🚩 जय भोईराज🚩
वधु - वर परीचय नोंदणीचा भोईसमाज युवा मंच आपल्या सेवेत वधु वर परीचय नोंद आपल्या ब्लॉग च्या माध्यमातुन करण्याचा शुभारंभ करीत आहोत हि नोंद मोफत असुन सर्व पालक व समाज बांधवांनसाठी खुली असेल.
वधु वर परिचय नियम व अटी
१. वधु किंवा वर यांच्या परीचयाची माहिती हि पालकामार्फत किंवा त्यांच्या परवानगीनेच पाठवावी.
२. वधु व वर यांनी परीचया सोबत आपले फोटो पाठवु नये फोटोचा गैरवापर होऊ नये म्हणुन आपण हि काळजी घेत आहोत तसेच थेट संपर्क होऊन दोन परीवारांचा परीचय वाढवा हा एक शुद्ध मानस या माध्यमातुन आहे.
३. संपर्क क्रमांक पालकांचाच असने बंधनकारक आहे.वधु अथवा वरांना विनंती आहे कि परीचयात स्वःताचे संपर्क नंबर देऊ नयेत.
४. कृपया परीचय पाठवितांना अनअोळखी व्यक्तीचे परीचय पाठवु नये शहानिशा करतांना आढळुन आल्यास तो परीचय ब्लॉगवर नोंद केला जाणार नाहि.
५.वधु वर परिचय नोंदणी पूर्णपणे मोफत आहे याची सर्व समाज बांधव यांनी नोंद घ्यावी.
६.वधु वरांची खरी माहिती देणे ही प्रत्येक पालकांची जबाबदारी आहे.
७.ब्लॉग वर असलेल्या वधु वर स्थळांची सत्यता तपासणी ही वधु वर पालकांची वैयक्तिक जबाबदारी आहे. याची नोंद घ्यावी.भविष्यात कोणताही प्रश्न उपस्थित झाल्यास त्यास संघटना जबाबदार राहणार नाही.
८.ब्लॉग ला नाव नोंदणी केल्यावर विवाह जमेलच याची खात्री संघटना देउ शकत नाही.
९.ब्लॉग वर असलेल्या माहितीचा कोणीही गैरवापर करू नये.तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
१०.ब्लॉगमुळे आपला विवाह जुळून आल्यास तसे आमच्या पदाधिकारी यांना कळवावे
११.वरील नियम व अटी मध्ये बदल करण्याचा अधिकार भोई समाज युवा मंच महाराष्ट्र ने राखून ठेवला आहे.
टीप:फक्त वर दिलेल्या पदाधिकारी यांच्याकडे दिलेले वधू वर परिचयच ब्लॉग वर टाकले जातील.
भोईसमाज युवा मंच महाराष्ट्र
जय भोईराज
ReplyDelete