!! जय भोईराज !! भोईसमाज सेवेसाठी, युवकांचे संघटिकरणासाठी तसेच जेष्ठ मार्गदर्शकांच्या पथदर्शनाने युवकांनी उभारलेले, युवकांचे, युवा व्यासपिठ भोईसमाज युवा मंच...
Monday, July 6, 2026
लग्न जुळवणारे मध्यस्थी आज मागे का सरकत आहेत
Friday, July 19, 2024
सासू सासरे नको//मग अनाथ मुलाशी लग्न करा.....
Monday, February 13, 2023
श्री खंडेराव महाराज व श्री बानुबाई यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मालेगाव नगरीत भोई समाज युवा मंच मालेगाव आयोजित वधु वर परिचय मेळावा मालेगाव येथे संपन्न a
श्री खंडेराव महाराज व श्री बानुबाई यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मालेगाव नगरीत भोई समाज युवा मंच मालेगाव आयोजित वधु वर परिचय मेळावा मालेगाव येथे संपन्न
आज दिनांक 12 फेब्रुवारी भोई समाज युवा मंच मालेगाव आयोजित राज्यस्तरीय भोई समाज वधु वर परीचय मेळावा कृष्णा लॉन्स मालेगाव येथे भोई समाज युवा मंच प्रदेश अध्यक्ष तुषार साटोटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.मेळाव्यात 400 वधु वरांनी नोंदणी केली होती.100 च्या वर वधु वरांनी आपला परिचय दिला.राज्यभरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.भोई समाज युवा मंच वधु वर पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे आंतर राष्ट्रीय क्रिकेटपटू अजिंक्य बावणे यांचे वडील श्री रामदासजी बावणे साहेब,बुध्दीबळपटू विनायक वाडीले ,अजिंक्य दादा भुसे,अमोलदादा दिनकर पाटील ,राष्ट्रीय अध्यक्ष नरेश उखंडे,युवा मंच प्रमुख ज्ञानेश्वर खैरमोडे,कोअर कमिटी अध्यक्ष किशोर शिवदे,श्री.एस.ए भोई सर, गणेशबापू मोरे (धुळे),लक्ष्मण भाऊ वाडिले नंदुरबार,वामन आप्पा तमखाने,यशवंत भाऊ शिवदे जळगाव ,संजय इंगळे अकोला,सी एम भोई सर शिरपूर,रामचंद्र काळे मालेगांव, सुरेश शिवदे मालेगाव, कैलास ढोले मालेगाव,भिलेश भाऊ खेडकर,गणेशभाऊ सपकाळ, बापूराव मोरे दाभाडी ,युवा मंच कोअर कमिटी,प्रदेश कार्यकारणी आदी मान्यवर उपस्थित होते.मेळावा यशस्वीते साठी नाशिक जिल्हाध्यक्ष विकास खेडकर ,मालेगाव तालुकाध्यक्ष संजय शिवदे,बापू मोरे,निलेश वाडीले,राजेश मोरे,निलेश शिवदे,निलेश वाडीले,महारु शिवदे,चेतन मोरे,निलेश साटोटे, गोकुळ शिवदे,दिलीप जावरे, दिलीप खेडकर,गोरख शिवदे,सोनू मोरे,कांतीलाल वायडे,शामभाऊ जावरे,सोनू मोरे,दिपक बरदे,सागर शिवदे भोई समाज समाज युवा मंच मालेगाव तालुका कार्यकारणी,प्रदेश कोअर कमिटी,प्रदेश कार्यकारणी यांनी मेहनत घेतली.भोईराज युवा संघटना मालेगाव यांचे कार्यक्रमास विशेष सहकार्य लाभले.भोई समाज वधु वर परिचय मेळावा सूत्र संचालन श्री.यशवंत निकवाडे सर यांनी केले शेवटी श्री.किशोर शिवदे सर यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Friday, January 20, 2023
भोईसमाज युवा मंच च्या वतिने नागपुर मधिल झिरो माईल येथे भोईसमाज भवन निमीर्ती होत असलेल्या उपोषनास जाहिर पाठिंबा
✌🏻✌🏻 *जाहिर पाठिंबा* ✌🏻✌🏻
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
*भोईसमाज युवा मंच च्या वतिने नागपुर मधिल झिरो माईल येथे भोईसमाज भवन निमीर्ती होत असलेल्या उपोषनास जाहिर पाठिंबा
✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻
नागपुर येथे भारतीय भोई विकास मंडळ नागपुर यांच्या नेतृत्वात झिरो माईल नागपुर येथील भोई समाज भवन ची जागा विदर्भ मच्छिमार संघाला पुर्ववत परत मिळावी व त्याच ठिकाणी शासकीय खर्चाने नविन इमारत निर्माण करण्यात यावी या मागणी करीता सोमवार दि १६.१.२०२३ पासुन साखळी उपोषण प्रारंभ करण्यात आले आहे, सदर उपोषानाला भोईसमाज युवा मंच च्या वतिने जाहिर पाठिंबा देण्यात येत असुन शासन आणि प्रशासनाला सदर निवेदनाच्या माध्यमातुन लवकरात लवकर मागणी पुर्ण करावी अशी विनंती करण्यात येत आहे.
