Sunday, June 28, 2020

कोरोना योद्धा सन्मान






🎖️🎖️ *कोरोना योद्धा सन्मान*🎖️🎖️


*भोईसमाजास आपला सार्थ अभिमान संकट काळात आपण दिली माणुसकीची जाण*
✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻

*मा सौ शुभांगी जगदीश ढोले.*
*आरोग्य सेविका* 

फैजपूर नगरपरिषदने कोरोना सर्वेक्षणासाठी दिलेले ५०० घरांतील वयोवृद्ध व दहा वर्षाखालील मुलांचे सर्वेक्षण . फैजपूर नगरपरिषद शिवाजीनगरपरिसर ७५० घरातील प्रत्येक व्यक्तीचा  पल्स आॅक्सिमिटर द्वारे रक्तातील आॅक्सिजन सॅच्युरेशन लेव्हल चेक करणे. थर्मल स्कॅनर द्वारे टेंपरेचर चेक करणे.


*मा. श्री गजानन नामदेव आमझरे*
*आरोग्य सेवक*
कोरोणा पेशंटच्या सानिध्यात राहून बेड व्यवस्था, जेवन व्यवस्था, चहा पाणी असे कार्य आपल्या हातुन घडले

*मा श्री यशवंत गोविंद निकवाडे*
*शिरपुर*

निराधार लोकांना अन्यधान्य व फळभाज्या वाटप केले,

*मा श्री चंद्रकांत आसाराम डहांके*
*नाशिक*

रक्तदान, अन्यधान्य वाटप केले या वर हमोपॅथी गोळ्यांचे घरोघरी जाऊन वाटप केले

*मा श्री किरण परशुराम तावडे*
*सुरत*
लहान मुलांना शिक्षण साहित्य तथा अन्न धान्य वाटप केले

आपल्या हातुन घडलेले कार्य 
हि समाजासाठी गौरवाची बाब आहे तसेच ह्या कठिण प्रसंगात आपण देशसेवेत निडरपणे उभे राहिलात त्या बद्दल भोईसमाज युवा मंच महाराष्ट्र तर्फे आपला सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येत आहे, हा गौरव आपल्या कार्यापुढे नगण्य आहे, हा गौरव करण्यास आम्हि आमचे भाग्य समजतो व आपल्या कार्याला मुजरा करतो.
✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨
*भोईसमाज युवा मंच महाराष्ट्र तर्फे आपणास भावी कार्यास खुप खुप शुभेच्छा...!*

*विनंती - समाजिक कर्तव्य म्हणुन सदर पोस्ट जास्तीत जास्त शेअर करावी तसेच भोईसमाजाचे आपल्या परीसरातील किंवा परीचयाचे कोरोना योद्धांची माहिती खालील नंबर वर देऊन सहकार्य करावे.*

तुषार साटोटे:95523 65423
किशोर शिवदे:9404761567
निलेश वाडीले:9011494777
संजय इंगळे:8888066486
महारू शिवदे:92606 01964
निलेश साटोटे:9975054010
चेतन मोरे:9403717446
राहुल भोई:7387816721


हाक तुमची...✊🏻✊🏻
    साथ आमची....✊🏻✊🏻
*सदैव आपलेच*
*भोई समाज युवा महाराष्ट्र*


*भोईसमाज युवा मंच महाराष्ट्राच्या विविध उपक्रमाच्या माहिती साठी आमच्या ब्लॉग ला अवश्य भेट द्या* 
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://bhoisamajyuvamanch1.blogspot.com

Saturday, June 27, 2020

कोरोना योध्दा सन्मान

*कोरोना योद्धा सन्मान*

*मा श्री चंद्रशेखर प्रभाकर असोलकर* 
ओ टिव्ही न्युज रिपोर्टर म्हणुन अोझर, नाशिक येथे कोरोना काळात परीसरातील वित्तम बादमी देऊन लोकांना जागृत करणे, कंटेन्मेंट परीसर तथा लोकांनकडुन घेतल्या जाणा-या काळजीचे कव्हरेज, आरोग्य सेवक, नर्सेस यांची कर्तव्य बजाऊन आल्यावर परीसरातुन होणारे कौतुक त्यांचे स्वागत  करतांनाचे कव्हरेज करुण त्यांच्या कार्याला प्रोत्साहित केले आता हि ती सेवा देऊन प्रोत्साहित करीत आहात हि समाजासाठी गौरवाची बाब आहे तसेच ह्या कठिण प्रसंगात आपण देशसेवेत निडरपणे उभे राहिलात त्या बद्दल भोईसमाज युवा मंच महाराष्ट्र तर्फे आपला सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येत आहे, हा गौरव आपल्या कार्यापुढे नगण्य आहे, हा गौरव करण्यास आम्हि आमचे भाग्य समजतो व आपल्या कार्याला मुजरा करतो.
✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨
*भोईसमाज युवा मंच महाराष्ट्र तर्फे आपणास भावी कार्यास खुप खुप शुभेच्छा...!*

