Tuesday, June 23, 2020

समाजासाठी चांगले कार्य करण्याचा प्रयत्न करा...


समाजासाठी चांगले कार्य करण्याचा प्रयत्न करा व आदर्श जीवन जगा...
महारू शिवदे जळगाव


                        ✍️शुद्ध आचार, विचार, निष्कलंक जीवन, जीवनात त्याग आणि अपमान सहन करण्याची शक्ती ही पाच तत्त्वे ज्यांच्याजवळ असेल तो समाजात परिवर्तन आणि देशाचा विकास करूशकतो. जन्म आणि मरणाच्यावेळी आपण काही घेऊन जात नाही, त्यामुळे समाजासाठी जे काही चांगले कार्य करता येईल ते करण्याचा प्रयत्न करा आणि आदर्श जीवन जगा,आजचा युवक हा देशाची खरी शक्ती असून तीच समाजात परिवर्तन करू शकते हे अनेकदा आंदोलनातून सिद्ध झाले आहे. युवकांमुळे अनेक देशात क्रांती झाली ते देश विकसनशील देश म्हणून ओळखली जात आहे. आपल्यामध्ये ती शक्ती आहे. मात्र, त्याचा उपयोग ज्या पद्धतीने केला पाहिजे तो केला जात नाही. जन्माला येतो त्यावेळी आपण काही घेऊन येत नाही आणि मरण येते तेव्हा काही घेऊन जात नाही. तरीही आयुष्य जगत असताना हे माझे आहे, ते तुझे आहे, तेही माझे आहे, असे करीत आयुष्यात भांडत असतो. या मानसिकतेतून बाहेर येण्याची गरज आहे. आपल्याला जन्म हा निष्काम सेवेसाठी मिळाला आहे ही मानसिकता ठेवून काम केले तर जीवनाचे सार्थक होते आणि काम करण्याचा आनंद मिळतो. प्रपंच करावा. मात्र, तो करताना केवळ आपल्या घरापुरता सिमित न ठेवता समाजासाठी आपण काय करू शकतो त्याचाही विचार करावा.
    रेल्वे स्थानकावर फिरत असताना स्वामी विवेकानंदांचे पुस्तक हाती लागल्यावर ते वाचले आणि त्या दिवसांपासून समाजसेवा करण्याचा निर्णय घेतला. तरी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत या समाजाच्या व राष्ट्राच्या विकासासाठी लढत राहणार आहे. सेवेचा आनंद हा वेगळा असतो. तो प्रत्येकाच्या जीवनात येत नाही. भ्रष्ट,खोटे बोलणारे,फुट पाडणारे,लावा लावी करणारे,एकत्रीकरण न होऊ देणारे,स्वार्थी  असे लोंक आजु बाजुला  खूप आहे. मात्र, ती आज सुखी नाही. त्यांना सुखाने झोप घेता येत नाही.माझ्याजवळ  जे आहे ते मी समाजकार्य केलेल्या समाज बाधंवाचा आशिर्वाद  स्वरूपात मिळाले आहे ते सर्व समाजसेवेसाठी आहे. आजचा युवक भरकटला असून त्यांच्याजवळ विचार नाही, असे बोलले जात असले तरी त्यात तथ्य नाही. युवकांना योग्य दिशा दिली तर त्यांच्यामध्ये बदल होऊ शकतो, हे विविध कार्यातुन सिद्ध झाले आहे. युवकांची मोठी शक्ती समाजकार्यात सहभागी झाली तर. त्यांच्यामुळे समाजात काही प्रमाणात परिवर्तन होऊ शकते
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*महारू भाऊ शिवदे*
 *जळगांव*
*भोई समाज युवा मंच महाराष्ट्र*

No comments:

Post a Comment

🚩🚩🚩 जय भोईराज....🚩🚩🚩