Sunday, October 10, 2021

श्री खंडेराव महाराजांच्या आशिर्वादाने भोईसमाज युवा मंच मालेगाव येथील सन्मान सोहळा चंदनपुरी येथे उत्साहात संपन्न


 🚩 *जय भोईराज* 🚩


श्री खंडेराव महाराजांच्या आशिर्वादाने भोईसमाज युवा मंच मालेगाव येथील सन्मान सोहळा चंदनपुरी येथे उत्साहात संपन्न


भोईसमाज युवा मंच तालुका मालेगाव जि नाशिक च्या वतीने आज श्री खंडेराव महाराज यांच्या पावन भुमी चंदण पुरी येथे  अमेरीका येथे बॅंक अॉफ अमेरीकेत सिनिअर टेक असिस्टंट या पदावर नियुक्ती झाल्या बद्दल तसेच भोईसमाज युवा मंच मॄलेगाव तालुका कार्यकारणीचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता, कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी भोईसमाज महासंघ धुळेचे अध्यक्ष श्री गणेशजी मोरे प्रमुख पाहुणे म्हणुन भोईसमाज युवा मंच प्रमुख ज्ञानेश्वरजी खैरमोडे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री तुषारजी साटोटे, नाशिक जिल्हाध्यक्ष राजेशी मोरे, नाशिक ग्रामिण जिल्हाध्यक्ष सुनिलजी सोपे, नाशिक शहराध्यक्ष गोकुळजी शिवदे, तसेच शिरपुर येथील समाज भुषन सुभाषजी भोई, साप्ता तरुण गर्जना वृत्तपत्राचे मुख्यसंपादक संतोषजी भोई, कवि चित्रकार तथा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री यशवंत निकवाडे सर  मालेगाव येथिल मच्छिमार सोसायटीचे मा चेअरमन सुरेशजी शिवदे, गौरवजी ढोले, श्री धनराज वाडिले भोईसमाज युवा मंच नाशिक शहर सचिव, श्री अनिल शिवदे नाशिक शहर सहसचिव आदि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला सदर कार्यक्रमात कुमारी भाग्यश्रीवर अभिनंदनाचा वर्षाव करतांना भोईसमाजाच्या विविध गावातुन तिचा सन्मान करण्यात आला, तिच्या या कामगिरीमुळे भोईसमाजातील विद्यार्थांना व विद्यार्थीनींना प्रेरणा मिळेल असे मान्यवरांनी सांगितले तसेच भोईसमाज सर्वांगिण विकासाठी व मुलामुली मध्ये भेदभाव न ठेवाता, स्रीभ्रुण हत्या थांबविण्याच्या विशेष मोहिमेसाठी गाव तेथे शाखा स्थापनेची अधिकृत घोषना भोईसमाज युवा मंच प्रमुख ज्ञानेश्वरजी खैरमोडे यांनी केली तसेच भोईसमाज युवा मंचच्या ग्रामिण जिल्हाध्यक्ष पदि श्री विकास खेडकर यांची पदोन्नतीची घोषणा भोईसमाज युवा मंच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तुषार साटोटे यांनी केली तसेच कार्यक्रमाची सांगता करीत आभार भोईसमाज युवा मंच मालेगाव चे नवनियुक्त तालुकाध्यक्ष श्री संजयजी शिवदे यांनी केली, सर्व आयोजक टीम ने विशेष प्रयत्न करुन कार्यक्रम यशस्वी केला.