावर ढकलणं इतकाच त्याचा अर्थ! ज्यांना जायचंच आहे ते काहीतरी निमित्ताकारणे कधी ना कधी आपल्या आयुष्यातून जाणारच असतात. तेथे अडकून फार ऊर्जा वाया घालवत बसू नये. त्या नात्याला 'कृष्णार्पणमस्तु' म्हणावं आणि पुढे चलावं.

आपल्या वागण्याने कोणी दुखावेल का ही सततची भीती मनात बाळगण्याऐवजी हा विश्वास मनात असू द्यावा की 'जे लोक माझे आहेत, जे माझ्यावर विनाशर्त प्रेम करतात' ते लोक मला समजून घेतील. माझ्याकडून नकळत काही चुकलं तरी मला चटकन आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणार नाहीत. कारण त्यांना माहितीय, माझी कृती आणि माझे शब्द यापेक्षा माझे त्यांच्याप्रति असणारे भाव जास्त महत्त्वाचे आहेत. ते निर्मळ आणि निरपेक्ष आहेत. अनवधानाने कधी एखादा अप्रिय शब्दही जातो मुखातून, मग आपल्याला वाटतं की माझ्या मनात नसताना अशी चूक झालीच कशी? 'आपली' माणसं आपल्याला कानकोंडं होण्याची वेळ येऊ देत नाहीत. 'शब्द फसवे असतात. विश्वास माणसाच्या वृत्तीवर ठेवावा, तात्कालिक शब्दांवर नाही' हे ते जाणून असतात. ते आपल्या अशा नकळत होणाऱ्या चूक समंजसपणे पोटात घालतात. अशा माणसांसाठी मला कितीही पावलं मागे यावं लागलं तरी बेहतर! माझा इगो या नात्यांपेक्षा कधीच मोठा नसेल हे मनाशी असू द्यावं. (मलासुद्धा इतरांसाठी असं समंजस माणूस असायचं आहे हेही मनाशी पक्कं असू द्यावं.)

'अतिविचार' हे एक स्ट्रॉंग पॉयझन आहे. ह्याला काय वाटेल, तिला काय वाटेल आणि त्यांना काय वाटेल या विचारात आयुष्य संपून जाईल, पण आपल्या हातून समाजा कार्य होणार नाही. आपले हेतू शुद्ध असतील तर कोणाला काय वाटेल याचा आपण फार विचार करत बसू नये. ज्यांचं आपल्यावर प्रेम आहे ते मोकळेपणाने आपल्या चुका सांगतील, आपले मुद्दे समजून घेतात आणि सुधारणेला संधी देतील. जे आपले नाहीत ते नेहमी आपली शेंडी कशी हातात सापडेल या प्रयत्नात राहतील. निमित्त काढून आपल्याला कडेलोट करतील.
नात्यांना मोकळेपणानं सामोरं जाऊया. आपलं कोण, परकं कोण हे काळाच्या परीक्षेत सिद्ध होतंच. त्यावेळी काय पकडून ठेवायचं आणि हातून काय निसटू द्यायचं हे ठरवता यायला हवं फक्त.

*'Let it go' is a powerful chant. It makes you more light, so you can fly high.*

(जाऊ दे' हा एक शक्तिशाली जप आहे. हे आपल्याला अधिक हलके करते, जेणेकरून आपण उंच उडू शकता.)


समाज सेवा ही ईश्वर सेवा,,
''उठा कामाला लागा,,,

   ''हाक तुमची....
              साथ आमची...,,


 *भोई समाज युवा मंच, महाराष्ट्र*

Friday, June 5, 2020

समाज घडवण्यात युवकांची जबाबदारी.....

समाज घडवण्यात युवकांची जबाबदारी 
          श्री.महारू पंडित शिवदे
 प्रदेश कार्यध्यक्ष भोई समाज युवा मंच महाराष्ट्र
समाज, समाज म्हणजे काय असतो ? एकमेकांशी सलोखा असणाऱ्या एकत्र राहणाऱ्या लोकांचा समूह. आज भारतातील 45% समाज युवक वर्गात मोडतो. तर त्यांच्या उद्धाराची जबाबदारी पण युवकांचीच ना.


तरुण हा समाजातील अतिशय सक्षम, चंचल, शक्तिशाली, उत्साही घटक म्हनुन ओळखला जातो. आजचा तरुण उद्याचा वृद्ध असेल. ह्या तरुणाने स्वीकारलेली आव्हाने पुढच्या पिढीसाठी मार्गदर्शन ठरतील.

सरदार वल्लभभाई पटेल म्हणायचे की तारुण्याची तीन 'त'कार असावेत - तेजस्विता, तपस्वीता आणि तत्परता. या गुणांचे आचरण करणे आवश्यक आहे. या युवकांनी देश सुधारण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली पाहिजे.

स्वराज्याची स्थापना करणारे शिवाजी महाराज, ती धुरा यशस्वीपणे सांभाळणारे संभाजीराजे हेदेखील तरुणच होते. स्वातंत्र्यपूर्व काळात जसे भगतसिंग, राजगुरु, चंद्रशेखर आजाद, सुखदेव हे सक्रिय होते तसे आजपण समोर यावेत.

समाजातील आजची आव्हाने जसे की वाढत चाललेली गुन्हेगारी, खराब राजकारण, वाढलेला भ्रष्टाचार, जातीयवाद आणि बेरोजगारी यावर तरुणांनीच काहीतरी उपाय योजले पाहिजेत. आजच्या समाजाची क्रांती फक्त युवकच करू शकतो.

म्हनुन प्रत्येक तरुणाने होईल तेवढा हातभार लावलाच पाहिजे. मी माझ्यापासून सुरुवात करतोय. तुम्ही पण करा.

*धन्यवाद...
🙏🙏🙏
लेख:श्री.महारू पंडित शिवदे
प्रदेश कार्यध्यक्ष भोई समाज युवा मंच महाराष्ट्र

Wednesday, May 27, 2020

जाहीर आभार .....जाहीर आभार....



