भोई समाजाचे व्यवसाय बंद होण्याची कारणे... लेख: श्री.दिपक भोई चाळीसगाव
भोई समाजाचा उल्लेख रामायण,महाभारत सह इतर महाकाव्यात दिसतो काळा बरोबरच भोई समाजाच्या उपजिवीकेची साधन देखिल बदलत गेली किंवा काही प्रमाणात तीच राहिली.
आपले पारंपरिक व्यवसाय:
१)राजे महाराज यांची पालखी वाहने.
२)मासेमारी
३)चणे फुटाणे विक्री
४)गाढवावर वाहतूक करणे.
आपले पारंपरिक व्यवसाय:
१)राजे महाराज यांची पालखी वाहने.
२)मासेमारी
३)चणे फुटाणे विक्री
४)गाढवावर वाहतूक करणे.
आता प्रश्न असा आहे की,भोई समाजाचे व्यवसाय बंद पडत आहेत किंवा त्या व्यवसायांवर इतरांनी अतिक्रमण केलेले दिसते. अतिक्रमण होण्यास काही प्रमाणात आपणही जबाबदार आहोत असे मला वाटते कारण
१)जे समाज बांधव आर्थिक द्रुष्ट्या पुढारलेले आहेत त्यांच्याकडे कामगार म्हणून भोई समाजाची मुले नाहित किंवा जे समाज घटक आपल्याकडे कामगार म्हणून भोई समाजाचे मुले ठेवतात ते पाहिजे तसे काम करताना दिसत नाही.
१)जे समाज बांधव आर्थिक द्रुष्ट्या पुढारलेले आहेत त्यांच्याकडे कामगार म्हणून भोई समाजाची मुले नाहित किंवा जे समाज घटक आपल्याकडे कामगार म्हणून भोई समाजाचे मुले ठेवतात ते पाहिजे तसे काम करताना दिसत नाही.
२)भोई समाजाचे व्यवसाय बंद पडण्याचे अजून एक मुख्य कारण म्हणजे आपापसात असलेली स्पर्धा सुरू आहे जसे आपणच इतर समाज बांधवांपेक्षा कमी भावाने विक्री करणे किंवा जास्त भावाने खरेदी करणे.
३) माझ्याकडील माल हा भोई समाजाच्याच इतरांपेक्षा चांगल्या प्रतीचा आहे असे ग्राहकांना सांगणे.
४)आपापसातील स्पर्धा वाढल्यामुळे मेहनत जास्त असते आणि त्यामानाने नफ्याचे प्रमाण कमी होते.
५)सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपली कला ( जाळे विणने,चणे फुटाणे भाजणे,शेंगदाणे खारे करणे,फरसाण तयार करणे) इतर लोकांना माहीत करणे अशामुळे आपले व्यवसाय इतर समाजाकडे आपोआप जातात.
६)मच्छीमार सोसायट्यांमध्ये भोई समाज बांधवांना वगळून इतरांना सभासद करणे.
७)मच्छीमारी करण्यासाठी इतर समाजाच्या लोकांना प्राधान्य देणे.
अशा अनेक प्रकारच्या समस्यांमुळे भोई समाजाचे व्यवसाय बंद होत आहेत किंवा इतर समाजाकडे वळत आहेत.
समाज बांधवांनी यावर चिंतन करून भोई समाजातील व्यवसायात इतरांची घुसखोरी थांबवली पाहिजे. यावर चिंतन होणे गरजेचे आहे.
💐 जय भोईराज💐
लेख
श्री.दिपकभाऊ भोई चाळीसगाव
No comments:
Post a Comment
🚩🚩🚩 जय भोईराज....🚩🚩🚩