Wednesday, June 30, 2021

भोई समाज युवा मंच पदाधिकारी यांचा अभिनव उपक्रम....आमचा पदाधिकारी आमचा अभिमान.....

 




भोई समाज युवा मंच पदाधिकारी यांचा अभिनव उपक्रम....

आमचा पदाधिकारी आमचा अभिमान.....

भोई समाज युवा मंच जळगाव शहर सचिव श्री.खुशाल मोरे यांचा आज वाढदिवस...🎂🎂

वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी गेल्या वर्षांपासून एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे,  आपण समाजाचे काही देने लागतो याची जाणीव ठेवून ते दरवर्षी ते रक्तदान ♦️♦️करून समाजचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करतात.....

💐💐💐

खुशाल जी मोरे खरोखरच आम्हाला आपला खूप अभिमान वाटतोय,की आपण भोई समाज युवा मंच चे सदस्य आहात...

समाजसेवा हीच ईश्वरसेवा हे आपण आपल्या कृतीतून सिध्द केले..

आपल्या कार्यास मनःपूर्वक सलाम👏

🤝🤝🤝🙏🙏💐💐💐

आपल्या वाढदिवसानिमित्त आपणांस मनपूर्वक शुभेच्छा...🎂🎂💐💐💐

आई जगदंबा आपणांस उदंड आयुष्य व सुख समृद्धी देवो ही सदिच्छा....

💐💐💐💐


हाक तुमची......

✊✊✊✊

साथ आमची....

🤝🤝🤝🤝


👇👇👇👇

भोई समाज युवा मंच महाराष्ट्र


Monday, June 21, 2021

संघटना का वाढत नाही....???

 


संघटना का वाढत  नाही....????

 प्रत्येक सदस्यांनी यात आपण कुठल्या प्रकारात बसतो याचा विचार करावा_


1.तोकडा अभ्यास, सखोल अभ्यास न करता मतप्रदर्शन करणे. वस्तुस्थिती विचारात न घेणे.

2.वर्तमान घडामोडीचे अज्ञान.

3.चळवळीबाबत चिंता आणि तळमळ जास्त, परंतु प्रयत्नांत कमतरता.

4.सर्वसमावेशक भूमिकेचा अभाव

5.सांघिक भावनेचा अभाव.

6.वैयक्तिक कामे करण्याची धडपड.

7.संघटनेचे म्हणणे सोयीप्रमाणे मानणे.

8.स्वप्नाळू जास्त व वास्तववादी कमी.

9.जिंकू शकतो यांवर विश्वास नसणे.

10.मानापमानामध्ये झुरणे.

11.जबाबदारी स्वीकारायला पुढे न येणे.

12.सुसंवादाचा अभाव.

13. युध्दाच्या वेळी घरी बसणे व युध्द   झाल्यावर  लढण्याच्या गप्पा मारणे.

14.कामशूर कमी आणि बातशूर जास्त.

15.बोलण्यात आणि प्रत्यक्ष वागण्यात तफावत असणे.

16.काम करणा-यावर सतत टिका टिपणी करणे, मात्र स्वतः

जबाबदारी न स्वीकारणे.

17.कम्फर्ट झोनमध्ये काम करणे.

18.स्वतः चे दैनंदिन रुटिन न बिघडविता बदल करण्याची भाबडी इच्छा बाळगणे...

19. नेतृत्वाकडून मोठ्या अपेक्षा ठेवणे   परंतु त्याचे आदेश न पाळणे.

20.सहजशक्य नसलेले ध्येय निवडणे आणि सोपी कामे न करणे.

*21.दुस-याकडून त्यागाची अपेक्षा ठेवणे, स्वतः मात्र सुरक्षित रहाणे.*

22.एकमेकांच्या चांगल्या गुणांचा सन्मान न करणे.

23.आपल्याच विचारांची टिमकी वाजविणे व इतरांनी केलेल्या चांगल्या कामांची दखल न घेणे.

24.आपल्या नेतृत्वा बद्दल आदर न बाळगणे आणि सतत दोष काढत रहाणे.

25.संघटनेच्या कार्यपद्धतीवर विश्वास नसणे.

26.संघटनेत कार्य करण्यासाठी इच्छाशक्तीचा अभाव असणे.

27.पराकोटिचा आणि अनावश्यक अहंकार असणे

28.सर्व काही सहज आणि संघर्ष न करता मिळावे अशी समजूत असणे.

29.सामाजिक आणि सार्वजनिक प्रश्नांपेक्षा व्यक्तिगत प्रश्न मोठे समजणे.