*सर्व समाज बांधवाना सस्नेह जय भोईराज*
🐋🐋🐋🐋🐋
🙏🏻 *जाहीर आभार,जाहीर आभार*🙏🏻
🌹🌹🌹🌹🌹🌹
*कविश्रेष्ठ संत भिमा भोई यांच्या  जयंतीनिमित्त* भोई समाज युवा मंच महाराष्ट्र प्रदेश तर्फे  *राज्यस्तरीय भोई समाज सद्यस्थिती समस्या व उपाय* या  स्पर्धेस संपूर्ण महाराष्ट्रातुन भरभरून प्रतिसाद मिळाला.
🏅🏅🏅🏅🏅🏅🏅
 *भोई समाज युवा मंच महाराष्ट्र प्रदेश सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन...व सहभागी सर्वांचे कौतुक*
💐💐💐💐💐
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी *भोई समाज युवा मंच सर्व पदाधिकारी,सर्व सहभागी स्पर्धक,इतर  सर्व संघटना,दले ,संस्था* यांनी विशेष मेहनत घेतली.सर्वांचे भोई समाज युवा मंच महाराष्ट्रतर्फे जाहीर आभार...यापुढेही असेच सहकार्य असुद्या ही विनंती...
असेच विविध उपक्रम समाज बांधवांच्या सेवेत भोई समाज युवा मंच सादर करत राहील..
आपला पाठींबा असाच असू द्यावा...ही नम्र विनंती
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*सर्व स्पर्धक यांचे अभिप्राय वाचून खूप आम्हाला खूप बरे वाटले...*

घरीच रहा...
       सुरक्षित रहा....
               काळजी घ्या......

🐋 *जय भोईराज* 🐋

✊🏻 *हाक तुमची....* ✊🏻
     ✊🏻 *साथ आमची....* ✊🏻

💐 सदैव आपलेच 💐

*भोई समाज युवा मंच महाराष्ट्र प्रदेश*

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://bhoisamajyuvamanch1.blogspot.com

Tuesday, May 26, 2020

राज्यस्तरीय निबंध स्पर्धा निकाल


सर्व समाज बांधवाना सस्नेह जय भोईराज
🐋🐋🐋🐋🐋
💐💐 *हार्दिक अभिनंदन*💐💐

              🌹🌹🌹🌹🌹🌹
*कविश्रेष्ठ संत भिमा भोई यांच्या 170 व्या जयंतीनिमित्त* भोई समाज युवा मंच महाराष्ट्र प्रदेश तर्फे  *राज्यस्तरीय भोई समाज सद्यस्थिती समस्या व उपाय* या  स्पर्धेस संपूर्ण महाराष्ट्रातुन भरभरून प्रतिसाद मिळाला.स्पर्धेचा निकाल जाहीर करतांना मनस्वी आनंद होत आहे...
स्पर्धेचा निकाल व विजेते पुढीलप्रमाणे
*प्रथम🥇सुशील मालवी👉🏻1001*
*द्वितीय🥈राजेश्वरी साटोटे  धुळे 👉🏻501*
*तृतीय 🥉जगदीश ढोले  जळगाव 👉🏻301*
*चतुर्थ🏅अस्मिता सोनवणे  नंदुरबार 👉🏻201*
🏅🏅🏅🏅🏅🏅🏅

भोई समाज युवा मंच महाराष्ट्र प्रदेश सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन...व सहभागी सर्वांचे कौतुक*
💐💐💐💐💐
*टीप.सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र ऑनलाईन पाठवण्यात येतील..*
असेच विविध उपक्रम समाज बांधवांच्या सेवेत भोई समाज युवा मंच सादर करत राहील..
आपला पाठींबा असाच असू द्यावा...ही नम्र विनंती
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

घरीच रहा...
       सुरक्षित रहा....

🐋 *जय भोईराज* 🐋

✊🏻 *हाक तुमची....* ✊🏻
     ✊🏻 *साथ आमची....* ✊🏻

💐 सदैव आपलेच 💐

*भोई समाज युवा मंच महाराष्ट्र प्रदेश*

Monday, May 25, 2020

राज्यस्तरीय निबंध स्पर्धा....


*सर्व समाज बांधवाना सस्नेह जय भोईराज*
🐋🐋🐋🐋🐋
*कविश्रेष्ठ संत भिमा भोई जयंतीच्या सर्व समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा*
🌹🌹🌹🌹🌹🌹
*कविश्रेष्ठ संत भिमा भोई यांच्या 170 व्या जयंतीनिमित्त* भोई समाज युवा मंच महाराष्ट्र प्रदेश तर्फे  *राज्यस्तरीय भोई समाज सद्यस्थिती समस्या व उपाय* या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, सदर स्पर्धेतुन मोबाईलच्या धावत्या युगात समाज बांधवांना मध्ये वाचनाची आवड निर्माण करणे,लेखन संस्कृती जपणे,समाजाबद्दल विचार करण्याची मानसिकता तयार करणे,समाज बांधवांच्या विचारांवर विचार करून संघटनेची भविष्यातील वाटचाल ठरवणे असे विविध हेतू ठेवून सदर ज्वलंत विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती,या स्पर्धेस संपूर्ण महाराष्ट्रातुन भरभरून प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल *भोई समाज युवा मंच महाराष्ट्र प्रदेश आपले आभारी आहे...* लवकरच स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येईल
असेच विविध उपक्रम समाज बांधवांच्या सेवेत भोई समाज युवा मंच सादर करत राहील..
आपला पाठींबा असाच असू द्यावा...ही नम्र विनंती
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

घरीच रहा...
       सुरक्षित रहा....

🐋 जय भोईराज 🐋

✊🏻 *हाक तुमची....* ✊🏻
     ✊🏻 *साथ आमची....* ✊🏻

💐 सदैव आपलेच 💐

*भोई समाज युवा मंच महाराष्ट्र प्रदेश*

https://bhoisamajyuvamanch1.blogspot.com

Sunday, May 24, 2020

संत भिमा भोई जयंतीनिमित्त भोई समाज युवा मंच पारोळा तर्फे रक्तदान शिबीर


भोई समाजाचे कविश्रेष्ठ श्री संत भिमा भोई यांच्या जयंतीनिमित्त भोई समाज युवा मंच पारोळा तालुका तर्फे भव्य रक्तदान शिबीर*
🌹🌹🌹🌹🌹🌹
कोरोनामुळे रक्त संकलनाचे प्रमाण खूप कमी झाले आहे.त्यामुळे रुग्णांना वेळेवर रक्त मिळणे कठीण झाले आहे.भोई समाजाचे कविश्रेष्ठ श्री संत भिमा भोई यांच्या जयंतीनिमित्त भोई समाज युवा मंच पारोळा तालुका व श्रीराम मित्र मंडळ  पारोळा यांच्या वतीने संत भिमा भोई *वाचनालय राम मंदिर चौक पारोळा 25 मे वार सोमवार रोजी सकाळी ९ ते ५ च्या दरम्यान रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.*
कोरोना नियमांचे व ताळेबंदी नियमांचे पालन करून सदर शिबीर घेण्यात येत आहे. या शिबिरात समाज बांधवांनी तसेच विविध संघटनांनी ,संस्थांनी,सदस्यांनी सहभाग घ्यावा.तसेच रक्तदात्यांनी या शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान करावे असे आवाहन भोई समाज युवा मंच पारोळा तालुकाध्यक्ष मुयर भोई यांनी केले आहे.

