कन्या जन्माचा सत्कार उपक्रम ग्रुप, शहादा जि. नंदुरबार (बेटी बचाओ - बेटी पढाओ)
मुलगी जन्माला आली की तिला आपण समाजात जास्त महत्त्व देत नाही, कारण आपल्या मते वंशाचा दिवा हा मुलगा असतो म्हणूनच मुलाला समाजात महत्वाचे मानले जाते. आणि मुलीला नकारात्मकतेच्या नजरेने पाहिले जाते, आणि महत्व ही दिले जात नाही.
पण शहादा येथील भोई समाजातील युवकांच्या संकल्पनेतून समाजापुढे एक नवीन आदर्श निर्माण झाला आहे. सन २०१७ पासून कन्या जन्माचा सत्कार उपक्रम ह्या युवकांनी शहादा भोई समाजात सुरू केला, सुरवातीस या सत्काराचे स्वरूप असे होते की, शहादा शहरातील भोई समाजात नवजात जन्मलेली कन्या आणि तिच्या परिवाराचा श्री.राजा खेडकर सर (राजकुमार) यांच्याकडून पुष्पगुच्छ, तर श्री. धनेश्वर भोई यांच्याकडून पेढे आणि छोटीशी आर्थिक मदत देऊन सत्कार केला जायचा.
नंतर ह्या सत्काराचे स्वरूप बदलले आणि सण २०१८ मध्ये श्री. नरेंद्र हिरालाल वाडीले ऊर्फ नरु भाऊ (तालुकाध्यक्ष - भोई समाज, शहादा) यांनी प्रत्येक सत्काराच्या वेळी ३१०० रुपयाची भेट फिक्स डिपॉझिट म्हणून कन्येच्या च्या स्वागतासाठी देऊ केली, तसेच श्री. जितेंद्र हिरालाल वाडीले (वाडीले सर) यांच्याकडून प्रत्येक सत्कारावेळी १०० रुपयाची भेट ह्या समाज बांधवांकडून दिली जाते.
कन्या जन्माचा पहिल्या सत्काराची सुरुवात राम नगर, शहादा येथील श्री. किशोर वामन साठे यांना कन्यारत्न झाल्याबद्दल ९ जानेवारी २०१७ मध्ये करण्यात आला आणि आतापर्यंत एकुण ३६ परिवाराचा कन्या जन्माचा स्वागताचा सत्कार उपक्रम शहादा शहराच्या विविध भागात असणाऱ्या भोई समाज बांधवांच्या घरी जाऊन करण्यात आला आहे, ह्या सत्कारावेळी अशा कन्येचा सत्कार केला जातो , की ज्या घरात कन्या जन्माला येते म्हणजेच ( शहादा शहरात असलेली सून आणि नवीन जन्मलेली कन्या , कन्येचे वडील आणि त्यांचा परिवार म्हणजे सुनेच्या सासरवाडीत पुष्पगुच्छ, पेढे, आणि ३१०० रुपयाची मुलीच्या नावे फिक्स डिपॉझिट बँकेत जमा केली जाते, सोबत सुनेचा ही सन्मान केला जातो ) तसेच (माहेरी असणाऱ्या मुलीला जर कन्यारत्न प्राप्त झाली तर त्या कन्येचा आणि परिवाराचा पुष्पगुच्छ, पेढे, आणि छोटीशी मदत म्हणून 100 ₹ दिले जातात). अशा प्रकारे वरीलप्रमाणे सत्कार उपक्रम राबविला जातो,
ह्या सत्काराच्या वेळी आम्ही कन्या जन्माचे महत्त्व पटवून देतो आणि समाजात त्यांना त्यांचा योग्य तो मान सन्मान दिला गेला पाहिजे असे सांगितले जाते आणि पाहायला गेलं तर वडिलांची काळजी ही मुलगीच घेत असते, आणि ती सर्वांची काळजी घेते म्हणून ती बापाची लाडकी असते, म्हणूनच उपक्रमाचा उद्देश हा बेटी बचाओ - बेटी पढाओ आहे असे सांगितले जाते,तसेच समाजातील मान्यवरांच्या हस्ते कन्या जन्माचा स्वागताचा कार्यक्रम केला जातो,
तसेच कन्याबद्दल जनजागृती निर्माण केली जाते, अशा प्रकारे कन्या जन्माचा सत्कार उपक्रम ग्रुप, शहादा येथील समाज बांधव गेल्या ३ वर्षांपासून असा अनोखा उपक्रम आनंदात करीत आहेत.
ह्या उपक्रमाबद्दल संपूर्ण नंदुरबार जिल्हा भोई समाजात कौतुक केले जात आहे. तसेच उपक्रमाची दखल घेत नंदुरबार जिल्हयात भोई समाजबांधवांनी हा उपक्रम नंदुरबार, प्रकाशा, धडगाव, पिंगाणे, तळोदा इ. गावामध्ये सुरू केला, तसेच इतर समाजातही उपक्रमाची दखल घेत शहादा, नंदुरबार ,लोणखेडा, सुलतानपुर येथे सुरू केला आहे. आणि शेजारी असलेल्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात पंचायत समिती मध्ये ही अशाप्रकारचा सत्कार उपक्रम राबविण्यात आला.
