भोईसमाजाची रणरागिणी देणार कोविड ऋग्णांना योगासनांचे धडे
अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ च्या वतीने महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्हा अध्यक्ष सौ. वीणा दुर्वास निमकर (भोई) व त्यांची टीम यांनी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री श्री.राजेश टोपे साहेब यांची दि.०२ जून २०२१ रोजी दुपारी २.३५ वा भेट घेतली. या भेटीमध्ये वीणा निमकर यांनी कोविड सेंटरला नियमितपणे ऑफलाईन/ऑनलाईन योगाभ्यास वर्ग सुरू करण्यासाठी परवानगी देण्याबाबत प्रस्ताव मांडला. आरोग्यमंत्री श्री.राजेश टोपे साहेब यांनी सर्व जिल्हाधिकारी यांना कोविड केअर सेंटर मधील लोकांना योगशिक्षणाचा उपयोग होईल अशा सूचना देण्याचे आश्वासन देऊन ह्या प्रस्तावावर विचार केला गेल्यास अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाच्या महाराष्ट्र राज्याची प्रशिक्षित योगशिक्षकांची टीम तयार आहे का?? असा प्रश्न उपस्थित केला. तरी वीणा निमकर यांनी योगशिक्षकांची टीम तयार असल्याचे सांगत आम्हाला आरोग्य क्षेत्रात कोविड रुग्णांना योग शिकविण्याची संधी देण्यात यावी असे सांगितले, राजेश टोपे सरांनी प्रस्ताव चांगला असून यावर नक्कीच विचार करू असे सांगत अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाच्या महाराष्ट्र जिल्ह्यातील प्रशिक्षित योग शिक्षकांची टीम तयार ठेवण्यास सांगितले.
No comments:
Post a Comment
🚩🚩🚩 जय भोईराज....🚩🚩🚩