Monday, May 31, 2021

मुला मुलींच लग्न कसे जमणार.....वधु वरांच्या पालकांनी विचार करण्याची गरज


 

मुलाचं लग्न कधी आणि कसे जमणार

                                 

जरा विचार करा प्रत्येक माय बापाने आणि समाजाने


परीस्थिती गंभीर होत चालली विक्रुती वाढत चालली पळून जावुन प्रेम विवाहाचे प्रमाण वाढले हे फक्त आपल्या अमर्यादित अपेक्षा ठेवून नको ते स्वप्न पाहिल्यामुळे 🙏🏻🤷🏻‍♂️🤥


🔹कमी शिक्षण आहे -👉🏻 नको

🔸पगार कमी आहे -👉🏻 नको

🔹खेड्यात राहतो -👉🏻 नको

🔸स्वतःचे घर नाही -👉🏻 नको 

🔹घरात सासू सासरे आहेत - 👉🏻नको

🔸शेत नाही - 👉🏻 नको 

🔹शेती करतो - 👉🏻नको

🔸धंदा करतो - 👉🏻नको

🔹फार लांब राहतो - 👉🏻नको

🔸काळा आहे - 👉🏻नको

🔹टक्कल आहे - 👉🏻नको

🔸बुटका आहे - 👉🏻नको

🔹फार उंच आहे - 👉🏻नको

🔸चष्मा आहे - 👉🏻नको

🔹वयात जास्त अंतर आहे - 👉🏻नको

🔸तो जिथे राहतो तो एरिया बरोबर नाही- 👉🏻नको

🔹एक नाडी आहे - 👉🏻नको

🔸मंगळ आहे - 👉🏻 नको

🔹नक्षत्र दोष आहे - नको

🔸मैत्रीदोष आहे - 👉🏻नको

सगळ्यालाच नकार देत राहिलात तर *मग लग्न कधी करणार*?🤷🏻‍♂️

संसार कुणाबरोबर करणार ?

आई /  वडील कधी होणार ?

सासू / सासरे कधी होणार?

आजी / आजोबा कधी होणार ?

बरं एवढया सगळ्या कारणांसाठी मुलाला नकार देत असताना मुलींमध्ये अशी कोणती खास गुणवैशिष्ट असतात हे आईवडील सांगू शकतील काय ? अनेक मुलींना संसार कसा करतात हे माहीत नसतं, तडजोड कशी करायची हे माहित नसतं, रोजच जेवण सुद्धा बनवता येत नाही काही मुलींना. मान्य आहे मुली हुशार आहे, शिकलेल्या आहेत, स्वतःच्या पायावर उभ्या आहेत म्हणून तुम्ही त्यांच्यापेक्षा हुशार जावयाची, त्याच्या लठ्ठ पगाराची, त्याच्या प्रॉपर्टीची अपेक्षा ठेवणार त्या अपेक्षा पूर्ण होत नाही म्हणून स्थळांना नकार देत राहणार आणि मुलीचं वय वाढत राहणार... या सगळ्यात नुकसान होतंय ते कमी पगार असलेल्या चांगल्या स्वभावाच्या आणि निर्व्यसनी मुलांचं... ज्यांना मनापासून जोडीदार हवा असतो पण मुलींच्या, त्यांच्या आईवडिलांच्या आणि नातेवाईकांच्या वेलसेटल च्या व्याख्येत ते बसत नाहीत त्यामुळे ते मागे पडतात,

मुलाचा लग्नाच्या वेळेस असलेल्या पगारावर मुलीच्या भविष्याची चिंता त्यांच्या पालकांनी करण्यापेक्षा त्या मुलावर विश्वास दाखवून मुलीच त्याच्यासोबत लग्न करून देण गरजेचं आहे, कारण त्या मुलाचा जो पगार आता आहे तोच भविष्यात राहणार नाही, त्यात दरवर्षी वाढ होत राहणार आहे तसंच लग्न झाल्यावर त्या मुलाला पण त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी, भरारी घेण्यासाठी नवीन उत्साह, उमेद, बळ मिळणार आहे आणि पगार चांगला आहे म्हणजे मुलगी सुखी राहील हा एक गैरसमज आहे, भविष्यात काय होईल हे कोणालाच माहिती नसतं, त्यामुळे राजाचा रंक आणि रंकाचा राजा होऊ शकतो.

हल्ली लग्न म्हणजे मुलामुलींपेक्षा त्यांच्या आईवडिलांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी स्टेटस सिम्बॉल चा विषय झालेला आहे.