हा उपक्रम नंदुरबार जिल्हयात सर्वप्रथम श्री. मिलिंद वाडीले यांनी सुरू करण्याचा मानस केला, आणि त्यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली, तसेच सोबत युवक ही खांद्याला खांदा लावून उपक्रम चांगल्यारित्या पार पाडत आहेत.
कन्या जन्माचा सत्कार उपक्रम ग्रुप, शहादा दरवर्षी राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त म्हणजेच कन्येच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी कलाकौशल्य म्हणून रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा , नृत्य स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय कार्यक्रम बेटी बचाओ - बेटी पढाओ,कन्या, स्त्री भ्रूण हत्या इ.विषयावर आयोजित केले जातात,
तसेच समाजातील गोरगरीब जनतेला संकटकाळी सर्वोतोपरी मदत ह्या ग्रुप तर्फे केली जाते ,
ह्या वर्षाच्या सांस्कृतिक कार्यक्रमातील समाजबांधवांच्या लोकवर्गणीतून जी उर्वरित वर्गणी आहे ती अंध, अपंग, अनाथाश्रम यांना दिली जाणार आहे.
तसेच समाजासाठी मार्गदर्शन करणारे आणि युवा समाजसेवक यांना राष्ट्रीय युवा दिनानिमित्त स्वामी विवेकानंद यांची प्रतिमा भेट म्हणून दिली जाते.
उपक्रमाचे वैशिष्ट्ये - गरजू व्यक्तींना ग्रुपतर्फे रक्तदान केले जाते (रक्त दिले जाते)
सण २०१८ मध्ये संकल्प ग्रुप, शहादा यांनी गणेशोत्सव स्पर्धेत शहादा शहरात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या समाज बांधव आणि ग्रुप म्हणजेच (बेटी बचाओ- बेटी पढाओ) कन्या जन्माचा सत्कार उपक्रमास सदर कार्यक्रमास उपस्थिती तत्कालीन जिल्हाधिकारी मल्लीनाथ कलशेट्टी साहेब यांच्या उपस्थितीत गौरव चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले, हा ग्रुपचा पहिला सन्मान केला.
ह्या उपक्रमाचे प्रेरणास्थान श्री. नरेंद्र हिरालाल वाडीले , नरुभाऊ (तालुकाध्यक्ष - भोई समाज, शहादा). हे आहेत
अभिमानाची आणि आनंदाची बाब म्हणजे ह्या उपक्रमाला अध्यक्षांच्या नावे १४ सप्टेंबर २०१९ रोजी अन्याय अत्याचार निर्मूलन समिती, धुळे यांनी समाजरत्न पुरस्कार दिला, त्यानंतर धुळे येथील धुळे जिल्हा भोई समाज महासंघाच्या वतीने २० ऑक्टोबर २०१९ रोजी श्री. नरेंद्र वाडीले आणि श्री. मिलिंद वाडीले यांना समाजभूषण पुरस्कार दिला, नागपूर येथील भोई गौरव मासिकाच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त भोई गौरव पुरस्कार २ डिसेंबर २०१९ रोजी देण्यात आला. मिलिंद वाडीले यांना प्रदान करण्यात आला, यामुळे उपक्रम ग्रुपला स्फुर्ती मिळाली.
कन्या जन्माचा सत्कार उपक्रमातील कार्यकारणी खालीलप्रमाणे
अध्यक्ष - श्री. मिलिंद हिरालाल वाडीले, राम नगर, शहादा
उपाध्यक्ष - श्री. राजा काशिनाथ खेडकर (राजकुमार) , शहादा
सचिव - स्वप्निल आधार मोरे ,शहादा
कोषाध्यक्ष - श्री. धनेश्वर प्रकाश भोई, शहादा
संघटक - श्री.किशोर नथ्थु मोरे , शहादा
सल्लागार - श्री. विजय लक्ष्मण वाडीले ,शहादा (दादू वाडीले)
सदस्य - नंदिनी मोरे, वंशिका वाडीले,अंकिता वाडीले, महिमा सोनवणे , विलास मोरे, राजेंद्र मोरे, स्वप्निल मोरे, प्रशांत सोनवणे, अविनाश मोरे, सुनिल मोरे, जितेंद्र वाडीले सर, छोटू वाडीले, बाळा साठे, कल्पेश वाडीले, मनोज वाडीले, लखन तावडे, योगेश मोरे, राहुल वाडीले, सागर वाडीले, राहुल नूक्ते, योगेश नूक्ते,अविनाश वाडीले आदी उपक्रमातील सदस्य आहेत.
माहिती संकलन :- स्वप्निल आधार मोरे आणि उपक्रमातील सदस्य यांच्याकडून माहिती प्राप्त झाली आहे.