✊🏻 *जय भोईराज* ✊🏻

*हाक तुमची....*
     *साथ आमची....*

सदैव आपलेच

*भोई समाज युवा मंच महाराष्ट्र*

https://bhoisamajyuvamanch1.blogspot.com

Thursday, May 21, 2020

      
                किसान क्रेडिट कार्ड योजना

*CONTENTS*

१)किसान क्रेडिट कार्ड योजनेचा काय लाभ आहे?
२)किसान क्रेडिट कार्ड कसे मिळवावे?
३)भारतातील अग्रगण्‍य बँकांची किसान क्रेडिट कार्डस्
किसान क्रेडिट कार्ड योजनेचा काय लाभ आहे?
*वाचा सविस्तर माहिती*
पैशाच्‍या वाटपाच्‍या पध्‍दती सोप्‍या करते
नगद आणि स्‍वरूपासंबंधी कठिणपणा काढून टाकते
प्रत्‍येक पिकासाठी कर्जाकरीता अर्ज करण्‍याची गरज नाही
शेतकरयासाठी व्‍याजाचा भार कमी करणे शक्‍य करीत कोणत्‍या ही वेळी खात्रीलायकपणे कर्ज मिळण्‍याची हमी
शेतकरयाच्‍या सवडी आणि निवडीप्रमाणे बियाणे, उर्वरके खरेदी करण्‍यास मदत करते
डीलर्स कडून कॅश अव्‍हेल डिस्‍काउंट (नगद लाभ सूट) वर खरेदी करण्‍यास मदत करते
वर्षांपर्यंत कर्जाची सुविधा - हंगामी मूल्‍यांकनाची गरज नाही
जास्‍तीत जास्‍त कर्जाची मर्यादा (सीमा) शेतीच्‍या उत्‍पन्नावर आधारित
किती वेळा पैसे काढू शकता ती संख्‍या कर्ज सीमेवर अवलंबून
परतफेड फक्‍त हंगामा नंतर
शेतीसाठी घेतलेल्‍या आगावू रकमेवर व्‍याज दर लागू असल्‍याप्रमाणे
जामीन, मार्जिन व दस्‍तऐवजांचे मानक शेतीसाठी घेतलेल्‍या आगावू रकमेवर लागू असल्‍याप्रमाणे

केंद्र सरकारने किसान क्रेडीट कार्ड ही सुविधा आता मासेमारांना मत्स्य व्यवसायाकरीता आर्थिक सहाय्य मिळावे, यासाठी सुरु केली आहे. या योजने अंतर्गत मत्स्य शेतकऱ्यांना मत्स्य संवर्धनासाठी बीज, खाद्य, खते, प्रो-बायोटीक्स, तलावांचे नुतनीकरण, मत्स्यबीज केंद्रांसाठी आवर्ती खर्च, मासळी महिला विक्रेता यांच्याकरीता खेळते भाग भांडवल, तलाव ठेक्याने घेताना तलावाच्या भाडेपट्टीच्या पूर्ततेसाठी अर्थसहाय्य इत्यादी प्राथमिक भांडवलाची गरज भागविण्यासाठी अर्थसहाय्य दिले जाणार आहे. अर्थसहाय्य वेळेत परत केल्यास शासन व्याजदरात ३ टक्क्यांपर्यंत सवलत देणार आहे. अर्थसहाय्य सुलभरित्या मिळावे याकरीता किसान क्रेडीट कार्ड दिले जाणार आहे.*
किसान क्रेडिट कार्ड कसे मिळवावे*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
आपल्‍या नजीकच्‍या पब्लिक सेक्‍टर बँकेस भेट द्या आणि तपशील मिळवा
पात्र असलेल्‍या शेतकरयांना किसान क्रेडिट कार्ड आणि एक पासबुक मिळेल. त्‍यामध्‍ये नांव, पत्ता, जमिनीच्‍या मालकीचे (स्‍वामित्‍वाचे) विवरण, कर्ज घेण्‍याची सीमा, कायदेशीर मान्‍यता काळ, धारकाचा एक पासपोर्ट आकाराचा फोटो ज्‍याचा उपयोग ओळख पत्र आणि नेहमीच्‍या व्‍यवहाराची नोंद करण्‍याची सोय असे दोन्‍ही हेतू साध्‍य करण्‍यासाठी करण्‍यात येईल.
हे पासबुकवजा कार्ड धारकाने दाखवावे जेव्‍हां ती/तो खात्‍याचे संचालन करील.

हाक तुमची....✊🏻✊🏻
       साथ आमची....✊🏻✊🏻

*सदैव आपलेच*
 भोई समाज युवा मंच महाराष्ट्र

Monday, May 18, 2020

कोरोना युद्धात लढा देणारी भोई समाजाची रणरागिणी...सौ.माधुरीताई तुषार साटोटे

कोरोना युद्धात लढा देणारी भोई समाजाची रणरागिणी: सौ.माधुरीताई तुषार साटोटे

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कार्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. प्रत्येक जण कुटुंबातील सदस्यांच्या सुरक्षेसाठी घरातच थांबला आहे. मात्र कोरोना युद्धात अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर, पोलीस, कर्मचारी व प्रशासनातील अधिकारी लढा देत आहेत. यात लहान मुले असूनही अनेक महिला आरोग्य सेविका भीती न बाळगता कोरोना युद्धात लढा देत आहेत.
सातपूर नाशिक येथील अशाच एक आपल्या भोई समाजाच्या रणरागिणी माधुरीताई साटोटे मालेगाव सारख्या संवेदनशीलशील हॉटस्पॉट भागात सलग 28 दिवस आपल्या 3 वर्षाच्या चिमुरडीला सोडून सेवा देत दिनांक16 मे रोजी घरी परत आल्यानंतर सातपूर स्थानिक व कुटुंबियांनी त्यांचा पुष्पवर्षाव करून स्वागत केले.त्या भोई समाज युवा मंच प्रदेशाध्यक्ष *श्री.तुषार सोमनाथ साटोटे* यांच्या धर्मपत्नी आहेत.



