Friday, November 4, 2022

भोई समाज युवा मंच पुणे जिल्हाध्यक्ष श्री.उमेश श्रावणे यांचा अभिनव उपक्रम

 

भोई समाज युवा मंच पुणे जिल्हाध्यक्ष श्री.उमेश श्रावणे यांचा अभिनव उपक्रम

सर्वांना नमस्कार आणि जय भोईराज

मी श्री उमेश श्रावणे, भोई समाज युवा मंच महाराष्ट्र, पुणे जिल्हा अध्यक्ष आपल्या सर्व भोई समाज बांधवांना एक आनंदाची गोष्ट म्हणा या बातमी सांगू इच्छितो की, आपल्या समाजातील बहुतांश मुलं आणि मुली ह्या उच्च शिक्षणाकरिता ज्या प्रमाणामध्ये प्रवेश मिळायला पाहिजे त्या प्रमाणात त्यांना यश मिळत नाही असे सर्वसाधारणपने दिसते.

इंजीनियरिंग शिक्षणाच्या बाबतीत झाले तर त्याची पात्रता परीक्षा म्हणून जे ई इ असते. आणि वैद्यकीय शिक्षणाकरिता नीट ही पात्रता परीक्षा असते.वैद्यकीय शिक्षणा करिता प्रवेश मिळवायचा झाल्यास नीट या परीक्षेमध्ये उत्तम प्रकारे ज्याचा निकाल असतो त्यालाच वैद्यकीय शिक्षणाकरिता प्रवेश मिळते. त्यातही आपल्याला 2.5%  कोटा राखीव आहे ह्या कोट्या मार्फत आपल्याला प्रवेश मिळवायचा झाल्यास खूप खूप मेहनत आणि अभ्यास करून प्रवेश मिळवावा लागतो. आपल्या समाजात ज्या पद्धतीने जागरूकता व्हायला पाहिजे त्या पद्धतीने अजूनही आपल्या मुलांमध्ये ते कौशल्य आलेले नाही . आपले मुलं त्यामानाने मागे राहतात याला कारणही अनेक असू शकतात.

नामांकित असलेले ट्युशन क्लासेस यांची भरमसाठ फी आहे जी एका वर्षाकरिता दीड ते दोन लाख रुपये आहेत आपल्या गरीब बांधवांमध्ये होतकरू मुलं असले तरीही  भरमसाठ फी मुळे आपण तसे क्लास जॉईन करू शकत नाहीत. परिणामतः मुलांना पात्रता परीक्षेमध्ये कमी गुण मिळतात आणि आपले मुलं नीट असो या जे ई ई परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत नाहीत. आपल्या मुला मुलीला कमी गुण मिळाले तर जवळपास दीड करोड रुपये असल्यास आपण आपल्या पाल्याला एमबीबीएस बनवू शकतो. आणि जर एवढा पैसा आपल्याकडे नसेल तर आपले व आपल्या पाल्याचे स्वप्न हे स्वप्नच राहते.

अशा माझ्या भोई समाजातील गरीब आणि होतकरू मुला-मुलींकरिता पुण्यातीलच नाही तर भारतात नावलौकिक असलेले दोन ट्युशन क्लासेस चे पुस्तकाचे संच माझ्याकडे उपलब्ध आहेत.

नामांकित ट्युशन क्लास च्या उपलब्ध असलेल्या दोन संचं मधून जर अभ्यास केला तर निश्चितच आपले स्वप्न पूर्ण होऊ शकते त्याकरिता कठोर परिश्रम घेणे हे गरजेचे असतेच. सदर पुस्तकांमधून चांगला अभ्यास केल्यास आपला पाल्य आयआयटी आणि वैद्यकीय शिक्षणाच्या फेरी चांगल्या मार्काने आपले नाव नोंद करू शकतो आणि त्याला ती राखीव जागा मिळू शकते.