माझा जावई डॉक्टर, इंजिनीअर, MBA, C A, MCA आहे हे सांगण्यात, एवढं लाखाचं पॅकेज आहे हे सांगण्यात पालकांना मोठेपणा वाटतं आहे आणि तसं स्थळ मिळावं यासाठी प्रत्येक मुलीचा, मुलीच्या आईवडिलांचा आणि नातेवाईकांचा प्रयत्न असतो, पण सर्वांनीच अशा अपेक्षा ठेवल्या तर बाकी मुलांनी करायचं काय ? त्यांची लग्न कशी होणार हा प्रश्नच आहे.

जेव्हापासून लग्नात माणसापेक्षा शिक्षण, पैसा, प्रॉपर्टी याला जास्त महत्व आलंय तेव्हापासून नवरा बायको मध्ये भांडणाचं आणि घटस्फोट होण्याचं प्रमाणही वाढलंय हे सत्य विसरून चालणार नाही.

लग्नात भौतिक सुखांपेक्षा मानसिक सुखाची, आधाराची, समजूतदार पणाची जास्त गरज असते.


पुढच्या जन्मात मनुष्य देह मिळेल  की नाही माहिती नाही,

स्वर्गातून भगवंत नेहमी तथास्तु म्हणत असतो.

आणि आपण सगळ्याच गोष्टीत नकारात्मकता ठेवून या जन्मातला  सगळा अर्थच संपवून टाकतोय.


आईवडिलांनी आपल्या मुलाचा / मुलीचा सुखाचा विचार जरूर करावा,

पण तो करताना त्यांच्या वाढत जाणाऱ्या वयाचं आणि निघून चाललेल्या वेळेचं भानही आईवडिलांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी ठेवायला हवं, कुठेतरी थांबायला हवं आणि अपेक्षांवर अडून न बसता तडजोड करून पुढे जायला हव, कारण अपेक्षा या कधीच न संपणाऱ्या असतात...🙏🏼

आपल्या ची लाभेल साथ तरच शक्य होईल समाज विकास..अंती अपेक्षा ही विवाह जमविण्यासाठी घातक ठरत आहे.. प्रत्येक पालकाने, विवाह इच्छुकांने यांचा विचार करावा ..हि काळाची गरज आहे..🙏🙏🙏🙏🙏


हे लिखाण माझे नाही पण लिहीना-यास सलाम


सौजन्य:भोई समाज युवा मंच महाराष्ट्र

Saturday, May 29, 2021

जागतिक स्तरावर भोईराजाचा डंका....

 





जागतिक स्तरावर माझ्या भोईराजाचा सन्मान

नंदूरबारचे किरण रामदास निकवाडे यांनी बनवली मोटार विना कार
त्यांनी जागतिक दर्जाच्या Da Vinci codex 3D Design Challenge स्पर्धेत विजय मिळवला.या स्पर्धेत त्यांनी self propelled car ( Car without Motor) हे मॉडेल बनवून पहिल्या पाच मध्ये स्थान मिळवले.

भोई समाज युवा मंच महाराष्ट्र कडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन
💐💐💐💐💐
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻

सविस्तर माहिती वाचा...

👇👇👇👇

सर्वांना नमस्कार,


तर माझी कथा अशी आहे,


मला गाड्या आवडतात आणि लहानपणापासूनच त्यांनी मला नेहमीच भुरळ घातली. जेव्हा मी लहान होतो तेव्हा लिओनार्डो दा विंची मला प्रेरणा देते कारण तो खूपच कल्पक होता. त्याने नोटबुकमध्ये त्यांच्या शोधासाठी चित्र काढले. त्याने पॅराशूट, हेलिकॉप्टर आणि बरेच काही शोध लावले.


LinkedIn वरचे पोस्ट वाचल्यानंतर Leonardo da vinci 3d design challenge मध्ये भाग घेतला. हे चॅलेंज 3DExperience Lab यांनी आयोजित केले होते , ज्यामध्ये दा विंचीच्या विविध मूळ रेखाचित्रांचे 3 डी मॉडेल डिझाइन करावे लागेल.


लिओनार्डोची "सेल्फ प्रोपेल्ड कार्ट" मॉडेल तयार करण्यासाठी मी Catia V5 सॉफ्टवेअर वापरुन काय केले ते येथे सामायिक करू इच्छित आहे. मी हे रेखाचित्र निवडतो कारण मला नेहमी ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी काहीतरी तयार करायचे किंवा डिझाइन करायचे होते.

https://youtu.be/DZrGgWumvOs

मोटार नसलेली मोटार!