अन्यथा भविष्यात उग्र आंदोलन छेडण्यात येईल व याला सर्वस्वी शासन, प्रशासन जबाबदार असेल असे भोईसमाज युवा मंच नागपुर विभागाध्यक्ष प्रमोदजी बावणे व जिल्हाध्यक्ष प्रविणजी कोल्हे यांनी नमुद केले.
Friday, November 4, 2022
भोई समाज युवा मंच पुणे जिल्हाध्यक्ष श्री.उमेश श्रावणे यांचा अभिनव उपक्रम
भोई समाज युवा मंच पुणे जिल्हाध्यक्ष श्री.उमेश श्रावणे यांचा अभिनव उपक्रम
सर्वांना नमस्कार आणि जय भोईराज
मी श्री उमेश श्रावणे, भोई समाज युवा मंच महाराष्ट्र, पुणे जिल्हा अध्यक्ष आपल्या सर्व भोई समाज बांधवांना एक आनंदाची गोष्ट म्हणा या बातमी सांगू इच्छितो की, आपल्या समाजातील बहुतांश मुलं आणि मुली ह्या उच्च शिक्षणाकरिता ज्या प्रमाणामध्ये प्रवेश मिळायला पाहिजे त्या प्रमाणात त्यांना यश मिळत नाही असे सर्वसाधारणपने दिसते.
इंजीनियरिंग शिक्षणाच्या बाबतीत झाले तर त्याची पात्रता परीक्षा म्हणून जे ई इ असते. आणि वैद्यकीय शिक्षणाकरिता नीट ही पात्रता परीक्षा असते.वैद्यकीय शिक्षणा करिता प्रवेश मिळवायचा झाल्यास नीट या परीक्षेमध्ये उत्तम प्रकारे ज्याचा निकाल असतो त्यालाच वैद्यकीय शिक्षणाकरिता प्रवेश मिळते. त्यातही आपल्याला 2.5% कोटा राखीव आहे ह्या कोट्या मार्फत आपल्याला प्रवेश मिळवायचा झाल्यास खूप खूप मेहनत आणि अभ्यास करून प्रवेश मिळवावा लागतो. आपल्या समाजात ज्या पद्धतीने जागरूकता व्हायला पाहिजे त्या पद्धतीने अजूनही आपल्या मुलांमध्ये ते कौशल्य आलेले नाही . आपले मुलं त्यामानाने मागे राहतात याला कारणही अनेक असू शकतात.
नामांकित असलेले ट्युशन क्लासेस यांची भरमसाठ फी आहे जी एका वर्षाकरिता दीड ते दोन लाख रुपये आहेत आपल्या गरीब बांधवांमध्ये होतकरू मुलं असले तरीही भरमसाठ फी मुळे आपण तसे क्लास जॉईन करू शकत नाहीत. परिणामतः मुलांना पात्रता परीक्षेमध्ये कमी गुण मिळतात आणि आपले मुलं नीट असो या जे ई ई परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत नाहीत. आपल्या मुला मुलीला कमी गुण मिळाले तर जवळपास दीड करोड रुपये असल्यास आपण आपल्या पाल्याला एमबीबीएस बनवू शकतो. आणि जर एवढा पैसा आपल्याकडे नसेल तर आपले व आपल्या पाल्याचे स्वप्न हे स्वप्नच राहते.
अशा माझ्या भोई समाजातील गरीब आणि होतकरू मुला-मुलींकरिता पुण्यातीलच नाही तर भारतात नावलौकिक असलेले दोन ट्युशन क्लासेस चे पुस्तकाचे संच माझ्याकडे उपलब्ध आहेत.
नामांकित ट्युशन क्लास च्या उपलब्ध असलेल्या दोन संचं मधून जर अभ्यास केला तर निश्चितच आपले स्वप्न पूर्ण होऊ शकते त्याकरिता कठोर परिश्रम घेणे हे गरजेचे असतेच. सदर पुस्तकांमधून चांगला अभ्यास केल्यास आपला पाल्य आयआयटी आणि वैद्यकीय शिक्षणाच्या फेरी चांगल्या मार्काने आपले नाव नोंद करू शकतो आणि त्याला ती राखीव जागा मिळू शकते.
ज्या कुठल्या गरीब होत करू समाज बांधवांना या पुस्तकाचा लाभ पाहिजे असल्यास कृपया मला संपर्क करणे ही पुस्तक सर्व समाज बांधवांना उपलब्ध होतील ग्रंथालयाप्रमाणे त्याची नोंद ठेवल्या जाईल. ह्या पुस्तकांच्या एकूण 71 नग आहेत. सर्व पुस्तके उत्कृष्ट पद्धतीमध्ये आहेत आपणही त्याचा वापर चांगल्या पद्धतीने करून आपल्या पाल्याचे भविष्य उज्वल करावे. ही सर्व पुस्तके पुण्यातील किंवा महाराष्ट्रातील होतकरू भोई समाज बांधवां करिता उपलब्ध होतील ने -आण चां खर्च हा स्वतःला करावा लागेल आणि पुस्तक चांगल्या स्थितीत परत करणे एवढीच माफक अपेक्षा राहील.