ज्या कुठल्या गरीब होत करू समाज बांधवांना या पुस्तकाचा लाभ पाहिजे असल्यास कृपया मला संपर्क करणे ही पुस्तक सर्व समाज बांधवांना उपलब्ध होतील ग्रंथालयाप्रमाणे त्याची नोंद ठेवल्या जाईल. ह्या पुस्तकांच्या एकूण 71 नग आहेत. सर्व पुस्तके उत्कृष्ट पद्धतीमध्ये आहेत आपणही त्याचा वापर चांगल्या पद्धतीने करून आपल्या पाल्याचे भविष्य उज्वल करावे. ही सर्व पुस्तके पुण्यातील किंवा महाराष्ट्रातील होतकरू भोई समाज बांधवां करिता उपलब्ध होतील ने -आण चां खर्च हा स्वतःला करावा लागेल आणि पुस्तक चांगल्या स्थितीत परत करणे एवढीच  माफक अपेक्षा राहील.

*सदरची सर्व पुस्तके आपल्या भोई समाजाचे सामाजिक कार्यकर्ते श्री दादाराव तुळशीरामजी खोडके पुणे* ह्यांनी आपल्या संस्थेला भोई समाजातील गरजवंतांना लाभ होवोत या उद्देशाने मोफत उपलब्ध करून दिलेली आहे. त्याकरिता त्यांचे खूप खूप धन्यवाद व आभार.👏🏻 

 *संपर्क मो 8308051451- 9881208000*

 *Umesh Shrawane* 

 *Director Of* 

 *Vardhans Group* 

Corporate Office: 18 , 3rd Floor, Metro 9 Building, Opposite Park Street, Rahatani, Pune. 411 017 Maharashtra. India.

Wednesday, September 28, 2022

भोई समाज युवा मंच कोअर कमिटी अध्यक्षपदी श्री. किशोर शिवदे सर यांची निवड


 
अभिनंदन.....अभिनंदन.... अभिनंदन....

🚩 जय भोईराज 🚩


भोईसमाज युवा मंच,

 जिथे योग्य समाजकार्य आणि 

समाज सेवकाच्या कार्याची योग्य पावती 


✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻


भोईसमाज युवा मंच महाराष्ट्राच्या  नव्या राज्य कार्यकारणीची निवड करतांना अत्यंत आनंद होत आहे,  मागील काळात आपल्याकडे असलेल्या पदाला साजेसे कार्यकरुन भोईसमाज सेवेत आपला तन मन धनांने तसेच आपला बहुमुल्य  वेळ देऊन समाज हितांचे कार्य जेष्ठ, वरीष्ठांच्या मार्गदर्शनाने व आशिर्वादाने युवकांनसाठी, युवकांनी उभारलेले युवा व्यासपिठ भोईसमाज युवा मंचच्या कोअर कमिटी अध्यक्ष पदी मा श्री.किशोरजी शिवदे सर यांची निवड झाल्या बद्दल मनःपुर्वक अभिनंदन


💐💐💐💐💐💐💐


भावी सामाजिक कार्यास हार्दिक शुभेच्छा...!


💐💐💐💐💐💐💐💐💐

हाक दिली आहे, साद द्या

 समाजाला हक्क मिळवुण देण्यासाठी साथ द्या



आपलाच -

श्री ज्ञानेश्वर खैरमोडे

प्रमुख, भोईसमाज युवा मंच

Thursday, June 2, 2022

आमचा पदाधिकारी आमचा अभिमान ..🚩🚩

 


श्री.मुकेश भाऊ भोई जळगाव जिल्हाध्यक्ष भोई समाज युवा मंच

आमचा पदाधिकारी आमचा अभिमान

🚩🚩🚩🚩

भोई समाज युवा मंचच्या संघटनात्मक उपक्रमानुसार या आठवड्यातील उल्लेखनीय कार्य करणारे पदाधिकारी आहेत,उत्कृष्ट समाजसेवक *जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री मुकेश भाऊ भोई* त्यांनी पाळधी येथे समाज संघटित करून विविध पाठपुरावा करून भोई समाज वास्तू उभारण्यात मोलाचे काम केले तसेच संपूर्ण *जळगाव जिल्ह्यात भोई समाज युवा मंच चे अतिशय मजबूत संघटन निर्माण केल्याबद्दल आपल्या वेबसाइटवर*  त्यांचा *आमचा पदाधिकारी आमचा अभिमान* म्हणून *सन्मान करण्यात येत आहे...*