*विनंती - समाजिक कर्तव्य म्हणुन सदर पोस्ट जास्तीत जास्त शेअर करावी तसेच भोईसमाजाचे आपल्या परीसरातील किंवा परीचयाचे कोरोना योद्धांची माहिती खालील नंबर वर देऊन सहकार्य करावे.*

तुषार साटोटे:95523 65423
किशोर शिवदे:9404761567
निलेश वाडीले:9011494777
संजय इंगळे:8888066486
महारू शिवदे:92606 01964
निलेश साटोटे:9975054010
चेतन मोरे:9403717446
राहुल भोई:7387816721


हाक तुमची...✊🏻✊🏻
    साथ आमची....✊🏻✊🏻
*सदैव आपलेच*
*भोई समाज युवा महाराष्ट्र*



https://bhoisamajyuvamanch1.blogspot.com

Friday, June 26, 2020

कोरोना योध्दा सन्मान....


*कोरोना योद्धा सन्मान*

*मा श्री प्रशांतजी मधुकर शिंगाने* 
ब्लड बँक टेक्नेशियन म्हणुन छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पीटल कळवा, ठाणे येथे कोरोना काळात व आता हि आपली सेवा आपण देत आहात हि भोईसमाजासाठी गौरवाची बाब आहे तसेच ह्या कठिण प्रसंगात आपण देशसेवेत निडरपणे उभे राहिलात त्या बद्दल भोईसमाज युवा मंच महाराष्ट्र तर्फे आपला सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येत आहे, हा गौरव आपल्या कार्यापुढे नगण्य आहे, हा गौरव करण्यास आम्हि आमचे भाग्य समजतो व आपल्या कार्याला मुजरा करतो.
✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨
*भोईसमाज युवा मंच महाराष्ट्र तर्फे आपणास भावी कार्यास खुप खुप शुभेच्छा...!*

*विनंती - समाजिक कर्तव्य म्हणुन सदर पोस्ट जास्तीत जास्त शेअर करावी तसेच भोईसमाजाचे आपल्या परीसरातील किंवा परीचयाचे कोरोना योद्धांची माहिती खालील नंबर वर देऊन सहकार्य करावे.*

तुषार साटोटे:95523 65423
किशोर शिवदे:9404761567
निलेश वाडीले:9011494777
संजय इंगळे:8888066486
महारू शिवदे:92606 01964
निलेश साटोटे:9975054010
चेतन मोरे:9403717446
राहुल भोई:7387816721


हाक तुमची...✊🏻✊🏻
    साथ आमची....✊🏻✊🏻
*सदैव आपलेच*
*भोई समाज युवा महाराष्ट्र*



https://bhoisamajyuvamanch1.blogspot.com

भाग्यश्री शिवदे प्रथम क्रमांक विजेती....


आपल्या समाजाची कन्या *कु.भाग्यश्री लक्ष्मण शिवदे* चेंबूर हिचा राज्यस्तरीय गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन🎁🎁🎁🎁
तिच्या विजयासाठी मेहनत घेणारे सर्व समाज बांधव आप्तेष्ट यांचे भोई समाज युवा मंच तर्फे मनःपूर्वक आभार....
असेच आपल्या लोकांना पुढे नेण्यासाठी सहकार्य करा.नक्कीच समाज प्रगती पथावर येईल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*जय भोईराज*
शुभेच्छूक
भोई समाज युवा मंच महाराष्ट्र

Wednesday, June 24, 2020

सन्मान कोरोना योद्धांचा.....