*सदरची सर्व पुस्तके आपल्या भोई समाजाचे सामाजिक कार्यकर्ते श्री दादाराव तुळशीरामजी खोडके पुणे* ह्यांनी आपल्या संस्थेला भोई समाजातील गरजवंतांना लाभ होवोत या उद्देशाने मोफत उपलब्ध करून दिलेली आहे. त्याकरिता त्यांचे खूप खूप धन्यवाद व आभार.👏🏻
*संपर्क मो 8308051451- 9881208000*
*Umesh Shrawane*
*Director Of*
*Vardhans Group*
Corporate Office: 18 , 3rd Floor, Metro 9 Building, Opposite Park Street, Rahatani, Pune. 411 017 Maharashtra. India.
Wednesday, September 28, 2022
भोई समाज युवा मंच कोअर कमिटी अध्यक्षपदी श्री. किशोर शिवदे सर यांची निवड
अभिनंदन.....अभिनंदन.... अभिनंदन....
🚩 जय भोईराज 🚩
भोईसमाज युवा मंच,
जिथे योग्य समाजकार्य आणि
समाज सेवकाच्या कार्याची योग्य पावती
✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻
भोईसमाज युवा मंच महाराष्ट्राच्या नव्या राज्य कार्यकारणीची निवड करतांना अत्यंत आनंद होत आहे, मागील काळात आपल्याकडे असलेल्या पदाला साजेसे कार्यकरुन भोईसमाज सेवेत आपला तन मन धनांने तसेच आपला बहुमुल्य वेळ देऊन समाज हितांचे कार्य जेष्ठ, वरीष्ठांच्या मार्गदर्शनाने व आशिर्वादाने युवकांनसाठी, युवकांनी उभारलेले युवा व्यासपिठ भोईसमाज युवा मंचच्या कोअर कमिटी अध्यक्ष पदी मा श्री.किशोरजी शिवदे सर यांची निवड झाल्या बद्दल मनःपुर्वक अभिनंदन
💐💐💐💐💐💐💐
भावी सामाजिक कार्यास हार्दिक शुभेच्छा...!
💐💐💐💐💐💐💐💐💐
हाक दिली आहे, साद द्या
समाजाला हक्क मिळवुण देण्यासाठी साथ द्या
आपलाच -
श्री ज्ञानेश्वर खैरमोडे
प्रमुख, भोईसमाज युवा मंच
Thursday, June 2, 2022
आमचा पदाधिकारी आमचा अभिमान ..🚩🚩
श्री.मुकेश भाऊ भोई जळगाव जिल्हाध्यक्ष भोई समाज युवा मंच
आमचा पदाधिकारी आमचा अभिमान
🚩🚩🚩🚩
भोई समाज युवा मंचच्या संघटनात्मक उपक्रमानुसार या आठवड्यातील उल्लेखनीय कार्य करणारे पदाधिकारी आहेत,उत्कृष्ट समाजसेवक *जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री मुकेश भाऊ भोई* त्यांनी पाळधी येथे समाज संघटित करून विविध पाठपुरावा करून भोई समाज वास्तू उभारण्यात मोलाचे काम केले तसेच संपूर्ण *जळगाव जिल्ह्यात भोई समाज युवा मंच चे अतिशय मजबूत संघटन निर्माण केल्याबद्दल आपल्या वेबसाइटवर* त्यांचा *आमचा पदाधिकारी आमचा अभिमान* म्हणून *सन्मान करण्यात येत आहे...*
*आपले मनःपूर्वक अभिनंदन* 💐💐
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*आपलेच*
*भोई समाज युवा मंच, महाराष्ट्र*
हाक तुमची .....✊🏻✊🏻
साथ आमची....🤝🏻🤝🏻
*भोई समाज युवा मंच महाराष्ट्र*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://bhoisamajyuvamanch1.blogspot.com
Tuesday, May 31, 2022
पाळधी येथे भोई समाज भव्य वास्तूचे कॅबिनेट मंत्री.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न...