सातपूर स्थानिक व कुटुंबीय पुष्पवर्षाव करतांना.....
💐💐💐💐💐💐💐
👇👇👇👇👇👇👇👇
🙏🏻
त्यांच्या या अभूतपूर्व कार्यास भोई समाज युवा मंच महाराष्ट्र प्रदेश कडून मानाचा मुजरा
🌹🌹🌹🌹🌹
सदैव आपलेच
*भोई समाज युवा मंच महाराष्ट्र प्रदेश*

Thursday, May 14, 2020

संत भिमा भोई जयंती निमित्त ऑनलाईन निबंध स्पर्धा...


*सर्व समाज बांधवांना सस्नेह जय भोईराज*
🐋🐋🐋🐋🐋🐋
🚩🚩🚩🚩🚩🚩
सालाबादप्रमाणे  येत्या 25 में ला *कवीश्रेष्ठ संतशिरोमणी  भिमा भोई* यांची जयंती येत असून देशभर कोरोनाचे थैमान वाढतच आहेत,दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढतंच आहे,कोरोनाचा धोका लक्षात घेता, *भोई समाज युवा मंच महाराष्ट्र* तर्फे सर्व भोई समाज बांधवांना आवाहन करण्यात येते की यावर्षी संत भीमा भोई जयंती सामूहिक ठिकाणी न करता घरीच राहून साजरी करूया...
*सर्व समाज बांधवांनी संतशिरोमणी  भिमा भोई यांच्या प्रतिमेचे पूजन घरीच करावे* व इतर समाजाला आपला आदर्श दाखवून द्यावा ही नम्र विनंती.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सर्व भोई समाज बांधवांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो की कवीश्रेष्ठ संतशिरोमणी भिमा भोई जयंती निमित्ताने *भोई समाज युवा मंच महाराष्ट्र* राज्यस्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धा आयोजित करत असून स्पर्धा खुल्या गटात होईल.स्पर्धेत
1 ते 3 क्रमांक विजेते निवड करण्यात येईल. विजेत्यांना *रोख रक्कम व प्रमाणपत्र* देण्यात येईल.


 खुला गट
विषय
*भोई समाज व्यवसाय सद्यस्थिती व उपाय*

शब्दमर्यादा:1500 शब्द

*निबंध 24 में पर्यंत* पुढील नंबर वर किंवा खालील इमेल वर पाठवण्यात यावे.निबंध स्वतः लिहिलेले असावे.नाव ,संपूर्ण पत्ता व मोबाईल क्रमांक(whatsapp) असावा.
*स्पर्धेसाठी संपर्क*👇🏻👇🏻
ज्ञानेश्वर खैरमोडे:9665254040
तुषार साटोटे:9552365423
किशोर शिवदे:9404761567
महारू शिवदे:9260601964
नंदकिशोर धारपवार: 90218 40421
निलेश वाडीले:9011494777
निलेश शिवदे:9021669408
चेतन मोरे:9403717446
निलेश साटोटे:9975054010

*टिप:- ही पोस्ट जास्तीत जास्त भोई समाज बांधवांन पर्यत शेअर करण्यात यावी,,,,,,,,,ही "नम्र विनंती*


Email:bhoisamajyuvamanch1@gmail.com
सदैव आपलेच
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
*भोई समाज युवा मंच महाराष्ट्र*
 
✊🏻 *जय भोईराज* ✊🏻
*हाक तुमची......*
      *साथ आमची......*

https://bhoisamajyuvamanch1.blogspot.com

Friday, May 1, 2020

दगड झालो तर “सह्याद्रीचा” होईन!
 माती झालो तर “महाराष्ट्राची” होईन! 
तलवार झालो तर “भवानी मातेची” होईन!
 आणि … पुन्हा मानव जन्ममिळाला 
      तर “मराठीच” होईन! 
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! 
🚩🚩!!जय महाराष्ट्र!!🚩🚩

Friday, April 24, 2020

भोई समाजाचे व्यवसाय बंद होण्याची कारणे....


भोई समाजाचे व्यवसाय बंद होण्याची कारणे... लेख: श्री.दिपक भोई चाळीसगाव



भोई समाजाचा उल्लेख रामायण,महाभारत सह इतर महाकाव्यात दिसतो काळा बरोबरच भोई समाजाच्या उपजिवीकेची साधन देखिल बदलत गेली किंवा काही प्रमाणात तीच राहिली. 
आपले पारंपरिक व्यवसाय:
१)राजे महाराज यांची पालखी वाहने.
२)मासेमारी
३)चणे फुटाणे विक्री
४)गाढवावर वाहतूक करणे.


     आता प्रश्न असा आहे की,भोई समाजाचे व्यवसाय बंद पडत आहेत किंवा त्या व्यवसायांवर इतरांनी अतिक्रमण केलेले दिसते. अतिक्रमण होण्यास काही प्रमाणात आपणही जबाबदार आहोत असे मला वाटते कारण 
१)जे समाज बांधव आर्थिक द्रुष्ट्या पुढारलेले आहेत त्यांच्याकडे कामगार म्हणून भोई समाजाची मुले नाहित किंवा जे समाज घटक आपल्याकडे कामगार म्हणून भोई समाजाचे मुले ठेवतात ते पाहिजे तसे काम करताना दिसत नाही.
२)भोई समाजाचे व्यवसाय बंद पडण्याचे अजून एक मुख्य कारण म्हणजे आपापसात असलेली स्पर्धा सुरू आहे जसे आपणच इतर समाज बांधवांपेक्षा कमी भावाने विक्री करणे किंवा जास्त भावाने खरेदी करणे.
३) माझ्याकडील माल हा भोई समाजाच्याच इतरांपेक्षा चांगल्या प्रतीचा आहे असे ग्राहकांना सांगणे.
४)आपापसातील स्पर्धा वाढल्यामुळे मेहनत जास्त असते आणि त्यामानाने नफ्याचे प्रमाण कमी होते.
५)सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपली कला ( जाळे विणने,चणे फुटाणे भाजणे,शेंगदाणे खारे करणे,फरसाण तयार करणे) इतर लोकांना माहीत करणे अशामुळे आपले व्यवसाय इतर समाजाकडे आपोआप जातात.
६)मच्छीमार सोसायट्यांमध्ये भोई समाज बांधवांना वगळून इतरांना सभासद करणे.
७)मच्छीमारी करण्यासाठी इतर समाजाच्या लोकांना प्राधान्य देणे.
       अशा अनेक प्रकारच्या समस्यांमुळे भोई समाजाचे व्यवसाय बंद होत आहेत किंवा इतर समाजाकडे वळत आहेत.
समाज बांधवांनी यावर चिंतन करून भोई समाजातील व्यवसायात इतरांची घुसखोरी थांबवली पाहिजे. यावर चिंतन होणे गरजेचे आहे.
 💐 जय भोईराज💐
 लेख
श्री.दिपकभाऊ भोई चाळीसगाव

Wednesday, April 22, 2020

मुला मुलींच्या पालकांनी लग्नासबंधीत विचार बदलण्याची गरज....