30.ऐन महत्वाच्या वेळी बहाने सांगणे

ज्यांना संघटनशक्तीचे महत्व कळते, इतरांना सहकार्य आणि मदत करण्याची इच्छा असते,दुःखी आणि कष्टी लोकांचे दुःख दूर करण्याची इच्छा असते,ज्यांना संघटीत राहून सामाजिकशक्ती निर्माण करण्याची इच्छा असते,जे विचार करतात,चिंतन करतात,मंथन करतात,ज्यांचेकड़े संयम(Patience) असते अशीच माणसे संघटनेत टिकतात.  🙏🙏


    🙏🙏🙏 🙏 🙏🙏🙏🙏

Saturday, June 12, 2021

आमचा पदाधिकारी आमचा अभिमान


 आमचा पदाधिकारी आमचा अभिमान

🚩🚩🚩🚩

भोई समाज युवा मंचच्या संघटनात्मक उपक्रमानुसार या आठवड्यातील उल्लेखनीय कार्य करणारे पदाधिकारी आहेत,अमरावती विभाग सचिव श्री उमेश जी राजगुरे* त्यांनी संपूर्ण * अमरावती विभागात अतिशय मजबूत संघटन निर्माण केल्याबद्दल आपल्या वेबसाइटवर*  त्यांचा *आमचा पदाधिकारी आमचा अभिमान* म्हणून *सन्मान करण्यात येत आहे...*

*आपले मनःपूर्वक अभिनंदन* 💐💐

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

*आपलेच*

*भोई समाज युवा मंच, महाराष्ट्र*


हाक तुमची .....✊🏻✊🏻

       साथ आमची....🤝🏻🤝🏻

*भोई समाज युवा मंच  महाराष्ट्र*

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://bhoisamajyuvamanch1.blogspot.com

Friday, June 4, 2021

आमचा पदाधिकारी आमचा अभिमान....


श्री.उमेश जी श्रावणे पुणे जिल्हाध्यक्ष

आमचा पदाधिकारी आमचा अभिमान

🚩🚩🚩🚩

भोई समाज युवा मंचच्या संघटनात्मक उपक्रमानुसार या आठवड्यातील उल्लेखनीय कार्य करणारे पदाधिकारी आहेत, प्रसिद्ध उद्योजक *पुणे जिल्हा अध्यक्ष श्री उमेश जी श्रावणे* त्यांनी संपूर्ण *पुणे जिल्ह्यात अतिशय मजबूत संघटन निर्माण केल्याबद्दल आपल्या वेबसाइटवर*  त्यांचा *आमचा पदाधिकारी आमचा अभिमान* म्हणून *सन्मान करण्यात येत आहे...*

*आपले मनःपूर्वक अभिनंदन* 💐💐

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

*आपलेच*

*भोई समाज युवा मंच, महाराष्ट्र*


हाक तुमची .....✊🏻✊🏻

       साथ आमची....🤝🏻🤝🏻

*भोई समाज युवा मंच  महाराष्ट्र*

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://bhoisamajyuvamanch1.blogspot.com

भोईसमाजाची रणरागिणी देणार कोविड ऋग्णांना योगासनांचे धडे

 



भोईसमाजाची रणरागिणी देणार कोविड ऋग्णांना योगासनांचे धडे



अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ च्या वतीने महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्हा अध्यक्ष सौ. वीणा दुर्वास निमकर (भोई)  व त्यांची टीम यांनी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री श्री.राजेश टोपे साहेब यांची दि.०२ जून २०२१ रोजी दुपारी २.३५ वा भेट घेतली. या भेटीमध्ये वीणा निमकर यांनी कोविड सेंटरला नियमितपणे ऑफलाईन/ऑनलाईन योगाभ्यास वर्ग सुरू करण्यासाठी परवानगी देण्याबाबत प्रस्ताव मांडला. आरोग्यमंत्री श्री.राजेश टोपे साहेब  यांनी सर्व जिल्हाधिकारी यांना कोविड केअर सेंटर मधील लोकांना योगशिक्षणाचा उपयोग होईल अशा सूचना देण्याचे आश्वासन देऊन ह्या प्रस्तावावर विचार केला गेल्यास अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाच्या महाराष्ट्र राज्याची प्रशिक्षित योगशिक्षकांची  टीम तयार आहे का?? असा प्रश्न उपस्थित केला. तरी वीणा निमकर यांनी योगशिक्षकांची टीम तयार असल्याचे सांगत आम्हाला आरोग्य क्षेत्रात कोविड रुग्णांना योग शिकविण्याची संधी देण्यात यावी असे सांगितले, राजेश टोपे सरांनी प्रस्ताव चांगला असून यावर नक्कीच विचार करू असे सांगत अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाच्या महाराष्ट्र जिल्ह्यातील प्रशिक्षित योग शिक्षकांची टीम तयार ठेवण्यास सांगितले.