*जय भोई राज*
आश्वासन नाही प्रत्यक्ष कृती
जे बोललो ते केले
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*भोई समाज मंदीर भव्य दिव्य उद्धाटन सोहळा व महाआरोग्य शिबीरांचे उद्धाटन उत्सहात संपन्न*
✍️ दि.२९/५ /२०२२ वार रविवार रोजी जळगांव जिल्ह्यातील,धरणगांव तालुक्यातील,पाळधी गावामध्ये महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा मंत्री व जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री *मा.श्री.भाऊसो.गुलाबरावजी पाटील* यांच्या हस्ते काल भोई समाज मंदीर या भव्य वास्तुचा उद्धाटन सोहळा पार पडला व प्रथम श्री.संत भिमा भोई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अपर्ण करून उद्धाटन करण्यात आले व त्या नंतर संपुर्ण पाळधी गावातील जनतेसाठी महाआरोग्य शिबीराचे पण उद्धाटन करण्यात आले काल मा.श्री.भाऊसो.गुलाबरावजी पाटील उर्वरीत जागेत पुंर्ण पेव्हर ब्लॉक बसवण्याचे सर्व समाज बाधंवासमोर सांगितले मागे काही वेळेस रेल्वेचे पोलीस आपल्या समाज बाधंवाना रेल्वेत शेगंदाणे विकु देत नव्हते व भरपुर त्रास देत होते एकदा भाऊं समोर हा विषय टाकला व भाऊंनी लगेच भुसावळ च्या डि.एम.आर यांची झाड़ाझडती केली तेव्हा पासुन आपल्या समाज बाधंवाना रेल्वेचे अधिकारी त्रास देत नाही हा फार महत्वाचा विषय होता आपल्या समाज बाधंवाचा उदरनिर्वाह यावर चालत होता म्हणुनच भाऊनी सर्व रेल्वे पोलीसांना फटकारले व भाऊनी सांगितले की भोई समाजा साठी काही अडचण आल्यास मी केव्हाही तुमच्या साठी तत्पर राहील हे भरसभेत भाऊनी सांगितले जळगांव जिल्हा टिम तर्फ भाऊचा सत्कार करण्यात आला या उद्धाटन वेळी जळगांव जिल्हा विकास मंडळाचे अध्यक्ष जेष्ठ नेते मा.एस.ए.भोई सर,जेष्ठ मार्गदर्शक,सी.के भोई सर,जळगांव येथिल यशवंत भोई,महारू शिवदे,किरण भोई,शिवदास भोई हे उपस्थीत होते,आरोग्य शिबीरास श्री.संत भिमा भोई बहुउद्देशिय संस्था पाळधी गावाचे अध्यक्ष भिमराव भोई उपाध्यक्ष डिगंबर भोई सचिव प्रविण भोई सहचिव मुकेश भोई खजिनदार राजेद्र भोई सदस्य कमलेश भोई समाधान भोई प्रशांत भोई सागर भोई दिपक भोई प्रविण चव्हाण राजु भोई सुरेश भोई प्रविण भोई वासुदेव भोई उत्तम भोई किरण भोई नाना भोई दिपक भोई महेद्रं भोई शांताराम भोई कांतीलाल भोई श्यामराव भोई विजय भोई पुरुशोत्तम भोई पंकज भोई संतोष भोई लक्ष्मण भोई,दौलत भोई अविनाश भोई हर्षल भोई ईश्वर भोई धनराज भोई योगेश भोई भास्कर भोई राहुल भोई राकेश भोई प्रकाश भोई आनंदा भोई गजानन भोई भगवान भोई मंगलेश भोई काशिनाथ भोई एकनाथ भोई बुधा भोई लखन भोई कृष्णा भोई सचिन भोई महेश मोरे तुषार भोई रमेश भोई राजमल भोई बापु भोई उत्तम भोई राहुल भोई सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले गावातील मोठ्या संख्येने समाज बाधंव उपस्थीत होते
✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*श्री.संत भिमा भोई बहुउद्देशिय संस्था पाळधी*
*समस्त भोई समाज*
*सर्व जळगांव जिल्हा टिम*
Thursday, May 26, 2022
येसगाव ता मालेगाव जि नाशिक येथे भोई समाज युवा मंच शाखा उद्घाटन संपन्न

Saturday, April 16, 2022
भोई समाज कुळ यादी आवृत्ती दुसरी लोकार्पण
🚩 *||जय श्रीराम ||जय हनुमान||* 🚩
🙏🏻🙏🏻 *जय भोईराज* 🙏🏻🙏🏻
*भोईसमाज युवा मंच महाराष्ट्र च्या वतीने भोईसमाज कुळ यादि आवृत्ती -२ समाज लोकार्पण*
र१ मे २०२२ रोजी सेवा निवृत्त वाहन चालक तथा भोईसमाज युवा मंच चे मार्गदर्शक मा श्री सतिषजी फुलपगारे साहेब यांच्या सहा महिन्याच्या परीश्रमातुन सोशल मिडीया, वधुवर परीचय पुस्तके, वधु वर ग्रुप तथा भोईसमाज सामाजिक ग्रुप मधिल समाज बांधवांच्या कुळ वरुन संग्रहित केलेली कुळ यादि जाहिर करण्यात आली होती. भोईसमाज व उपजातींच्या कुळच्या नावाची यादि आवृत्ती २ आज श्री हनुमान जन्मोत्सव तथा चैत्रपौर्णिमेचे औचित्य साधुन जाहिर करीत आहोत याचा खुप आनंद होत आहे, पहिल्या आवृत्तीच्या समाज लोकापर्णा नंतर अनेक समाज बांधवांचे कुळे नसल्याचे समाज बांधवांन मार्फत फोन द्वारे कळविण्यात आले होते ते पुर्ण करण्याचा हा थोटासा प्रयत्न आवृत्ती -२ मध्ये केला आहे, तरीहि चुकुन काहि नावे राहून गेली असल्यास *श्री सतिषजी फुलपगारे यांना *८६२३८०८६८०* या संपर्क करुन कळवावी.