 मुला मुलींच्या पालकांनी लग्नासबंधीत विचार बदलण्याची गरज....

आज समाजातील बरेचसे तरूण,तरूणी यांना गुणवत्ता व  व्यावसायिक शिक्षण या अभावी खाजगी वा सरकारी नोकर्‍या मिळू शकत नाही.सुरवातीला तुटपुंज्या व कमी पगारावर नोकरी करून अनुभव घेवून नोकरी करीत नाही.(स्ट्रगल करावा लागतो हेच त्यांना व त्यांच्या पालकांना कळत नाही.)
यामुळे वय वाढत जाते.
शिक्षण वा नोकरीमुळे पालकांच्या अवाजवी अपेक्षा वाढतात.खाजगी , जरी चांगली नोकरी असली तरी असे मुलाचे स्थळ नको असते.जर असली तर कमीत कमी 30—40 हजाराची नोकरी असावी.कमी शिकलेला नको.तो स्वतंत्र एकटा रहाणारा असला पाहिजे,शक्यतो स्वत:चे घर असले पाहिजे.अशा अनेक वधूपित्यांच्या अपेक्षा असतात.
तर मुलेही नोकरीवाली वा नोकरी करू शकणारी , उच्चशिक्षित असावी.सुंदर व गोरी  असावी.वधूपित्याची आर्थिक स्थिती चांगली असावी.अशा अपेक्षा असतात.
ह्या अपेक्षांमुळे वये वाढत आहेत.
 मुलींच्या पालकांना नम्र विनंती👏
नुसता Biodata बघुन न थांबता प्रत्यक्ष स्थळाला भेट देऊन परिस्थिती पाहणी करा मग निर्णय घ्या. प्रत्येकाला सरकारी नोकरी कुठून मिळणार आपण स्वतःच्या मुलांना सरकारी नोकरी लावु शकतो कां? याचा विचार करा, बागायती शेती असेल तर शेतात जाऊन पाहणी करा', घर बसल्या पाकिस्तान सारखे स्वप्न बघू नका.
       शून्यातून जग निर्माण करणारी मुले आहेत आणि श्रीमंतीची वाट लावणारीही मुले आहेत. नुसती डिग्री बघुन निर्णय घेत असाल तर हि तुमची मोठी चूक आहे. बिचारी इंजिनिअर झालेली मुले  Company मधे 8000/- पगाराने सुपरव्हिजन करतात. पोलिस भरतीत जाऊन बघा तुम्हाला ज्या डिग्रीची मुले पाहिजेत ते मुल बिचारे रांगेत उभे राहतात. कदाचित त्या रांगेत आपलाही मुलगा असू शकतो याचा विचार करा आणि प्रत्यक्ष स्थळ बघा मगच निर्णय घ्या. आणि नुसती डिग्रीच बघायची असेल तर रात्री 9:00 नंतर बियरबार मधे जाऊन बघा अनेक डिग्रीवाले दिसतील. बिचाऱ्यानां नोकरी मिळत नाही म्हणून गम भूलाने की दवासे प्यार करते है ! आज अनेक मुलींचा बायोडाटा बघून हसावेसे वाटते कारण जन्मतारीख बघा बऱ्याच मुली 25 ते 28 वर्षाच्या आहेत. त्यांच्या ईच्छा, भावना यांचा विचार करत नाही. आजच्या युगात आयुष्य सरासरी 60 वर्ष आहे, 30 वर्षात कोणते सुख मिळवायचे. 
 सरकारी नोकरीच्या दुकानावर जा आणि नोकरी मागा 1,00,000/-रू आम्ही देतो आम्ही नोकरीची वाट पाहतो.
  आजची  परिस्थिती तर फार गंभीर आहे.. "अन्न" सर्वांनांच हवंय..पण.. "शेतकऱ्याशी लग्न " करावं असं कोणालाच वाटत नाही.. "पाणी" सर्वांनाच हवंय.पण.. "पाणी"  वाचवावेसे कोणालाच वाटत नाही.. "सावली" सर्वांनाच हवीय..पण.. "झाडे"
 लावावी व ती जगवावी असे कोणालाही वाटत नाही.. "सुन" सर्वांनाच हवीं आहे.. पण.. "मुलगी"व्हावी असं कोणालाच वाटत नाही.. विचार करावा असे प्रश्न...पण.. विचार करावा असं कोणालाच वाटत नाही.. 
 👏चुकभुल क्षमस्व....👏

👍कटू आहे पण सत्य आहे👍
🙏🙏🙏🙏🙏
🌹🌹🌹🌹🌹
सदैव आपलेच

भोई समाज युवा मंच महाराष्ट्र

Tuesday, April 21, 2020

कन्या जन्माचा सत्कार उपक्रम ग्रुप, शहादा


कन्या जन्माचा सत्कार उपक्रम ग्रुप, शहादा जि. नंदुरबार (बेटी बचाओ - बेटी पढाओ)
 