*सर्व समाज बांधवांना सस्नेह जय भोईराज*

*सन्मान करोना योद्धाचा*

सध्या सुरू असलेल्या कोरोना मध्ये आपले बरेच समाज बांधव स्वतःचा जीव धोक्यात टाकून कोरोना रूग्ण सेवा,किंवा इतर अत्यावश्यक सेवा बजावताना दिसत आहेत.सामाजिक बांधिलकीची जाणीव वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने
*भोई समाज युवा मंच महाराष्ट्र प्रदेश* तर्फे आपल्या समाजातील अशा कोरोना योध्दाचा सन्मान करणे आम्ही आमचे आद्य कर्तव्य समजतो. 'कोरोना' या आजाराविरोधात कार्य केलेल्यांचा *'कोरोना योद्धा'* म्हणून सन्मानार्थ प्रमाणपत्र देऊन कर्तव्य बजाऊ इच्छितो आहे.
सर्व समाज बांधव यांना विनंती करण्यात येते की आपण किंवा आपल्या परिचयाचे कोणीही कोरोना काळात केलेल्या सेवेची माहिती आमच्या भोई समाज युवा मंच  पदाधिकारी यांना पाठवून सहकार्य करावे.
पाठवतांना फोटो व आपण केलेले काम याची थोडक्यात माहिती आमच्या खालील पदाधिकारी मार्फत पाठवा.
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
तुषार साटोटे:+91 95523 65423
किशोर शिवदे:9404761567
निलेश वाडीले:9011494777
संजय इंगळे:8888066486
महारू शिवदे:92606 01964
निलेश साटोटे:9975054010
चेतन मोरे:9403717446
राहुल भोई:7387816721

हाक तुमची....✊🏻✊🏻
     साथ आमची...✊🏻✊🏻

*सदैव आपलेच*
*भोई समाज युवा मंच महाराष्ट्र प्रदेश*

https://bhoisamajyuvamanch1.blogspot.com

Tuesday, June 23, 2020

समाजासाठी चांगले कार्य करण्याचा प्रयत्न करा...


समाजासाठी चांगले कार्य करण्याचा प्रयत्न करा व आदर्श जीवन जगा...
महारू शिवदे जळगाव


                        ✍️शुद्ध आचार, विचार, निष्कलंक जीवन, जीवनात त्याग आणि अपमान सहन करण्याची शक्ती ही पाच तत्त्वे ज्यांच्याजवळ असेल तो समाजात परिवर्तन आणि देशाचा विकास करूशकतो. जन्म आणि मरणाच्यावेळी आपण काही घेऊन जात नाही, त्यामुळे समाजासाठी जे काही चांगले कार्य करता येईल ते करण्याचा प्रयत्न करा आणि आदर्श जीवन जगा,आजचा युवक हा देशाची खरी शक्ती असून तीच समाजात परिवर्तन करू शकते हे अनेकदा आंदोलनातून सिद्ध झाले आहे. युवकांमुळे अनेक देशात क्रांती झाली ते देश विकसनशील देश म्हणून ओळखली जात आहे. आपल्यामध्ये ती शक्ती आहे. मात्र, त्याचा उपयोग ज्या पद्धतीने केला पाहिजे तो केला जात नाही. जन्माला येतो त्यावेळी आपण काही घेऊन येत नाही आणि मरण येते तेव्हा काही घेऊन जात नाही. तरीही आयुष्य जगत असताना हे माझे आहे, ते तुझे आहे, तेही माझे आहे, असे करीत आयुष्यात भांडत असतो. या मानसिकतेतून बाहेर येण्याची गरज आहे. आपल्याला जन्म हा निष्काम सेवेसाठी मिळाला आहे ही मानसिकता ठेवून काम केले तर जीवनाचे सार्थक होते आणि काम करण्याचा आनंद मिळतो. प्रपंच करावा. मात्र, तो करताना केवळ आपल्या घरापुरता सिमित न ठेवता समाजासाठी आपण काय करू शकतो त्याचाही विचार करावा.
    रेल्वे स्थानकावर फिरत असताना स्वामी विवेकानंदांचे पुस्तक हाती लागल्यावर ते वाचले आणि त्या दिवसांपासून समाजसेवा करण्याचा निर्णय घेतला. तरी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत या समाजाच्या व राष्ट्राच्या विकासासाठी लढत राहणार आहे. सेवेचा आनंद हा वेगळा असतो. तो प्रत्येकाच्या जीवनात येत नाही. भ्रष्ट,खोटे बोलणारे,फुट पाडणारे,लावा लावी करणारे,एकत्रीकरण न होऊ देणारे,स्वार्थी  असे लोंक आजु बाजुला  खूप आहे. मात्र, ती आज सुखी नाही. त्यांना सुखाने झोप घेता येत नाही.माझ्याजवळ  जे आहे ते मी समाजकार्य केलेल्या समाज बाधंवाचा आशिर्वाद  स्वरूपात मिळाले आहे ते सर्व समाजसेवेसाठी आहे. आजचा युवक भरकटला असून त्यांच्याजवळ विचार नाही, असे बोलले जात असले तरी त्यात तथ्य नाही. युवकांना योग्य दिशा दिली तर त्यांच्यामध्ये बदल होऊ शकतो, हे विविध कार्यातुन सिद्ध झाले आहे. युवकांची मोठी शक्ती समाजकार्यात सहभागी झाली तर. त्यांच्यामुळे समाजात काही प्रमाणात परिवर्तन होऊ शकते
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*महारू भाऊ शिवदे*
 *जळगांव*
*भोई समाज युवा मंच महाराष्ट्र*