DOWNLOAD ⬅️भोई समाज कुुुळ यादी
*धन्यवाद*
आपलेच -
भोईसमाज युवा मंच महाराष्ट्र
✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨
भोईसमाज युवा मंच महाराष्ट्र च्या विविध उपक्रम तथा कार्यक्रमांच्या माहितीसाठी भोईसमाज युवा मंचच्या ब्लॉग ला आवश्य भेट द्या
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://bhoisamajyuvamanch1.blogspot.com
Sunday, November 7, 2021
भोई समाज युवा मंच महाराष्ट्र व संलग्न संघटना तर्फे आयोजित ऑनलाइन रोजगार मेळावा संपन्न
*भोई समाज युवा मंच महाराष्ट्र व संलग्न संघटना तर्फे आयोजित ऑनलाइन रोजगार मेळावा संपन्न*
आज दिनांक 7 नोव्हेंबर 2021 रोजी भोई समाज युवा मंच महाराष्ट्र व संलग्न संघटना तर्फे भोई समाजातील बेरोजगार युवक युवतींसाठी ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. सदर मेळाव्यात औरंगाबाद पुणे येथील BAJAJ ELE CTRICAL, ENDURANCE,ABD, INVOLUTE व इतर नामांकित कंपन्यांचा सहभाग होता.रोजगार मेळाव्यासाठी 150 युवकांनी नोंदणी केली होती.त्यापैकी आज 30 जणांनी ऑनलाईन मुलाखत दिली.कंपनीतर्फे श्री.योगेश उबाळे सर आणि श्री.आदित्य मोरे (भोई समाज युवा मंच संभाजीनगर जिल्हाध्यक्ष) यांनी मुलाखती घेतल्या.सदर मेळाव्याचे सूत्रसंचालन श्री.किशोर शिवदे सर (प्रदेश उपाध्यक्ष) यांनी केले.कार्यक्रमास प्रदेशाध्यक्ष श्री.तुषार भाऊ साटोटे,महासचिव श्री.निलेश वाडीले,पुणे उपाध्यक्ष विजय इंगळे,नाशिक येथील प्राध्यापक श्री.विजय मोरे सर यांनी शुभेच्छा दिल्या.सदर कार्यक्रमासाठी भोई समाज समाज युवा मंच सर्व कोअर टीम व पदाधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभले.
*जय भोईराज*
*हाक तुमची ✊🏻✊🏻✊🏻*
*साथ आमची 🤝🏻🤝🏻🤝🏻*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
*भोई समाज युवा मंच महाराष्ट्र व संलग्न संघटना*
https://bhoisamajyuvamanch1.blogspot.com
Tuesday, November 2, 2021
भोई समाजातील युवकांसाठी मोफत ऑनलाइन रोजगार मेळावा
💥💥 *मोफत ऑनलाइन रोजगार मेळावा*💥💥
https://bhoisamajyuvamanch1.blogspot.com
*सर्व समाज बांधवांना सस्नेह जय भोईराज*
🚩🚩🚩🚩
गेल्या दोन वर्षांत कोरोना या जागतीक महामारीमुळे बेरोजगारीची समस्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढली असून समाजाचा आर्थिक व सामाजिक प्रगतीचा वेग मंदावलेला आहे,हीच गरज लक्षात घेऊन
*भोई समाजातील सर्व बेरोजगार युवक युवतींसाठी भोई समाज युवा मंच महाराष्ट्र व संलग्न संघटना तर्फे भव्य ऑनलाइन रोजगार मेळावा* आयोजित करण्यात येत असून जास्तीत जास्त भोई युवकांनी लाभ घ्यावा..
सदर मेळाव्यात भरण्यात येणारी रिक्त पदे ही पुणे औरंगाबाद येथील औद्योगिक क्षेत्रातील 10 नामांकित कंपन्यात निवड होणार असून उमेदवाराच्या शैक्षणिक अहर्तेनुसार उमेदवारांची निवड करावयाची आहे. सदर रोजगार मेळाव्यामध्ये 350 रिक्त पदांकरीता 10 कंपन्या सहभागी होणार आहेत.यामध्ये उमेदवारांचे वय 18 ते 45 असून शैक्षणिक अहर्ता किमान 10 वा वर्ग पास ते कोणत्याही शाखेचा पदवीधर तसेच ITI ,POLYTECHNIC, B.E व Diploma झालेले उमेदवार नोंदणी करु शकतात.
*नोंदणी लिंक*
⏬
https://forms.gle/R4ZxCgML9LZVGZsw6
तरी महाराष्ट्रातोल 36 जिल्हयातील जास्तीत जास्त सुशिक्षित युवक-युवतींनी रोजगार मेळाव्याकरिता आपले नांव नोंदविण्याचे आवाहन भोई समाज युवा मंच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तुषार साटोटे यांनी केले आहे.