मुलगी जन्माला आली की तिला आपण समाजात जास्त महत्त्व देत नाही, कारण आपल्या मते वंशाचा दिवा हा मुलगा असतो म्हणूनच मुलाला समाजात महत्वाचे मानले जाते. आणि मुलीला नकारात्मकतेच्या नजरेने पाहिले जाते, आणि महत्व ही दिले जात नाही.
पण शहादा येथील भोई समाजातील युवकांच्या संकल्पनेतून समाजापुढे एक नवीन आदर्श निर्माण झाला आहे. सन २०१७ पासून कन्या जन्माचा सत्कार उपक्रम ह्या युवकांनी शहादा भोई समाजात सुरू केला, सुरवातीस या सत्काराचे स्वरूप असे होते की, शहादा शहरातील भोई समाजात नवजात जन्मलेली कन्या आणि तिच्या परिवाराचा श्री.राजा खेडकर सर (राजकुमार) यांच्याकडून पुष्पगुच्छ, तर श्री. धनेश्वर भोई यांच्याकडून पेढे आणि छोटीशी आर्थिक मदत देऊन सत्कार केला जायचा.
 नंतर ह्या सत्काराचे स्वरूप बदलले आणि सण २०१८ मध्ये श्री. नरेंद्र हिरालाल वाडीले ऊर्फ नरु भाऊ (तालुकाध्यक्ष - भोई समाज, शहादा) यांनी प्रत्येक सत्काराच्या वेळी ३१०० रुपयाची भेट फिक्स डिपॉझिट म्हणून कन्येच्या च्या स्वागतासाठी देऊ केली, तसेच श्री. जितेंद्र हिरालाल वाडीले (वाडीले सर) यांच्याकडून प्रत्येक सत्कारावेळी १०० रुपयाची भेट ह्या समाज बांधवांकडून दिली जाते.
कन्या जन्माचा पहिल्या सत्काराची सुरुवात राम नगर, शहादा येथील श्री. किशोर वामन साठे यांना कन्यारत्न झाल्याबद्दल ९ जानेवारी २०१७ मध्ये करण्यात आला आणि आतापर्यंत एकुण ३६ परिवाराचा कन्या जन्माचा स्वागताचा सत्कार उपक्रम शहादा शहराच्या विविध भागात असणाऱ्या भोई समाज बांधवांच्या घरी जाऊन  करण्यात आला आहे, ह्या सत्कारावेळी अशा कन्येचा सत्कार केला जातो , की ज्या घरात कन्या जन्माला येते म्हणजेच ( शहादा शहरात असलेली सून आणि नवीन जन्मलेली कन्या , कन्येचे वडील आणि त्यांचा परिवार म्हणजे सुनेच्या सासरवाडीत पुष्पगुच्छ, पेढे, आणि ३१०० रुपयाची मुलीच्या नावे फिक्स डिपॉझिट बँकेत जमा केली जाते, सोबत सुनेचा ही सन्मान केला जातो ) तसेच (माहेरी असणाऱ्या मुलीला जर कन्यारत्न प्राप्त झाली तर त्या कन्येचा आणि परिवाराचा पुष्पगुच्छ, पेढे, आणि छोटीशी मदत म्हणून 100 ₹ दिले जातात). अशा प्रकारे वरीलप्रमाणे सत्कार उपक्रम राबविला जातो,

ह्या सत्काराच्या वेळी आम्ही कन्या जन्माचे महत्त्व पटवून देतो आणि समाजात त्यांना त्यांचा योग्य तो मान सन्मान दिला गेला पाहिजे असे सांगितले जाते आणि पाहायला गेलं तर वडिलांची काळजी ही मुलगीच घेत असते, आणि ती सर्वांची काळजी घेते म्हणून ती बापाची लाडकी असते, म्हणूनच उपक्रमाचा उद्देश हा बेटी बचाओ - बेटी पढाओ आहे असे सांगितले जाते,तसेच समाजातील मान्यवरांच्या हस्ते कन्या जन्माचा स्वागताचा कार्यक्रम केला जातो,
                  तसेच कन्याबद्दल जनजागृती निर्माण केली जाते, अशा प्रकारे कन्या जन्माचा सत्कार उपक्रम ग्रुप, शहादा येथील समाज बांधव गेल्या ३ वर्षांपासून असा अनोखा उपक्रम आनंदात करीत आहेत.
                      ह्या उपक्रमाबद्दल संपूर्ण नंदुरबार जिल्हा भोई समाजात कौतुक केले जात आहे. तसेच उपक्रमाची दखल घेत नंदुरबार जिल्हयात भोई समाजबांधवांनी हा उपक्रम नंदुरबार, प्रकाशा, धडगाव, पिंगाणे, तळोदा इ. गावामध्ये सुरू केला, तसेच इतर समाजातही उपक्रमाची दखल घेत शहादा, नंदुरबार ,लोणखेडा, सुलतानपुर येथे  सुरू केला आहे. आणि शेजारी असलेल्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात पंचायत समिती मध्ये ही अशाप्रकारचा सत्कार उपक्रम राबविण्यात आला.

हा उपक्रम नंदुरबार जिल्हयात सर्वप्रथम श्री. मिलिंद वाडीले यांनी सुरू करण्याचा मानस केला, आणि त्यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली, तसेच सोबत युवक ही खांद्याला खांदा लावून उपक्रम चांगल्यारित्या पार पाडत आहेत.

कन्या जन्माचा सत्कार उपक्रम ग्रुप, शहादा दरवर्षी राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त म्हणजेच कन्येच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी कलाकौशल्य म्हणून रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा , नृत्य स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम  घेऊन तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय कार्यक्रम  बेटी बचाओ - बेटी पढाओ,कन्या, स्त्री भ्रूण हत्या इ.विषयावर आयोजित केले जातात,

 तसेच समाजातील गोरगरीब जनतेला संकटकाळी सर्वोतोपरी मदत ह्या ग्रुप तर्फे केली जाते ,

ह्या वर्षाच्या सांस्कृतिक कार्यक्रमातील समाजबांधवांच्या लोकवर्गणीतून जी उर्वरित वर्गणी आहे ती अंध, अपंग, अनाथाश्रम यांना दिली जाणार आहे.

तसेच समाजासाठी मार्गदर्शन करणारे आणि युवा समाजसेवक यांना राष्ट्रीय युवा दिनानिमित्त स्वामी विवेकानंद यांची प्रतिमा भेट म्हणून दिली जाते.

उपक्रमाचे वैशिष्ट्ये - गरजू व्यक्तींना ग्रुपतर्फे रक्तदान केले जाते (रक्त दिले जाते)

सण  २०१८  मध्ये संकल्प ग्रुप, शहादा यांनी गणेशोत्सव स्पर्धेत शहादा शहरात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या समाज बांधव आणि ग्रुप म्हणजेच (बेटी बचाओ- बेटी पढाओ) कन्या जन्माचा सत्कार उपक्रमास सदर कार्यक्रमास उपस्थिती तत्कालीन जिल्हाधिकारी मल्लीनाथ कलशेट्टी साहेब यांच्या उपस्थितीत गौरव चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले, हा ग्रुपचा पहिला सन्मान केला.

 ह्या उपक्रमाचे प्रेरणास्थान श्री. नरेंद्र हिरालाल वाडीले , नरुभाऊ (तालुकाध्यक्ष - भोई समाज, शहादा). हे आहेत

अभिमानाची आणि आनंदाची बाब म्हणजे ह्या उपक्रमाला अध्यक्षांच्या नावे १४ सप्टेंबर २०१९ रोजी अन्याय अत्याचार निर्मूलन समिती, धुळे यांनी समाजरत्न पुरस्कार दिला,  त्यानंतर धुळे येथील धुळे जिल्हा भोई समाज महासंघाच्या वतीने २० ऑक्टोबर २०१९ रोजी श्री. नरेंद्र वाडीले आणि श्री. मिलिंद वाडीले यांना समाजभूषण पुरस्कार दिला, नागपूर येथील भोई गौरव मासिकाच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त भोई गौरव पुरस्कार २ डिसेंबर २०१९ रोजी देण्यात आला. मिलिंद वाडीले यांना प्रदान करण्यात आला, यामुळे उपक्रम ग्रुपला स्फुर्ती मिळाली.

