भोई समाज युवा मंच पुणे जिल्हाध्यक्ष श्री.उमेश श्रावणे यांचा अभिनव उपक्रम
सर्वांना नमस्कार आणि जय भोईराज
मी श्री उमेश श्रावणे, भोई समाज युवा मंच महाराष्ट्र, पुणे जिल्हा अध्यक्ष आपल्या सर्व भोई समाज बांधवांना एक आनंदाची गोष्ट म्हणा या बातमी सांगू इच्छितो की, आपल्या समाजातील बहुतांश मुलं आणि मुली ह्या उच्च शिक्षणाकरिता ज्या प्रमाणामध्ये प्रवेश मिळायला पाहिजे त्या प्रमाणात त्यांना यश मिळत नाही असे सर्वसाधारणपने दिसते.
इंजीनियरिंग शिक्षणाच्या बाबतीत झाले तर त्याची पात्रता परीक्षा म्हणून जे ई इ असते. आणि वैद्यकीय शिक्षणाकरिता नीट ही पात्रता परीक्षा असते.वैद्यकीय शिक्षणा करिता प्रवेश मिळवायचा झाल्यास नीट या परीक्षेमध्ये उत्तम प्रकारे ज्याचा निकाल असतो त्यालाच वैद्यकीय शिक्षणाकरिता प्रवेश मिळते. त्यातही आपल्याला 2.5% कोटा राखीव आहे ह्या कोट्या मार्फत आपल्याला प्रवेश मिळवायचा झाल्यास खूप खूप मेहनत आणि अभ्यास करून प्रवेश मिळवावा लागतो. आपल्या समाजात ज्या पद्धतीने जागरूकता व्हायला पाहिजे त्या पद्धतीने अजूनही आपल्या मुलांमध्ये ते कौशल्य आलेले नाही . आपले मुलं त्यामानाने मागे राहतात याला कारणही अनेक असू शकतात.
नामांकित असलेले ट्युशन क्लासेस यांची भरमसाठ फी आहे जी एका वर्षाकरिता दीड ते दोन लाख रुपये आहेत आपल्या गरीब बांधवांमध्ये होतकरू मुलं असले तरीही भरमसाठ फी मुळे आपण तसे क्लास जॉईन करू शकत नाहीत. परिणामतः मुलांना पात्रता परीक्षेमध्ये कमी गुण मिळतात आणि आपले मुलं नीट असो या जे ई ई परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत नाहीत. आपल्या मुला मुलीला कमी गुण मिळाले तर जवळपास दीड करोड रुपये असल्यास आपण आपल्या पाल्याला एमबीबीएस बनवू शकतो. आणि जर एवढा पैसा आपल्याकडे नसेल तर आपले व आपल्या पाल्याचे स्वप्न हे स्वप्नच राहते.
अशा माझ्या भोई समाजातील गरीब आणि होतकरू मुला-मुलींकरिता पुण्यातीलच नाही तर भारतात नावलौकिक असलेले दोन ट्युशन क्लासेस चे पुस्तकाचे संच माझ्याकडे उपलब्ध आहेत.
नामांकित ट्युशन क्लास च्या उपलब्ध असलेल्या दोन संचं मधून जर अभ्यास केला तर निश्चितच आपले स्वप्न पूर्ण होऊ शकते त्याकरिता कठोर परिश्रम घेणे हे गरजेचे असतेच. सदर पुस्तकांमधून चांगला अभ्यास केल्यास आपला पाल्य आयआयटी आणि वैद्यकीय शिक्षणाच्या फेरी चांगल्या मार्काने आपले नाव नोंद करू शकतो आणि त्याला ती राखीव जागा मिळू शकते.
ज्या कुठल्या गरीब होत करू समाज बांधवांना या पुस्तकाचा लाभ पाहिजे असल्यास कृपया मला संपर्क करणे ही पुस्तक सर्व समाज बांधवांना उपलब्ध होतील ग्रंथालयाप्रमाणे त्याची नोंद ठेवल्या जाईल. ह्या पुस्तकांच्या एकूण 71 नग आहेत. सर्व पुस्तके उत्कृष्ट पद्धतीमध्ये आहेत आपणही त्याचा वापर चांगल्या पद्धतीने करून आपल्या पाल्याचे भविष्य उज्वल करावे. ही सर्व पुस्तके पुण्यातील किंवा महाराष्ट्रातील होतकरू भोई समाज बांधवां करिता उपलब्ध होतील ने -आण चां खर्च हा स्वतःला करावा लागेल आणि पुस्तक चांगल्या स्थितीत परत करणे एवढीच माफक अपेक्षा राहील.
*सदरची सर्व पुस्तके आपल्या भोई समाजाचे सामाजिक कार्यकर्ते श्री दादाराव तुळशीरामजी खोडके पुणे* ह्यांनी आपल्या संस्थेला भोई समाजातील गरजवंतांना लाभ होवोत या उद्देशाने मोफत उपलब्ध करून दिलेली आहे. त्याकरिता त्यांचे खूप खूप धन्यवाद व आभार.👏🏻
*संपर्क मो 8308051451- 9881208000*
*Umesh Shrawane*
*Director Of*
*Vardhans Group*
Corporate Office: 18 , 3rd Floor, Metro 9 Building, Opposite Park Street, Rahatani, Pune. 411 017 Maharashtra. India.