👇🏻👇🏻👇🏻
*हाक तुमची*
✊🏻✊🏻✊🏻
*साथ आमची*
🤝🏻🤝🏻🤝🏻
*भोई समाज युवा मंच महाराष्ट्र व संलग्न संघटना*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
⏬⏬⏬⏬
श्री.तुषारभाऊ साटोटे *प्रदेशाध्यक्ष*
8625080706
श्री.किशोर शिवदे सर *प्रदेश उपाध्यक्ष*
9404761567
श्री.आदित्यभाऊ मोरे *संभाजीनगर जिल्हाध्यक्ष*
7796131721
Sunday, October 10, 2021
श्री खंडेराव महाराजांच्या आशिर्वादाने भोईसमाज युवा मंच मालेगाव येथील सन्मान सोहळा चंदनपुरी येथे उत्साहात संपन्न
🚩 *जय भोईराज* 🚩
श्री खंडेराव महाराजांच्या आशिर्वादाने भोईसमाज युवा मंच मालेगाव येथील सन्मान सोहळा चंदनपुरी येथे उत्साहात संपन्न
भोईसमाज युवा मंच तालुका मालेगाव जि नाशिक च्या वतीने आज श्री खंडेराव महाराज यांच्या पावन भुमी चंदण पुरी येथे अमेरीका येथे बॅंक अॉफ अमेरीकेत सिनिअर टेक असिस्टंट या पदावर नियुक्ती झाल्या बद्दल तसेच भोईसमाज युवा मंच मॄलेगाव तालुका कार्यकारणीचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता, कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी भोईसमाज महासंघ धुळेचे अध्यक्ष श्री गणेशजी मोरे प्रमुख पाहुणे म्हणुन भोईसमाज युवा मंच प्रमुख ज्ञानेश्वरजी खैरमोडे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री तुषारजी साटोटे, नाशिक जिल्हाध्यक्ष राजेशी मोरे, नाशिक ग्रामिण जिल्हाध्यक्ष सुनिलजी सोपे, नाशिक शहराध्यक्ष गोकुळजी शिवदे, तसेच शिरपुर येथील समाज भुषन सुभाषजी भोई, साप्ता तरुण गर्जना वृत्तपत्राचे मुख्यसंपादक संतोषजी भोई, कवि चित्रकार तथा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री यशवंत निकवाडे सर मालेगाव येथिल मच्छिमार सोसायटीचे मा चेअरमन सुरेशजी शिवदे, गौरवजी ढोले, श्री धनराज वाडिले भोईसमाज युवा मंच नाशिक शहर सचिव, श्री अनिल शिवदे नाशिक शहर सहसचिव आदि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला सदर कार्यक्रमात कुमारी भाग्यश्रीवर अभिनंदनाचा वर्षाव करतांना भोईसमाजाच्या विविध गावातुन तिचा सन्मान करण्यात आला, तिच्या या कामगिरीमुळे भोईसमाजातील विद्यार्थांना व विद्यार्थीनींना प्रेरणा मिळेल असे मान्यवरांनी सांगितले तसेच भोईसमाज सर्वांगिण विकासाठी व मुलामुली मध्ये भेदभाव न ठेवाता, स्रीभ्रुण हत्या थांबविण्याच्या विशेष मोहिमेसाठी गाव तेथे शाखा स्थापनेची अधिकृत घोषना भोईसमाज युवा मंच प्रमुख ज्ञानेश्वरजी खैरमोडे यांनी केली तसेच भोईसमाज युवा मंचच्या ग्रामिण जिल्हाध्यक्ष पदि श्री विकास खेडकर यांची पदोन्नतीची घोषणा भोईसमाज युवा मंच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तुषार साटोटे यांनी केली तसेच कार्यक्रमाची सांगता करीत आभार भोईसमाज युवा मंच मालेगाव चे नवनियुक्त तालुकाध्यक्ष श्री संजयजी शिवदे यांनी केली, सर्व आयोजक टीम ने विशेष प्रयत्न करुन कार्यक्रम यशस्वी केला.
Friday, August 27, 2021
भोई समाज युवा मंच व मच्छिमार समाजाचे मालेगाव येथे विविध मागण्यांसाठी आंदोलन
भोई समाज युवा मंच व मच्छिमार समाजाचे मालेगाव येथे विविध मागण्यांसाठी आंदोलन
#जय_भोईराज... #जय_मच्छिमार....
भोई समाज युवा मंच तर्फे दिनांक 26 ऑगस्ट 2021 रोजी मालेगाव येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रहार संघटना,मच्छिमार बांधवांनी विविध मागण्या साठी तसेच गिरणा धरण सोडण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते..या आंदोलनात विविध संघटना पदाधिकारी उपस्थित होते.
मच्छिमार समाजाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी मालेगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय येथील आंदोलनाला ज्या राजकीय पक्षांनी,पदाधिकारींनी पाठिंबा दिला.... भोईसमाज युवा मंचच्या आव्हानाला आपण दिलेल्या उस्फुर्त प्रतिसादा बद्दल मनःपुर्वक आभार....तसेच सलंग्न संघटना कहार समाज संघटना चे सर्व समाज बांधव तथा सन्माननिय पदाधिकारी चे हि मनःपुर्वक आभार....