कन्या जन्माचा सत्कार उपक्रमातील कार्यकारणी खालीलप्रमाणे
अध्यक्ष - श्री. मिलिंद हिरालाल वाडीले, राम नगर, शहादा
उपाध्यक्ष - श्री. राजा काशिनाथ  खेडकर (राजकुमार) , शहादा
सचिव - स्वप्निल आधार मोरे ,शहादा
कोषाध्यक्ष - श्री. धनेश्वर प्रकाश भोई, शहादा 
संघटक -  श्री.किशोर नथ्थु मोरे , शहादा 
सल्लागार - श्री. विजय लक्ष्मण वाडीले ,शहादा (दादू वाडीले)
सदस्य - नंदिनी मोरे, वंशिका वाडीले,अंकिता वाडीले,  महिमा सोनवणे , विलास मोरे, राजेंद्र मोरे, स्वप्निल मोरे, प्रशांत सोनवणे, अविनाश मोरे, सुनिल मोरे, जितेंद्र वाडीले सर, छोटू वाडीले, बाळा साठे, कल्पेश वाडीले, मनोज वाडीले, लखन तावडे, योगेश मोरे, राहुल वाडीले, सागर वाडीले, राहुल नूक्ते, योगेश नूक्ते,अविनाश वाडीले आदी उपक्रमातील सदस्य आहेत.

माहिती संकलन :- स्वप्निल आधार मोरे आणि उपक्रमातील सदस्य यांच्याकडून माहिती प्राप्त झाली आहे.

Monday, April 20, 2020

स्वाभिमानी मी जातीन भोई


       स्वाभिमानी मी जातीन भोई..... 
           कवी:श्री चेतन मोरे सर नवापूर जि.नंदुरबार
        _सर्व समाज बांधवांना माझा जय भोईराज_*
  आपल्या या भोई समाजाची महती मांडावी तेवढी कमीच आहे तरी पण मी माझ्या जीवनात पाहिलेला, ऐकलेला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पणे अनुभवलेला आपला ह्या स्वाभिमानी भोई समाजावर काही लय बद्ध ओळी.....
👇👇👇👇

स्वाभिमानी मी जातीन भोई
_स्वाभिमानी मी जातीन भोई.._

चणा फुटाणा भट्टीवर फोडी
  नदी तलाव मा मासा बी मारी
ओळख मनी हौज प्रमुख व्यवसायी
_स्वाभिमानी मी जातीन भोई...._


माणुसकी धर्म सदा पुढे नेई
दयावान मी भावनिक हृदयी
हार मानायला जीवनात शिकलोच नाही
_स्वाभिमानी मी जातीन भोई..._


गरीब मी श्रीमंत खूब नाही
आली दरिद्री तरी घाबरत नाही
ताठ मानेने सदा जगत राही
_स्वाभिमानी मी जातीन भोई...._

स्वाभिमानी हा कधी झुकत नाही
याचा फायदा पुढारी घेई
हिम्मतीवर भोईचा तो नेता होई
हा बिचारा दोस्ती यारी निभावत राही
_स्वाभिमानी मी जातीन भोई..._

कमी हा भोई कुठेच नाही
मागे पडतो कारण संघटित नाही
तुझ्यात आहे कौशल्य तू वापर रे भोई
संघटित होण्याचा कर बाबा निश्चई
_स्वाभिमानी मी जातीन भोई..._

अशिक्षित नाहीच तू उच्च शिक्षित हाई
तरी का वागतोस अनाडी वाणी
Unity Is The Strength हे काय तुला ठाऊक नाही
_स्वाभिमानी मी जातीन भोई..._

एकजुटीने लढ
आपण जिंकू हक्काची लढाई
दुनियेला आपण दाखवून देवू
भोई राजा आहे हा पालखीचा भोई
_स्वाभिमानी मी जातीन भोई..._

🌹💐🌹💐🌹💐🌹
कवी:श्री चेतन मोरे सर
*_भोईसमाज युवामंच अध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र विभाग_*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Sunday, April 19, 2020

शुभारंभ वधु वर नोंदणीचा.....

🚩 *जय भोईराज* 🚩

                *शुभारंभ...!!!!*
💐☘️💐☘️💐☘️💐☘️💐☘️💐

*वधु - वर परीचय नोंदणीचा*
✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻

*औचित्य मत्स्यसहकार महर्षी स्व.खा. जतिरामजी बर्वे साहेब जयंती उत्सव सोहळा २१ एप्रिल २०२०*


सर्व समाज बांध‌व व पालकांना मानाचा जय भोईराज कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे कि भोईसमाज युवा मंच आपल्या सेवेत वधु वर परीचय नोंद आपल्या ब्लॉग च्या माध्यमातुन करण्याचा शुभारंभ करीत आहोत हि नोंद मोफत असुन सर्व पालक व समाज बांधवांनसाठी खुली असेल चला तर मग जाणुन घेऊया नोंदणी कशी करावी.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

*नोंदणीसाठी कृपया खाली दिलेल्या मार्गाचा अवलंब करावा :-*

१.  जय भोईराज म्हणुन
वधु/वर परीचय खाली दिलेल्या मायन्या मध्ये द्यावा.
               वधू / वर परिचय
               
नाव             :- 
जन्म दिनांक  :-
जन्म वेळ    :-
रंग            :-   
ऊंची         :-   
शिक्षण      :-   
व्यवसाय      :- 
वेतन         :- 
अपेक्षा      : -
बहीण/भाऊ     :- 
मूळ गाव :-
मामाचे नाव:-
मामाचे गाव:-
वडिलांचे नाव :-
पालकांचा संपूर्ण पत्ता:
पालकांचा संपर्क क्रमांक :-

२. सदर परीचय पुर्ण भरुण
निलेश वाडिले- 9011494777
निलेश साटोटे- 9975054010
चेतन मोरे- 9403717446
महारू शिवदे- 9260691964
राहुल भोई- 8999964366
या वॉट्स अप नंबर वर पाठवावा.

३. आपण दिलेला परीचय ब्लॉग वर टाकुन आपणा पर्यंत ब्लॉगची लिंक शेअर केली जाईल.

४. या लिंक वर आपण वेळो वेळी भेट देऊन आपल्या पाल्यांसाठी साजेसा वधु-वर शोधु शकता.

