*भोई समाज युवा मंच महाराष्ट्र व संलग्न संघटना तर्फे आयोजित ऑनलाइन रोजगार मेळावा संपन्न*
आज दिनांक 7 नोव्हेंबर 2021 रोजी भोई समाज युवा मंच महाराष्ट्र व संलग्न संघटना तर्फे भोई समाजातील बेरोजगार युवक युवतींसाठी ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. सदर मेळाव्यात औरंगाबाद पुणे येथील BAJAJ ELE CTRICAL, ENDURANCE,ABD, INVOLUTE व इतर नामांकित कंपन्यांचा सहभाग होता.रोजगार मेळाव्यासाठी 150 युवकांनी नोंदणी केली होती.त्यापैकी आज 30 जणांनी ऑनलाईन मुलाखत दिली.कंपनीतर्फे श्री.योगेश उबाळे सर आणि श्री.आदित्य मोरे (भोई समाज युवा मंच संभाजीनगर जिल्हाध्यक्ष) यांनी मुलाखती घेतल्या.सदर मेळाव्याचे सूत्रसंचालन श्री.किशोर शिवदे सर (प्रदेश उपाध्यक्ष) यांनी केले.कार्यक्रमास प्रदेशाध्यक्ष श्री.तुषार भाऊ साटोटे,महासचिव श्री.निलेश वाडीले,पुणे उपाध्यक्ष विजय इंगळे,नाशिक येथील प्राध्यापक श्री.विजय मोरे सर यांनी शुभेच्छा दिल्या.सदर कार्यक्रमासाठी भोई समाज समाज युवा मंच सर्व कोअर टीम व पदाधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभले.
*जय भोईराज*
*हाक तुमची ✊🏻✊🏻✊🏻*
*साथ आमची 🤝🏻🤝🏻🤝🏻*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
*भोई समाज युवा मंच महाराष्ट्र व संलग्न संघटना*
https://bhoisamajyuvamanch1.blogspot.com