🚩🚩 धरण छोडो तो झाकी, असली लढाई अभी बाकी है 🚩🚩
आपलेच - भोईसमाज युवा मंच महाराष्ट्र
Sunday, July 25, 2021
भोई समाज युवा मंच खामगाव शहर कार्यकारणी जाहीर💐
*भोई समाज युवा मंच खामगाव शहर कार्यकारणी जाहीर*
खामगाव प्रतिनिधी:भोई समाज युवा मंच *प्रमुख ज्ञानेश्र्वर खैरमोडे यांच्या आदेशावरून भोई समाज युवा मंच अमरावती विभागीय अध्यक्ष निलेश मधुकर साटोटे *कार्यक्रमाचे अध्यक्ष***:-प्रल्हादराव शिरजोशे अध्यक्ष भोई बहुद्वेशीय संस्था खामगाव , *प्रमुख पाहुणे* मा श्री रमेशराव भामद्रे *प्रमुख उपस्थितीत*: राजेशजी नेमाडे विस्तार अधिकारी नादुरा ,अशोकराव बावणे,प्रकाश शिरजोशे यांच्या उपस्थितीत खामगाव शहराची कार्यकारणी एका प्रसिध्दीपत्रव्दारे जाहीर करण्यात आली
त्यांनुसार भोई समाज युवा मंच खामगाव *शहर अध्यक्ष पदी* :- श्री अतिष अशोक श्रीनाथ यांची निवड करण्यात आली तर *उपाध्यक्ष पदी* :- श्री सतीष किसन मेसरे, श्री सुरज मारोती इटे, *सचिव पदी* :- श्री राहुल प्रकाश इटे, *सहसचिव* :- श्री सागर गणेश भारसाकळे, *कोषाध्यक्ष* :- श्री विक्की प्रकाश सुर्यवंशी, *सहकोषाध्यक्ष* :- श्री शुभम रामेश्र्वर मोरे, *प्रसिध्दी प्रमुख* :- ऋषी सुभाष मोरे , *संघटक प्रमुख* :- प्रेम गोपाळ भारसाकळे , *सहसंघटक प्रमुख* :- सुशांत कैलास श्रीनाथ , *सल्लागार प्रमुख* :- गौरव विनोद कावनपुरे , राज धारपवार , सौरभ दीपक मेसरे ,
*सदस्य* :- सागर प्रकाश भारसाकळे , विवेक आंनदा भारसाकाळे , प्रतीक फकिरा बनसोडे , रोशन रमेश श्रीनाथ , शुभम भगवान भामोद्रे , वैभव महादेव सूर्यवंशी , अक्षय आनंदा श्रीनाथ ,चंदन आंबदास भारसाकळे ,यांची निवड करण्यात त्यावेळी समस्त भोई समाज बाधंव उपस्थितीत होते
Wednesday, July 14, 2021
आमचा पदाधिकारी... आमचा अभिमान....
श्री.विकास भाऊ खेडकर मालेगाव तालुकाध्यक्ष
आमचा पदाधिकारी आमचा अभिमान
🚩🚩🚩🚩
भोई समाज युवा मंचच्या संघटनात्मक उपक्रमानुसार या आठवड्यातील उल्लेखनीय कार्य करणारे पदाधिकारी आहेत,उत्कृष्ट समाजसेवक *मालेगाव तालुका अध्यक्ष श्री विकास भाऊ खेडकर* त्यांनी संपूर्ण *मालेगाव तालुक्यात अतिशय मजबूत संघटन निर्माण केल्याबद्दल आपल्या वेबसाइटवर* त्यांचा *आमचा पदाधिकारी आमचा अभिमान* म्हणून *सन्मान करण्यात येत आहे...*
*आपले मनःपूर्वक अभिनंदन* 💐💐
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*आपलेच*
*भोई समाज युवा मंच, महाराष्ट्र*
हाक तुमची .....✊🏻✊🏻
साथ आमची....🤝🏻🤝🏻
*भोई समाज युवा मंच महाराष्ट्र*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://bhoisamajyuvamanch1.blogspot.com
Wednesday, June 30, 2021
भोई समाज युवा मंच पदाधिकारी यांचा अभिनव उपक्रम....आमचा पदाधिकारी आमचा अभिमान.....
आमचा पदाधिकारी आमचा अभिमान.....
भोई समाज युवा मंच जळगाव शहर सचिव श्री.खुशाल मोरे यांचा आज वाढदिवस...🎂🎂
वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी गेल्या वर्षांपासून एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे, आपण समाजाचे काही देने लागतो याची जाणीव ठेवून ते दरवर्षी ते रक्तदान ♦️♦️करून समाजचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करतात.....
💐💐💐
खुशाल जी मोरे खरोखरच आम्हाला आपला खूप अभिमान वाटतोय,की आपण भोई समाज युवा मंच चे सदस्य आहात...
समाजसेवा हीच ईश्वरसेवा हे आपण आपल्या कृतीतून सिध्द केले..
आपल्या कार्यास मनःपूर्वक सलाम👏
🤝🤝🤝🙏🙏💐💐💐
आपल्या वाढदिवसानिमित्त आपणांस मनपूर्वक शुभेच्छा...🎂🎂💐💐💐
आई जगदंबा आपणांस उदंड आयुष्य व सुख समृद्धी देवो ही सदिच्छा....
💐💐💐💐
हाक तुमची......
✊✊✊✊
साथ आमची....
🤝🤝🤝🤝
👇👇👇👇
भोई समाज युवा मंच महाराष्ट्र
Monday, June 21, 2021
संघटना का वाढत नाही....???
संघटना का वाढत नाही....????
प्रत्येक सदस्यांनी यात आपण कुठल्या प्रकारात बसतो याचा विचार करावा_
1.तोकडा अभ्यास, सखोल अभ्यास न करता मतप्रदर्शन करणे. वस्तुस्थिती विचारात न घेणे.
2.वर्तमान घडामोडीचे अज्ञान.
3.चळवळीबाबत चिंता आणि तळमळ जास्त, परंतु प्रयत्नांत कमतरता.
4.सर्वसमावेशक भूमिकेचा अभाव
5.सांघिक भावनेचा अभाव.
6.वैयक्तिक कामे करण्याची धडपड.