*काहि महत्वपुर्ण सुचना आपल्या सर्वांच्या हितासाठी*
१. वधु किंवा वर यांच्या परीचयाची माहिती हि पालकामार्फत किंवा त्यांच्या परवानगीनेच पाठवावी.

२. वधु व वर यांनी परीचया सोबत आपले फोटो पाठवु नये फोटोचा गैरवापर होऊ नये म्हणुन आपण हि काळजी घेत आहोत तसेच थेट संपर्क होऊन दोन परीवारांचा परीचय वाढवा हा एक शुद्ध मानस या माध्यमातुन आहे.

३. संपर्क क्रमांक पालकांचाच असने बंधनकारक आहे वधु अथवा वरांना विनंती आहे कि परीचयात स्वःताचे संपर्क नंबर देऊ नयेत.

४. कृपया परीचय पाठवितांना अनअोळखी व्यक्तीचे परीचय पाठवु नये शहानिशा करतांना आढळुन आल्यास तो परीचय ब्लॉगवर नोंद केला जाणार नाहि.

५.वधु वर परिचय नोंदणी पूर्णपणे मोफत आहे याची सर्व समाज बांधव यांनी नोंद घ्यावी.

६.वधु वरांची खरी माहिती देणे   ही प्रत्येक पालकांची जबाबदारी आहे.

७.ब्लॉग वर असलेल्या वधु वर स्थळांची सत्यता तपासणी ही वधु वर पालकांची वैयक्तिक जबाबदारी आहे. याची नोंद घ्यावी.भविष्यात कोणताही प्रश्न उपस्थित झाल्यास त्यास संघटना जबाबदार राहणार नाही.

८.ब्लॉग ला नाव नोंदणी केल्यावर विवाह जमेलच याची खात्री संघटना देउ शकत नाही.

९.ब्लॉग वर असलेल्या माहितीचा कोणीही गैरवापर करू नये.तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

१०.ब्लॉगमुळे आपला विवाह जुळून आल्यास तसे आमच्या पदाधिकारी यांना कळवावे

११.वरील नियम व अटी मध्ये बदल करण्याचा अधिकार भोई समाज युवा मंच महाराष्ट्र ने राखून ठेवला आहे.


 *टीप:फक्त वर दिलेल्या पदाधिकारी यांच्याकडे दिलेले वधू वर परिचयच ब्लॉग वर टाकले जातील.*
*दिलेल्या सुचनांचे काटेकोर पणे पालन करुन सहकार्य करावे.*


आपलाच-
श्री निलेश दिलिप वाडिले
महासचिव,
भोईसमाज युवा मंच महाराष्ट्र
Website:bhoisamajyuvamanch1.blogspot.com

Saturday, April 18, 2020

आरक्षण SC का ST? लेख:-रोहितभाऊ शिंगाने

आरक्षण SC का ST? लेख:-रोहितभाऊ शिंगाने

 कोणत्या आधारावर आपण एसटी ची मागणी करणार आहात?
फक्त कोर्टात दावा टाकुन काय उपयोग?  त्याला काहीतरी आधार हवा आहे.

काहींनी एसटी , काहींनी एससी मागणी केली तर सरकार ठणकावणार नाही का की आधी तुमच्यातच नीट ठरवा म्हणून!!

*_सर्व सन्माननिय बांधवांनो ,  माझ्या अभ्यासानुसार खालील बाबी लक्षात घ्या :-_*

1. आपण _एससी_ किंवा _एसटी_ मागणी केली की लगेच देऊन टाकतील असे होणार नाही!
 2. एससी साठीचे व एसटी साठीचे कोणतेही _ठोस पुरावे नाहीत!_
3. 1936 ते 1950 चे एससी चे जे काही उपलब्ध पुरावे आहेत ते _अखंड महाराष्ट्र होण्या अगोदरचे आहेत._ ते पुरावे कोर्टात किती प्रमाणात ग्राह्य धरले जातील माहित नाही.
4. मीरा कुमार, लोकसभा अध्यक्ष व इतर एससी खासदार यांनी स्पष्ट ताकीद दिली होती की _एससी मागणी केली तर आम्ही तुमच्या मागणीला केराची टोपली दाखवू._
या कारणास्तव घाबरून जाऊन आपले ज्येष्ठ समाजसेवकांनी अकारण पुरावे नसतांना एसटी ची मागणी सुरू केली!
5. एससी किंवा एसटी मागणी करून,  समजा ती मागणी मान्य झाली,  तरी त्या त्या समाजातील लोकं उठाव करणारच,  कारण त्यांच्या आरक्षणात आपण हिस्सा बनू!
6. आपण Nomadic *Tribes*,  अर्थात *जमाती* आहोत. जर एससी मागणी मंजूर झाली तर आपण अनुसूचित *जातीत* समाविष्ठ होऊ. एकदाचे जातीत गेलो तर पुन्हा जमातीत येणे मुश्किल राहिल. कारण _भारतीय संविधान अनुसार   जमात ही जात असू शकते,  पण जात ही जमात असुच शकत नाही_, म्हणुन येथेही काळजी घेणे गरजेचे आहे.
7. समजा एससी किंवा एसटी मिळाले , तर *एन टी मधुन काढुन टाकले जाईल*. नंतर त्या समाजाने उठाव केला व एससी एसटी मधुन काढले,  तर *पुन्हा एनटी मिळवण्यासाठी लढावे लागु शकते* याचाही विचार करायला हवा.
8. याला उपाय म्हणून एससी किंवा एसटी ची मागणी न करता _भोईंची जणगणना करून लोकसंख्या नुसार 5_6% आरक्षण मागणी करता येणे शक्य होत असेल तर तशी करावी काय याचा विचार करायला हवा_
कारण त्या मागणीला विरोध करण्यासाठी कोणी विरोधी नसतील.


या वरील अभ्यासामुळे मी कोर्टात  जाण्याच्या घाईत नाही व कोणी जावे अशी शिफारस देखील करत नाही. अजून थोडा नीट अभ्यास करून एका विशिष्ट निर्णयावर शिक्कामोर्तब करायला हवा.

ही महत्वपूर्ण माहिती आपल्याला काय निर्णय घ्यायचा आहे,  त्यासाठी देतो आहे.

*_सर्वांना विनंती आहे की उगाच घाई गडबड करुन समाजाचे नुकसान होणार नाही हे पाहावे._*

  जय भोईराज
-इंजि.  रोहितभाऊ शिंगाणे,  धुळे
- समन्वयक, आरक्षण समिती
- भोई समाज सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
(मॅनेजिंग डायरेक्टर
लक्ष्मी कन्स्ट्रक्शन)