कार्ट / कारमध्ये कारच्या फ्रेमच्या आत दंडगोलाकार, ड्रम-सारख्या कॅसिंग्जमध्ये असलेल्या कोईलिड स्प्रिंग्ज चालविल्या गेल्या.यात ब्रेकिंग आणि प्री-प्रोग्राम करण्यायोग्य स्टीयरिंग सिस्टम देखील समाविष्ट होते. मशीनमध्ये विंड-अप टॉयसारखे कार्य केले गेले,आतमध्ये स्प्रिंग्स वारे करण्यासाठी आणि त्यास शक्ती देण्यासाठी चाके फिरवत. कारमध्ये प्रोग्राम करण्यायोग्य स्टीयरिंग देखील होते पूर्व-सेट ठिकाणी गीअर्स दरम्यान लाकडी अवरोध करून डिझाइन केलेले आहे, जरी ते फक्त उजवीकडे वळवू शकते. 


या महान स्पर्धेच्या 5 विजेत्यांपैकी असण्याचा मला खूप आनंद आणि सन्मान आहे.


जय भोईराज


Friday, May 28, 2021

परमेश्वरास पत्र......

 


परमेश्वरास पत्र


सर्व संकटमोचक देवा,

श्रद्धेय दंडवत 


 जग कोरोना संकट मुक्त होणे बाबत...

  

हृदयस्त देवा,

  मी एक श्रद्धावान भक्त आपणांस हृदयापासून विनंती करीतो की,मी माझा आजी, आजा कडून, पुर्वजाकडून, महान ग्रंथांमधून ऐकून आणि वाचून आहोत कि तु सर्व शक्तिमान आहेस.उत्पत्ती, स्थिती, आणि लय याला तु जबाबदार आहे.तु अनेक  राक्षसांना मारले.(कंस,चाकूर,जरासंध,शिशुपाल ,पुतना मावशी ई)अशा शेकडो राक्षसांच्या तु नायनाट केलेला आहे.जगावर जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा तु धावून आला आहेस.कौरवांचा पाडाव असो,द्रौपदीचे वस्त्रहरण असो,द्रोणावती पर्वत उचलून लोकांचे महाप्रलयापासून संरक्षण  करणे असो,  कालिया नागापासून संरक्षण असो या आणि अशा शेकडो समस्येपासून  जगाला भयमुक्त  केलेले आहे.आज पुन्हा एकदा पुर्ण जग एका राक्षसाच्या भितीने बिथरलेला आहे.तो म्हणजे "कोरोणा".या राक्षसाने आता पर्यंत लाखो लोकांचे प्राण घेतले.असंख्य  लोकांना बेरोजगार केले.अनेक  कुटुंब उद्ध्वस्त केले.घरातले अनेक कर्त्या पुरूषांना जग सोडावे लागले.कुणाच्या भाऊ,कुणाची बहिण,कुणाचे आईवडील, कुणाच्या पती ,कुणाची पत्नी या जगाला सोडून गेले.अनेक परीवार उघड्यावर आले.शिक्षणाची पण पुर्ण  दयनीय अवस्था झाली.अर्थ व्यवस्था पण ढासळली .दवाखाने या राक्षसाच्या दृष्ट चक्रात गच्च भरलेले आहेत. पुर्ण  हाहाकार माजलेला आहे.प्रत्येक घरातील एक एक बळी घेतल्याशिवाय  जाणारच नाही जणूकाही असा हट्टच कोरोणा या राक्षसाने केलेला आहे अस  वाटत आहे.संवाद हरवला,प्रेम दिसत नाही,माणूसकी हरवली.कोरोना एकटाच आला त्याने त्याच्यासोबत अशी भाऊबंदकी सोबत आणलेली आहे.या राक्षसाच्या मुक्तीचे सर्वच मार्ग बंद झालेले आहेत. अशा वेळेस तु वर्षानुवर्ष अनेक संकटातून जगाला मुक्त  केलेले आहेस.तु सर्व  शक्तिमान आहेस.आता फक्त तुझाकडूनच आस आहे.तुच आमची मनोकामना पुर्ण करशील.तु या संकटातून जगाला मुक्त  कर, देवा.तु आतापर्यंत तुझा देवदुतांच्या माध्यमातून जग वाचवण्याचा प्रयत्न करतच आहे.लाखो ,करोडो लोकांच्या मनातली भीती दुर कर,पण आता तुझा चमत्कार दाखविण्याची वेळ आलेली आहे.तुझावरच्या विश्वास हृद्धिंगत करण्याची वेळ आली आहे.अजूनतरी तुझ्यावर लोकांच्या  विश्वास आहे.नाहीतर  लोकांच्या तुझावरच्या विश्वास उडून जाईल. तु लवकरच या संकटातून आम्हाला बाहेर  काढशील.पुन्हा आनंद जगात आणशील. सौख्य,शांतता  नांदू दे!अशी माझ्यासह तमाम श्रद्धावानांची हृदयापासून कळकळची विंनतीसह खात्रीआहे.


                      तुझाच

                    एक श्रद्देय

             श्री.यशवंत निकवाडे

              प्रसिध्द कवी,लेखक,चित्रकार

Monday, May 24, 2021

संत भिमा भोई जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा

 


संत भिमा जयंतीनिमित्त भोई समाज युवा मंच पारोळा तर्फे रक्तदान शिबिर आयोजन...