7.संघटनेचे म्हणणे सोयीप्रमाणे मानणे.
8.स्वप्नाळू जास्त व वास्तववादी कमी.
9.जिंकू शकतो यांवर विश्वास नसणे.
10.मानापमानामध्ये झुरणे.
11.जबाबदारी स्वीकारायला पुढे न येणे.
12.सुसंवादाचा अभाव.
13. युध्दाच्या वेळी घरी बसणे व युध्द झाल्यावर लढण्याच्या गप्पा मारणे.
14.कामशूर कमी आणि बातशूर जास्त.
15.बोलण्यात आणि प्रत्यक्ष वागण्यात तफावत असणे.
16.काम करणा-यावर सतत टिका टिपणी करणे, मात्र स्वतः
जबाबदारी न स्वीकारणे.
17.कम्फर्ट झोनमध्ये काम करणे.
18.स्वतः चे दैनंदिन रुटिन न बिघडविता बदल करण्याची भाबडी इच्छा बाळगणे...
19. नेतृत्वाकडून मोठ्या अपेक्षा ठेवणे परंतु त्याचे आदेश न पाळणे.
20.सहजशक्य नसलेले ध्येय निवडणे आणि सोपी कामे न करणे.
*21.दुस-याकडून त्यागाची अपेक्षा ठेवणे, स्वतः मात्र सुरक्षित रहाणे.*
22.एकमेकांच्या चांगल्या गुणांचा सन्मान न करणे.
23.आपल्याच विचारांची टिमकी वाजविणे व इतरांनी केलेल्या चांगल्या कामांची दखल न घेणे.
24.आपल्या नेतृत्वा बद्दल आदर न बाळगणे आणि सतत दोष काढत रहाणे.
25.संघटनेच्या कार्यपद्धतीवर विश्वास नसणे.
26.संघटनेत कार्य करण्यासाठी इच्छाशक्तीचा अभाव असणे.
27.पराकोटिचा आणि अनावश्यक अहंकार असणे
28.सर्व काही सहज आणि संघर्ष न करता मिळावे अशी समजूत असणे.
29.सामाजिक आणि सार्वजनिक प्रश्नांपेक्षा व्यक्तिगत प्रश्न मोठे समजणे.
30.ऐन महत्वाच्या वेळी बहाने सांगणे
ज्यांना संघटनशक्तीचे महत्व कळते, इतरांना सहकार्य आणि मदत करण्याची इच्छा असते,दुःखी आणि कष्टी लोकांचे दुःख दूर करण्याची इच्छा असते,ज्यांना संघटीत राहून सामाजिकशक्ती निर्माण करण्याची इच्छा असते,जे विचार करतात,चिंतन करतात,मंथन करतात,ज्यांचेकड़े संयम(Patience) असते अशीच माणसे संघटनेत टिकतात. 🙏🙏
🙏🙏🙏 🙏 🙏🙏🙏🙏
Saturday, June 12, 2021
आमचा पदाधिकारी आमचा अभिमान
आमचा पदाधिकारी आमचा अभिमान
🚩🚩🚩🚩
भोई समाज युवा मंचच्या संघटनात्मक उपक्रमानुसार या आठवड्यातील उल्लेखनीय कार्य करणारे पदाधिकारी आहेत,अमरावती विभाग सचिव श्री उमेश जी राजगुरे* त्यांनी संपूर्ण * अमरावती विभागात अतिशय मजबूत संघटन निर्माण केल्याबद्दल आपल्या वेबसाइटवर* त्यांचा *आमचा पदाधिकारी आमचा अभिमान* म्हणून *सन्मान करण्यात येत आहे...*
*आपले मनःपूर्वक अभिनंदन* 💐💐
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*आपलेच*
*भोई समाज युवा मंच, महाराष्ट्र*
हाक तुमची .....✊🏻✊🏻
साथ आमची....🤝🏻🤝🏻
*भोई समाज युवा मंच महाराष्ट्र*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://bhoisamajyuvamanch1.blogspot.com
Friday, June 4, 2021
आमचा पदाधिकारी आमचा अभिमान....
आमचा पदाधिकारी आमचा अभिमान
🚩🚩🚩🚩
भोई समाज युवा मंचच्या संघटनात्मक उपक्रमानुसार या आठवड्यातील उल्लेखनीय कार्य करणारे पदाधिकारी आहेत, प्रसिद्ध उद्योजक *पुणे जिल्हा अध्यक्ष श्री उमेश जी श्रावणे* त्यांनी संपूर्ण *पुणे जिल्ह्यात अतिशय मजबूत संघटन निर्माण केल्याबद्दल आपल्या वेबसाइटवर* त्यांचा *आमचा पदाधिकारी आमचा अभिमान* म्हणून *सन्मान करण्यात येत आहे...*
*आपले मनःपूर्वक अभिनंदन* 💐💐
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*आपलेच*
*भोई समाज युवा मंच, महाराष्ट्र*
हाक तुमची .....✊🏻✊🏻
साथ आमची....🤝🏻🤝🏻
*भोई समाज युवा मंच महाराष्ट्र*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://bhoisamajyuvamanch1.blogspot.com





































