Monday, February 13, 2023

श्री खंडेराव महाराज व श्री बानुबाई यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मालेगाव नगरीत भोई समाज युवा मंच मालेगाव आयोजित वधु वर परिचय मेळावा मालेगाव येथे संपन्न a

 



श्री खंडेराव महाराज व श्री बानुबाई यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मालेगाव नगरीत भोई समाज युवा मंच मालेगाव आयोजित  वधु वर परिचय मेळावा मालेगाव येथे संपन्न








आज दिनांक 12 फेब्रुवारी  भोई समाज युवा मंच मालेगाव आयोजित राज्यस्तरीय भोई समाज वधु वर परीचय मेळावा कृष्णा लॉन्स मालेगाव येथे भोई समाज युवा मंच प्रदेश अध्यक्ष तुषार साटोटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.मेळाव्यात 400 वधु वरांनी नोंदणी केली होती.100 च्या वर वधु वरांनी आपला परिचय दिला.राज्यभरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.भोई समाज युवा मंच वधु वर पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे आंतर राष्ट्रीय क्रिकेटपटू अजिंक्य बावणे यांचे वडील श्री रामदासजी बावणे साहेब,बुध्दीबळपटू विनायक वाडीले ,अजिंक्य दादा भुसे,अमोलदादा दिनकर पाटील ,राष्ट्रीय अध्यक्ष नरेश उखंडे,युवा मंच प्रमुख ज्ञानेश्वर खैरमोडे,कोअर कमिटी अध्यक्ष किशोर शिवदे,श्री.एस.ए भोई सर, गणेशबापू मोरे (धुळे),लक्ष्मण भाऊ वाडिले नंदुरबार,वामन आप्पा तमखाने,यशवंत भाऊ शिवदे जळगाव ,संजय इंगळे अकोला,सी एम भोई सर शिरपूर,रामचंद्र काळे मालेगांव, सुरेश शिवदे मालेगाव, कैलास ढोले मालेगाव,भिलेश भाऊ खेडकर,गणेशभाऊ सपकाळ, बापूराव मोरे दाभाडी ,युवा मंच कोअर कमिटी,प्रदेश कार्यकारणी आदी मान्यवर उपस्थित होते.मेळावा यशस्वीते साठी नाशिक जिल्हाध्यक्ष विकास खेडकर ,मालेगाव तालुकाध्यक्ष संजय शिवदे,बापू मोरे,निलेश वाडीले,राजेश मोरे,निलेश शिवदे,निलेश वाडीले,महारु शिवदे,चेतन मोरे,निलेश साटोटे, गोकुळ शिवदे,दिलीप जावरे, दिलीप खेडकर,गोरख शिवदे,सोनू मोरे,कांतीलाल वायडे,शामभाऊ जावरे,सोनू मोरे,दिपक बरदे,सागर शिवदे भोई समाज समाज युवा मंच मालेगाव तालुका कार्यकारणी,प्रदेश कोअर कमिटी,प्रदेश कार्यकारणी यांनी मेहनत घेतली.भोईराज युवा संघटना मालेगाव यांचे कार्यक्रमास विशेष सहकार्य लाभले.भोई समाज वधु वर परिचय मेळावा सूत्र संचालन श्री.यशवंत निकवाडे सर यांनी केले  शेवटी श्री.किशोर शिवदे सर यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.