Saturday, June 13, 2020

मी पणा सोडा सर्वांना जोडा.....




*मी पणा सोडा व सर्वांना जोडा*
कवी:- महारू पंडित शिवदे
अहंकार या शब्दाचा मी पणा
किती जवळ घेऊन बसतोस रे
किती स्वतःचीच स्वतःच्या हाताने पुजा करुन घेतोस रे
दिस संपला की रात येते रात संपली की परत दिस
वारा येतो वादळाचा मारा घेऊन तो ही संपून जातो रे
तूझा अहंकार संपणार आहे का
तुझी कडक इस्त्री, तुझी कडक शायनिंग, तुझी कडक भाषा, तुझी कडक राहणी कधी संपणार आहे का रे
तुझी तूच चालवली आहेस स्वतःच्या हाताने स्वतःची निंदा
समाजाच्या जीवावर तू आहेस रे मिंदा
सोड आता तूझा अहंकारी मी पणा
अध्यक्ष म्हणून तू मिरवतोस
कधी तरी कार्यकर्ता म्हणून वाग रे
कार्यकर्त्याच जिन कधी तरी जग रे
तुला तुझीच लाज वाटेल किती झटतो रे
तो मी पणा सोडून समाजासाठी समाजाच्या, एकतेसाठी, हक्कासाठी, समाजाच्याहितासाठी रे
एकदा तरी त्याचा विचार कर त्याची नाही रे कडक इस्त्री, त्याची नाही रे कडक शायनिंग, त्याची नाही रे कडक भाषा, त्याची नाही रे कडक राहणी, वेळ आली तर सतरंजी सुद्धा उचलण्याची तयारी ठेवतो तो रे
त्याच्याकडून तू थोड काही तरी शिक रे
तुझ्या अहंकारी पणाचा मी पणा बाजुला ठेव रे,
दुसर्याचा छळ करून तू सुखी होणार नाही रे....
पॅकेज कितीही मोठं असू दे जगण्यात मजा राहणार नाही रे.....
थोडा समाजासाठी झट रे
स्वतःचाच भरू नकोस खिसा रे.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*महारू शिवदे*
प्रदेश कार्याध्यक्ष
भोई समाज युवा मंच महाराष्ट्र
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Monday, June 8, 2020

समाज सेवा करत असतांना... ज्ञानेश्वर खैरमोडे


           समाज सेवा करत असतांना.....
                  ज्ञानेश्वर खैरमोडे येवला...
सर्व सन्मानिय भोई समाज युवा मंच पदाधिकारी बंधूंना मानाचा जय भोईराज 🙏🙏🙏🙏🙏
आज मी ज्ञानेश्वर खैरमोडे 
#Let It #Go.... यावर काही माझे व काही कॉपी पेस्ट परंतु समाजकार्यात कलाटणी देणारे मनोगत व्यक्त करत आहे🙏🙏🙏
बघा पटतय का....?????
*#Let It #Go....* (हे...जाऊ द्या)

