किसान क्रेडिट कार्ड योजना
*
CONTENTS*
१)किसान क्रेडिट कार्ड योजनेचा काय लाभ आहे?
२)किसान क्रेडिट कार्ड कसे मिळवावे?
३)भारतातील अग्रगण्य बँकांची किसान क्रेडिट कार्डस्
किसान क्रेडिट कार्ड योजनेचा काय लाभ आहे?
*वाचा सविस्तर माहिती*
पैशाच्या वाटपाच्या पध्दती सोप्या करते
नगद आणि स्वरूपासंबंधी कठिणपणा काढून टाकते
प्रत्येक पिकासाठी कर्जाकरीता अर्ज करण्याची गरज नाही
शेतकरयासाठी व्याजाचा भार कमी करणे शक्य करीत कोणत्या ही वेळी खात्रीलायकपणे कर्ज मिळण्याची हमी
शेतकरयाच्या सवडी आणि निवडीप्रमाणे बियाणे, उर्वरके खरेदी करण्यास मदत करते
डीलर्स कडून कॅश अव्हेल डिस्काउंट (नगद लाभ सूट) वर खरेदी करण्यास मदत करते
वर्षांपर्यंत कर्जाची सुविधा - हंगामी मूल्यांकनाची गरज नाही
जास्तीत जास्त कर्जाची मर्यादा (सीमा) शेतीच्या उत्पन्नावर आधारित
किती वेळा पैसे काढू शकता ती संख्या कर्ज सीमेवर अवलंबून
परतफेड फक्त हंगामा नंतर
शेतीसाठी घेतलेल्या आगावू रकमेवर व्याज दर लागू असल्याप्रमाणे
जामीन, मार्जिन व दस्तऐवजांचे मानक शेतीसाठी घेतलेल्या आगावू रकमेवर लागू असल्याप्रमाणे
केंद्र सरकारने किसान क्रेडीट कार्ड ही सुविधा आता मासेमारांना मत्स्य व्यवसायाकरीता आर्थिक सहाय्य मिळावे, यासाठी सुरु केली आहे. या योजने अंतर्गत मत्स्य शेतकऱ्यांना मत्स्य संवर्धनासाठी बीज, खाद्य, खते, प्रो-बायोटीक्स, तलावांचे नुतनीकरण, मत्स्यबीज केंद्रांसाठी आवर्ती खर्च, मासळी महिला विक्रेता यांच्याकरीता खेळते भाग भांडवल, तलाव ठेक्याने घेताना तलावाच्या भाडेपट्टीच्या पूर्ततेसाठी अर्थसहाय्य इत्यादी प्राथमिक भांडवलाची गरज भागविण्यासाठी अर्थसहाय्य दिले जाणार आहे. अर्थसहाय्य वेळेत परत केल्यास शासन व्याजदरात ३ टक्क्यांपर्यंत सवलत देणार आहे. अर्थसहाय्य सुलभरित्या मिळावे याकरीता किसान क्रेडीट कार्ड दिले जाणार आहे.*
किसान क्रेडिट कार्ड कसे मिळवावे*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
आपल्या नजीकच्या पब्लिक सेक्टर बँकेस भेट द्या आणि तपशील मिळवा
पात्र असलेल्या शेतकरयांना किसान क्रेडिट कार्ड आणि एक पासबुक मिळेल. त्यामध्ये नांव, पत्ता, जमिनीच्या मालकीचे (स्वामित्वाचे) विवरण, कर्ज घेण्याची सीमा, कायदेशीर मान्यता काळ, धारकाचा एक पासपोर्ट आकाराचा फोटो ज्याचा उपयोग ओळख पत्र आणि नेहमीच्या व्यवहाराची नोंद करण्याची सोय असे दोन्ही हेतू साध्य करण्यासाठी करण्यात येईल.
हे पासबुकवजा कार्ड धारकाने दाखवावे जेव्हां ती/तो खात्याचे संचालन करील.
हाक तुमची....✊🏻✊🏻
साथ आमची....✊🏻✊🏻
*सदैव आपलेच*
भोई समाज युवा मंच महाराष्ट्र