*आपले मनःपूर्वक अभिनंदन* 💐💐

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

*आपलेच*

*भोई समाज युवा मंच, महाराष्ट्र*


हाक तुमची .....✊🏻✊🏻

       साथ आमची....🤝🏻🤝🏻

*भोई समाज युवा मंच  महाराष्ट्र*

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://bhoisamajyuvamanch1.blogspot.com

Tuesday, May 31, 2022

पाळधी येथे भोई समाज भव्य वास्तूचे कॅबिनेट मंत्री.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न...












*जय भोई राज*


आश्वासन नाही प्रत्यक्ष कृती 

जे बोललो ते केले 

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


*भोई समाज मंदीर भव्य दिव्य उद्धाटन सोहळा व महाआरोग्य शिबीरांचे उद्धाटन उत्सहात संपन्न*


             ✍️ दि.२९/५ /२०२२ वार रविवार रोजी जळगांव जिल्ह्यातील,धरणगांव तालुक्यातील,पाळधी गावामध्ये महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा मंत्री व जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री *मा.श्री.भाऊसो.गुलाबरावजी पाटील*  यांच्या हस्ते काल भोई समाज मंदीर या भव्य वास्तुचा उद्धाटन सोहळा पार पडला व प्रथम श्री.संत भिमा भोई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अपर्ण करून उद्धाटन करण्यात आले व त्या नंतर  संपुर्ण पाळधी गावातील जनतेसाठी महाआरोग्य शिबीराचे पण उद्धाटन करण्यात आले काल मा.श्री.भाऊसो.गुलाबरावजी पाटील उर्वरीत जागेत पुंर्ण पेव्हर ब्लॉक बसवण्याचे सर्व समाज बाधंवासमोर सांगितले मागे काही वेळेस रेल्वेचे पोलीस आपल्या समाज बाधंवाना रेल्वेत शेगंदाणे विकु देत नव्हते व भरपुर त्रास देत होते एकदा भाऊं समोर हा विषय टाकला व भाऊंनी लगेच भुसावळ च्या डि.एम.आर यांची झाड़ाझडती केली तेव्हा पासुन आपल्या समाज बाधंवाना रेल्वेचे अधिकारी त्रास देत नाही हा फार महत्वाचा विषय होता आपल्या समाज बाधंवाचा उदरनिर्वाह यावर चालत होता म्हणुनच भाऊनी सर्व रेल्वे पोलीसांना फटकारले व भाऊनी सांगितले की भोई समाजा साठी काही अडचण आल्यास मी केव्हाही तुमच्या साठी तत्पर राहील हे भरसभेत भाऊनी सांगितले जळगांव जिल्हा टिम तर्फ भाऊचा सत्कार करण्यात आला  या उद्धाटन वेळी जळगांव जिल्हा विकास मंडळाचे अध्यक्ष जेष्ठ नेते मा.एस.ए.भोई सर,जेष्ठ मार्गदर्शक,सी.के भोई सर,जळगांव येथिल यशवंत भोई,महारू शिवदे,किरण भोई,शिवदास भोई हे उपस्थीत होते,आरोग्य शिबीरास श्री.संत भिमा भोई बहुउद्देशिय संस्था पाळधी गावाचे अध्यक्ष भिमराव भोई उपाध्यक्ष डिगंबर भोई सचिव प्रविण भोई सहचिव मुकेश भोई खजिनदार राजेद्र भोई सदस्य कमलेश भोई समाधान भोई प्रशांत भोई सागर भोई दिपक भोई प्रविण चव्हाण राजु भोई सुरेश भोई प्रविण भोई वासुदेव भोई उत्तम भोई किरण भोई नाना भोई दिपक भोई महेद्रं भोई शांताराम भोई कांतीलाल भोई श्यामराव भोई विजय भोई पुरुशोत्तम भोई पंकज भोई संतोष भोई लक्ष्मण भोई,दौलत भोई अविनाश भोई हर्षल भोई ईश्वर भोई धनराज भोई योगेश भोई भास्कर भोई राहुल भोई राकेश भोई प्रकाश भोई आनंदा भोई गजानन भोई भगवान भोई मंगलेश भोई काशिनाथ भोई एकनाथ भोई बुधा भोई लखन भोई कृष्णा भोई सचिन भोई महेश मोरे तुषार भोई रमेश भोई राजमल भोई बापु भोई उत्तम भोई राहुल भोई सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले गावातील मोठ्या संख्येने समाज बाधंव उपस्थीत होते 


✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*श्री.संत भिमा भोई बहुउद्देशिय संस्था पाळधी*

*समस्त भोई समाज*

*सर्व जळगांव जिल्हा टिम*



Thursday, May 26, 2022

येसगाव ता मालेगाव जि नाशिक येथे भोई समाज युवा मंच शाखा उद्घाटन संपन्न

संत भिमा भोई जयंतीनिमित्त येसगाव बु. ता.मालेगाव जि.नाशिक येथे भोई समाज युवा मंच शाखा उद्घाटन संपन्न

भोई समाज युवा मंच नाशिक जिल्ह्यात भोई समाज युवा मंच पहिलीच शाखा उद्घाटन येसगाव बु.येथे झाली आहे. भोई समाज युवा मंच प्रमुख ज्ञानेश्वर भाऊ खरमोडे तसेच नाशिक शहर जिल्हाध्यक्ष राजेश भाऊ मोरे ग्रामीण जिल्हाध्यक्ष विकास खेडकर मालेगाव तालुका अध्यक्ष संजय शिवदे मालेगाव तालुका अध्यक्ष गोरख भाऊ दिपक बरदे सतीश शिंवदे अर्जुन जावरे सोनु मोरे व भोई समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते




 

Saturday, April 16, 2022

भोई समाज कुळ यादी आवृत्ती दुसरी लोकार्पण

 🚩 *||जय श्रीराम ||जय हनुमान||* 🚩


🙏🏻🙏🏻 *जय भोईराज* 🙏🏻🙏🏻


*भोईसमाज युवा मंच महाराष्ट्र च्या वतीने भोईसमाज कुळ यादि आवृत्ती -२ समाज लोकार्पण*


   र१ मे २०२२ रोजी सेवा निवृत्त वाहन चालक तथा भोईसमाज युवा मंच चे मार्गदर्शक मा श्री सतिषजी फुलपगारे साहेब यांच्या सहा महिन्याच्या परीश्रमातुन सोशल मिडीया, वधुवर परीचय पुस्तके, वधु वर ग्रुप तथा भोईसमाज सामाजिक ग्रुप मधिल समाज बांधवांच्या कुळ वरुन संग्रहित केलेली कुळ यादि जाहिर करण्यात आली होती. भोईसमाज व उपजातींच्या कुळच्या नावाची यादि आवृत्ती २ आज श्री हनुमान जन्मोत्सव तथा चैत्रपौर्णिमेचे   औचित्य साधुन जाहिर करीत आहोत याचा खुप आनंद होत आहे, पहिल्या आवृत्तीच्या समाज लोकापर्णा नंतर अनेक समाज बांधवांचे कुळे नसल्याचे समाज बांधवांन मार्फत फोन द्वारे कळविण्यात आले होते ते पुर्ण करण्याचा हा थोटासा प्रयत्न आवृत्ती -२ मध्ये केला आहे, तरीहि चुकुन काहि नावे राहून गेली असल्यास *श्री सतिषजी फुलपगारे यांना *८६२३८०८६८०* या संपर्क करुन कळवावी.

DOWNLOAD  ⬅️भोई समाज कुुुळ यादी

*धन्यवाद*


आपलेच -

भोईसमाज युवा मंच महाराष्ट्र


✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

भोईसमाज युवा मंच महाराष्ट्र च्या विविध उपक्रम तथा कार्यक्रमांच्या माहितीसाठी भोईसमाज युवा मंचच्या ब्लॉग ला आवश्य भेट द्या

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://bhoisamajyuvamanch1.blogspot.com