समाजकार्य करत असतांना कितीही जपून वागलं तरी काही लोक फक्त आपल्या चुकाच पकडायला बसलेले असतात. म्हणजे आपल्या ध्यानी मनी नसलेल्या गोष्टींनी सुद्धा कोणी दुखावून घेत असतं. माणसं नेहमीच महत्त्वाची वाटतात आपल्याला म्हणून आपण दरवेळी स्पष्टीकरणं देत राहतो. कधी चटकन माफीही मागून टाकतो (आपल्या इगोपेक्षा माणसं महत्त्वाची हे तत्त्व डोक्यात ठेवून). पण हे सतत घडत राहील तर पोरखेळ होऊन बसतो 

मंग. जपून तरी किती वागावं नेहमी? मग भीती तयार होते नात्यांत एक अदृश्य! अरे आपण थोडंसं जरी चुकलो तरी आपल्याला कोणी झाडणार. किंवा सतत ही देखील टांगती तलवार राहते डोक्यावर, की आपल्याकडून नकळत काही गोष्ट घडली, जिच्यामागे कोणाला हेतूत: दुखावण्याचा उद्देश नसला तरी कोणी आपल्याबद्दल गैरसमज करून घेणार आहे, आपल्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणार आहे. ही भीती मोठाल्या भिंती उभ्या करते नात्यांत. आतून तुटण्याची प्रक्रिया कधीच सुरू झालेली असते, तरीही आपण चिवटपणे तगून राहिलेलो असतो नात्यात, धरून असतो आपल्या माणसांना. (कारण आपल्याला आयुष्यातलं माणसांचं मोल फार अधिक वाटलेलं असतं.)

पण उंटाच्या पाठीवर शेवटची काडी कधीतरी पडतेच. असह्य होतात स्पष्टीकरणं, नको होतं वारंवार रिव्हर्स गिअरवर जाऊन कोणाची सतत समज काढत बसणं. 'जाणाऱ्याला कधी अडवू नये,' असं एक सुहृद व्यक्तीने मला कधी सांगितलेलं. ज्यांना आपल्या आयुष्यात थांबायचं आहे, ज्यांना आपण कोणत्याही अटी शर्तीशिवाय हवे आहोत, जे लोक आपल्या as it is असण्यावर प्रेम करतात त्यांना आयुष्यात थांबू द्यावं, नव्हेनव्हे तर आवर्जून वेळ देऊन मेंटेन करावं. पण जे लोक आपल्या आयुष्यात येताना परतीचा दरवाजा उघडा ठेवून आले आहेत, जे अस्थिर आहेत, पुढे जाऊन पुन्हा फार फार मागे येत आहेत अशा लोकांनी 'मी तुमच्या आयुष्यातून जातो/जाते' म्हटल्यावर त्यांना थांबण्याचा फार आग्रह करू नये. तसं केल्याने फार तर तेवढी वेळ टळू शकते, आजच मरण उद्यावर ढकलणं इतकाच त्याचा अर्थ! ज्यांना जायचंच आहे ते काहीतरी निमित्ताकारणे कधी ना कधी आपल्या आयुष्यातून जाणारच असतात. तेथे अडकून फार ऊर्जा वाया घालवत बसू नये. त्या नात्याला 'कृष्णार्पणमस्तु' म्हणावं आणि पुढे चलावं.

आपल्या वागण्याने कोणी दुखावेल का ही सततची भीती मनात बाळगण्याऐवजी हा विश्वास मनात असू द्यावा की 'जे लोक माझे आहेत, जे माझ्यावर विनाशर्त प्रेम करतात' ते लोक मला समजून घेतील. माझ्याकडून नकळत काही चुकलं तरी मला चटकन आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणार नाहीत. कारण त्यांना माहितीय, माझी कृती आणि माझे शब्द यापेक्षा माझे त्यांच्याप्रति असणारे भाव जास्त महत्त्वाचे आहेत. ते निर्मळ आणि निरपेक्ष आहेत. अनवधानाने कधी एखादा अप्रिय शब्दही जातो मुखातून, मग आपल्याला वाटतं की माझ्या मनात नसताना अशी चूक झालीच कशी? 'आपली' माणसं आपल्याला कानकोंडं होण्याची वेळ येऊ देत नाहीत. 'शब्द फसवे असतात. विश्वास माणसाच्या वृत्तीवर ठेवावा, तात्कालिक शब्दांवर नाही' हे ते जाणून असतात. ते आपल्या अशा नकळत होणाऱ्या चूक समंजसपणे पोटात घालतात. अशा माणसांसाठी मला कितीही पावलं मागे यावं लागलं तरी बेहतर! माझा इगो या नात्यांपेक्षा कधीच मोठा नसेल हे मनाशी असू द्यावं. (मलासुद्धा इतरांसाठी असं समंजस माणूस असायचं आहे हेही मनाशी पक्कं असू द्यावं.)

