स्वाभिमानी मी जातीन भोई.....
कवी:श्री चेतन मोरे सर नवापूर जि.नंदुरबार
_सर्व समाज बांधवांना माझा जय भोईराज_*
आपल्या या भोई समाजाची महती मांडावी तेवढी कमीच आहे तरी पण मी माझ्या जीवनात पाहिलेला, ऐकलेला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पणे अनुभवलेला आपला ह्या स्वाभिमानी भोई समाजावर काही लय बद्ध ओळी.....
👇👇👇👇
स्वाभिमानी मी जातीन भोई
_स्वाभिमानी मी जातीन भोई.._
चणा फुटाणा भट्टीवर फोडी
नदी तलाव मा मासा बी मारी
ओळख मनी हौज प्रमुख व्यवसायी
_स्वाभिमानी मी जातीन भोई...._
माणुसकी धर्म सदा पुढे नेई
दयावान मी भावनिक हृदयी
हार मानायला जीवनात शिकलोच नाही
_स्वाभिमानी मी जातीन भोई..._
गरीब मी श्रीमंत खूब नाही
आली दरिद्री तरी घाबरत नाही
ताठ मानेने सदा जगत राही
_स्वाभिमानी मी जातीन भोई...._
स्वाभिमानी हा कधी झुकत नाही
याचा फायदा पुढारी घेई
हिम्मतीवर भोईचा तो नेता होई
हा बिचारा दोस्ती यारी निभावत राही
_स्वाभिमानी मी जातीन भोई..._
कमी हा भोई कुठेच नाही
मागे पडतो कारण संघटित नाही
तुझ्यात आहे कौशल्य तू वापर रे भोई
संघटित होण्याचा कर बाबा निश्चई
_स्वाभिमानी मी जातीन भोई..._
अशिक्षित नाहीच तू उच्च शिक्षित हाई
तरी का वागतोस अनाडी वाणी
Unity Is The Strength हे काय तुला ठाऊक नाही
_स्वाभिमानी मी जातीन भोई..._
एकजुटीने लढ
आपण जिंकू हक्काची लढाई
दुनियेला आपण दाखवून देवू
भोई राजा आहे हा पालखीचा भोई
_स्वाभिमानी मी जातीन भोई..._
🌹💐🌹💐🌹💐🌹
कवी:श्री चेतन मोरे सर
*_भोईसमाज युवामंच अध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र विभाग_*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जय भोईराज
ReplyDelete