Wednesday, April 22, 2020

मुला मुलींच्या पालकांनी लग्नासबंधीत विचार बदलण्याची गरज....


 मुला मुलींच्या पालकांनी लग्नासबंधीत विचार बदलण्याची गरज....

आज समाजातील बरेचसे तरूण,तरूणी यांना गुणवत्ता व  व्यावसायिक शिक्षण या अभावी खाजगी वा सरकारी नोकर्‍या मिळू शकत नाही.सुरवातीला तुटपुंज्या व कमी पगारावर नोकरी करून अनुभव घेवून नोकरी करीत नाही.(स्ट्रगल करावा लागतो हेच त्यांना व त्यांच्या पालकांना कळत नाही.)
यामुळे वय वाढत जाते.
शिक्षण वा नोकरीमुळे पालकांच्या अवाजवी अपेक्षा वाढतात.खाजगी , जरी चांगली नोकरी असली तरी असे मुलाचे स्थळ नको असते.जर असली तर कमीत कमी 30—40 हजाराची नोकरी असावी.कमी शिकलेला नको.तो स्वतंत्र एकटा रहाणारा असला पाहिजे,शक्यतो स्वत:चे घर असले पाहिजे.अशा अनेक वधूपित्यांच्या अपेक्षा असतात.
तर मुलेही नोकरीवाली वा नोकरी करू शकणारी , उच्चशिक्षित असावी.सुंदर व गोरी  असावी.वधूपित्याची आर्थिक स्थिती चांगली असावी.अशा अपेक्षा असतात.
ह्या अपेक्षांमुळे वये वाढत आहेत.
 मुलींच्या पालकांना नम्र विनंती👏
नुसता Biodata बघुन न थांबता प्रत्यक्ष स्थळाला भेट देऊन परिस्थिती पाहणी करा मग निर्णय घ्या. प्रत्येकाला सरकारी नोकरी कुठून मिळणार आपण स्वतःच्या मुलांना सरकारी नोकरी लावु शकतो कां? याचा विचार करा, बागायती शेती असेल तर शेतात जाऊन पाहणी करा', घर बसल्या पाकिस्तान सारखे स्वप्न बघू नका.
       शून्यातून जग निर्माण करणारी मुले आहेत आणि श्रीमंतीची वाट लावणारीही मुले आहेत. नुसती डिग्री बघुन निर्णय घेत असाल तर हि तुमची मोठी चूक आहे. बिचारी इंजिनिअर झालेली मुले  Company मधे 8000/- पगाराने सुपरव्हिजन करतात. पोलिस भरतीत जाऊन बघा तुम्हाला ज्या डिग्रीची मुले पाहिजेत ते मुल बिचारे रांगेत उभे राहतात. कदाचित त्या रांगेत आपलाही मुलगा असू शकतो याचा विचार करा आणि प्रत्यक्ष स्थळ बघा मगच निर्णय घ्या. आणि नुसती डिग्रीच बघायची असेल तर रात्री 9:00 नंतर बियरबार मधे जाऊन बघा अनेक डिग्रीवाले दिसतील. बिचाऱ्यानां नोकरी मिळत नाही म्हणून गम भूलाने की दवासे प्यार करते है ! आज अनेक मुलींचा बायोडाटा बघून हसावेसे वाटते कारण जन्मतारीख बघा बऱ्याच मुली 25 ते 28 वर्षाच्या आहेत. त्यांच्या ईच्छा, भावना यांचा विचार करत नाही. आजच्या युगात आयुष्य सरासरी 60 वर्ष आहे, 30 वर्षात कोणते सुख मिळवायचे. 
 सरकारी नोकरीच्या दुकानावर जा आणि नोकरी मागा 1,00,000/-रू आम्ही देतो आम्ही नोकरीची वाट पाहतो.
  आजची  परिस्थिती तर फार गंभीर आहे.. "अन्न" सर्वांनांच हवंय..पण.. "शेतकऱ्याशी लग्न " करावं असं कोणालाच वाटत नाही.. "पाणी" सर्वांनाच हवंय.पण.. "पाणी"  वाचवावेसे कोणालाच वाटत नाही.. "सावली" सर्वांनाच हवीय..पण.. "झाडे"
 लावावी व ती जगवावी असे कोणालाही वाटत नाही.. "सुन" सर्वांनाच हवीं आहे.. पण.. "मुलगी"व्हावी असं कोणालाच वाटत नाही.. विचार करावा असे प्रश्न...पण.. विचार करावा असं कोणालाच वाटत नाही.. 
 👏चुकभुल क्षमस्व....👏

👍कटू आहे पण सत्य आहे👍
🙏🙏🙏🙏🙏
🌹🌹🌹🌹🌹
सदैव आपलेच

भोई समाज युवा मंच महाराष्ट्र

No comments:

Post a Comment

🚩🚩🚩 जय भोईराज....🚩🚩🚩