'अतिविचार' हे एक स्ट्रॉंग पॉयझन आहे. ह्याला काय वाटेल, तिला काय वाटेल आणि त्यांना काय वाटेल या विचारात आयुष्य संपून जाईल, पण आपल्या हातून समाजा कार्य होणार नाही. आपले हेतू शुद्ध असतील तर कोणाला काय वाटेल याचा आपण फार विचार करत बसू नये. ज्यांचं आपल्यावर प्रेम आहे ते मोकळेपणाने आपल्या चुका सांगतील, आपले मुद्दे समजून घेतात आणि सुधारणेला संधी देतील. जे आपले नाहीत ते नेहमी आपली शेंडी कशी हातात सापडेल या प्रयत्नात राहतील. निमित्त काढून आपल्याला कडेलोट करतील.
नात्यांना मोकळेपणानं सामोरं जाऊया. आपलं कोण, परकं कोण हे काळाच्या परीक्षेत सिद्ध होतंच. त्यावेळी काय पकडून ठेवायचं आणि हातून काय निसटू द्यायचं हे ठरवता यायला हवं फक्त.

*'Let it go' is a powerful chant. It makes you more light, so you can fly high.*

(जाऊ दे' हा एक शक्तिशाली जप आहे. हे आपल्याला अधिक हलके करते, जेणेकरून आपण उंच उडू शकता.)


समाज सेवा ही ईश्वर सेवा,,
''उठा कामाला लागा,,,

   ''हाक तुमची....
              साथ आमची...,,


 *भोई समाज युवा मंच, महाराष्ट्र*

Friday, June 5, 2020

समाज घडवण्यात युवकांची जबाबदारी.....

समाज घडवण्यात युवकांची जबाबदारी 
          श्री.महारू पंडित शिवदे
 प्रदेश कार्यध्यक्ष भोई समाज युवा मंच महाराष्ट्र
समाज, समाज म्हणजे काय असतो ? एकमेकांशी सलोखा असणाऱ्या एकत्र राहणाऱ्या लोकांचा समूह. आज भारतातील 45% समाज युवक वर्गात मोडतो. तर त्यांच्या उद्धाराची जबाबदारी पण युवकांचीच ना.


तरुण हा समाजातील अतिशय सक्षम, चंचल, शक्तिशाली, उत्साही घटक म्हनुन ओळखला जातो. आजचा तरुण उद्याचा वृद्ध असेल. ह्या तरुणाने स्वीकारलेली आव्हाने पुढच्या पिढीसाठी मार्गदर्शन ठरतील.

सरदार वल्लभभाई पटेल म्हणायचे की तारुण्याची तीन 'त'कार असावेत - तेजस्विता, तपस्वीता आणि तत्परता. या गुणांचे आचरण करणे आवश्यक आहे. या युवकांनी देश सुधारण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली पाहिजे.

स्वराज्याची स्थापना करणारे शिवाजी महाराज, ती धुरा यशस्वीपणे सांभाळणारे संभाजीराजे हेदेखील तरुणच होते. स्वातंत्र्यपूर्व काळात जसे भगतसिंग, राजगुरु, चंद्रशेखर आजाद, सुखदेव हे सक्रिय होते तसे आजपण समोर यावेत.

समाजातील आजची आव्हाने जसे की वाढत चाललेली गुन्हेगारी, खराब राजकारण, वाढलेला भ्रष्टाचार, जातीयवाद आणि बेरोजगारी यावर तरुणांनीच काहीतरी उपाय योजले पाहिजेत. आजच्या समाजाची क्रांती फक्त युवकच करू शकतो.

म्हनुन प्रत्येक तरुणाने होईल तेवढा हातभार लावलाच पाहिजे. मी माझ्यापासून सुरुवात करतोय. तुम्ही पण करा.

*धन्यवाद...
🙏🙏🙏
लेख:श्री.महारू पंडित शिवदे
प्रदेश कार्यध्यक्ष भोई समाज युवा मंच महाराष्ट्र