भोई समाज वधु वर परिचय मेळावा पुस्तिका 23 मे 2021

 




भोई समाज युवा मंच महाराष्ट्र व संलग्न संघटना 23 मे 2021 रोजी आयोजित भोई समाज वधु वर परिचय मेळावा पुस्तिका डाऊनलोड करण्यासाठी खाली लिंक ला क्लिक करा.....

                       Download 


 

 महत्वाचे.....

सर्व समाज बांधवांना सप्रेम जय भोईराज...

उद्देश -

आपणास माहिती आहे की मागील दोन वर्षापासून देशात covid-19 थैमान घातले आहे आणि याची झळ विविध क्षेत्रात सर्वांनाच सोसावी लागत आहे. आपल्या समाजातील अनेक मुला मुलींचे लग्नाचे वय झाले असून दोन वर्षापासून समाजात कुठलेही परिचय मेळावे झाले नसल्याने मुला-मुलींच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते, तसेच स्थळ पाहणे कठीण झाले आहे. अशा या परिस्थितीत समाजासाठी काय करता येईल या विचाराने प्रेरित होऊन व प्रत्यक्ष वधु वर परिचय मेळावा होणे शक्‍य नसल्यामुळे

23 मे 2021 रोजी भोई समाज युवा मंच महाराष्ट्र विदर्भ विभाग व संलग्न संघटना यांच्यामार्फत विनामूल्य भोई समाज जाती उपजाती यांचा ऑनलाईन वधू वर परिचय मेळावा 2021 आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमात सर्व समाज बांधवांनी भरभरून सहभाग दाखवला व आम्हाला सहकार्य केले त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो.

या उपक्रमात सहभागी व संग्रहित झालेले सर्व मुला मुलींचे परिचयाचे पीडीएफ पुस्तिका तयार करण्यात आली आहे. हे सर्व उपक्रम समाजबांधवांसाठी विनामूल्य होते.

या पुस्तिका बद्दल थोडक्यात....

या पुस्तिकेत प्रत्येक परिचयाच्या वर सांकेतांक दिला गेला आहे. जसे B1,B2...../G1,G2....(Bride- वधू/Groom- वर). या संख्येत अंकाच्या उपयोग वधु वर यांच्या पालकांना एकमेकांच्या परिचय शोधण्यासाठी व्हावा या उद्देशाने देण्यात आले आहेत.

परीचय पुस्तिकेत आलेले परीचय फक्त बेसिक माहिती दिलेली आहे त्यांची शहानिशा करणे तथा सत्यता पडताळने सर्वस्वी पालकांची जबाबदारी असेल.

खबरदारी -

सावधान...    सावधान ....

🚨🚨🚨🚨


   एक चांगला उद्देश घेऊन जिल्हानिहाय समाज बांधवांनी वधु वर परिचय ग्रुप चालु केला आहे ,ज्या मुळे मुलांकडील व मुलींकडील परिवाराचा  धावपळीच्या जगात वेळ वाचतो व दोन परिवारांना एक करण्याचा उद्देश आहे.परंतु काही भामटे याचा गैरफायदा घेत आहेत.

काही  ग्रुप मध्ये भोई समाज विवाह संस्था लग्न जुळवणाऱ्या ग्रुप चे दलाल आहेत.जे लोक आपल्या ग्रुप वर बायोडाटा टाकतात त्यांचे मो.नं.त्या संस्थेकडे देतात मग त्या संस्थेकडुन फोन येतात आम्हि  तुम्हाला चांगले स्थळ दाखवतो.व तुमचे लग्न जुळवुन आणतो. त्या साठी तुम्हाला नोंदनी फार्म फ्री ३५00 रु भरावे लागेल.असे कृत्य काही दलाल लोकांच्या माध्यमातुन ती संस्था करत आहे .अशा लोकांमुळे आपली व ग्रुप ची प्रतीमा मलीन होऊ शकते .आपल्या माहिती करता हि पोस्ट मी करीत आहे .तरी आपण या ग्रुप मधुन जे कोणी दलाली चे काम करीत असणार त्यांनी  ग्रुप मधुन बाहेर पडावे.

.माझ्या समाज बांधवाना नम्र विनंती आहे .आपल्याला जर असे फोन आल्यास आपण त्या संस्थेची शहानिशा करुणच पुढचे काम करावे.

अशा फसवेगिरी करणाऱ्या लोकांपासुन सावधान रहा

आपलाच समाज बांधव

जय भोईराज


टीप: कोणीही अशा दलाल लोकांच्या जाळ्यात अडकू नये.

वधु वरांचे  फोटो सार्वजनिक ग्रुपमध्ये शेयर न करता वैयक्तिक संपर्क साधून करावे.


तुषार साटोटे, प्रदेश अध्यक्ष

चेतन मोरे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष


भोईसमाज युवा मंच महाराष्ट्र

No comments:

Post a Comment

🚩🚩🚩 जय भोईराज....🚩🚩🚩