 


भोई समाज युवा मंच पारोळा आणि श्रीराम  मित्र मंडळ पारोळा तर्फे संत भिमाभोई जयंती निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे..

कोरोना काळात रक्ताचा तुटवडा भासत असून जास्तीस जास्त रक्तदात्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन भोई समाज युवा मंच तालुकाध्यक्ष मयूर भोई  यांनी केले आहे.....



Sunday, May 23, 2021

भोई समाज जाती व उपजाती वधु वर ऑनलाइन परिचय मेळावा उत्साहात संपन्न....

 


भोई समाज युवा मंच महाराष्ट्र शाखा विदर्भ व संलग्न संघटना आयोजित भोई समाज जाती व उपजाती वधु वर ऑनलाइन परिचय मेळावा उत्साहात संपन्न....*


आज दिनांक 23 मे 2021रोजी भोई समाज युवा मंच महाराष्ट्र विदर्भ शाखा व संलग्न संघटना आयोजित वधुवर परिचय मेळावा अतिशय उत्साहात व खेळीमेळीत संपन्न झाला.या कार्यक्रमाचे  अध्यक्ष म्हणून युवा मंच प्रमुख ज्ञानेश्वर खैरमोडे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कवी यशवंत निकवाडे सर,ज्येष्ठ समाजसेवक सतिशजी फुलपगारे,सुरेशजी मोरे साहेब,देविदास ढोले साहेब,कहार संघटना अध्यक्ष जालिंदर पंडोरे, केवट संघटनेचे दिलीप परसाने,गुजरात संघटनेचे किरण तावडे,शिरपूर येथील दिपक भोई,प्रदेशाध्यक्ष तुषार साटोटे तसेच युवा मंच सर्व पदाधिकारी,विवाह इच्छूक सर्व वधु वर तसेच त्यांचे पालक उपस्थित होते.हा मेळावा GOOGLE MEET या अँपवर घेण्यात आला.तसेच कार्यक्रमाचे Youtube वर live प्रक्षेपण करण्यात आले होते.ऑनलाइन वधु वर परिचय साठी जवळपास 150 वधु वरांनी सहभाग घेतला होता.ह्या संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष चेतन मोरे सर यांनी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदेश उपाध्यक्ष किशोर शिवदे सर यांनी केले.

सर्वांत शेवटी विदर्भ विभाग अध्यक्ष श्री नंदकिशोर धारपवार यांनी उपस्थित सर्व पाहुण्यांचे,वधु वरांचे व सहभागी पालकांचे आणि कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या पदाधिकारी यांचे आभार मानले...


*जय भोईराज*

कार्यक्रम पुन:प्रसारण पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.


https://youtube.com/channel/UCvpMi7_XAYunaRhMJ1Z6WlA


*सदैव आपलेच*


*भोई समाज युवा मंच महाराष्ट्र*

*सर्व संलग्न संघटना*

Tuesday, May 11, 2021

आपल्या माणसाकडून मिळणारे दु:ख जास्त वेदनादायक...

 


आपल्या माणसाकडून  मिळणारे दु:ख जास्त  वेदनादायक


मानवी संसार पुर्ण सुख दु:खांनी भरलेला आहे.जीवनात सुख -दु:ख येतात, जातात. अनेक संकटांना आपण सहज सामोरे जातो.त्यांच्या काही एवढा त्रास पण करून घेत नाही.जगाने दिलेला त्रास, दु:ख  आपण सहन करू शकतो पण, आपल्या जवळच्या माणसाने दिलेला त्रास, दु:ख सहन करण्यापलीकडे असते.

एकदा लोखंड आणि सोने यांच्यात संवाद सुरू झाला.सोने लोखंडाला म्हणते तुलापण लोखंडाचा मार मिळतो तेव्हा  तु घडतो,मलाही लोखंडाच्या मार मिळतो आणि मला पण  आकार प्राप्त  होतो ,पण जेव्हा तुला मारले जाते तेव्हा तु मोठ्याने   किंचाळतो  आणि मला मार मिळतो तेव्हा  माझा आवाज पण येत नाही त्यावर लोखंडाने सोन्याला उत्तर दिले ,जेव्हा जग दुख देते  ,तेव्हा काही  वाटत नाही  पण जेव्हा आपलाच जवळचा    आपल्याला दु:ख  देतो तेव्हा मात्र खुप त्रास  होतो

म्हणून  मित्रहो, आपल्या जवळच्यापासून  सावध रहा


कलीयुग के जमानेमे कौन  किसका होता है। 

तकलीफ वो ही देता है, जो ज्यादा नजदीक होता है।


         शब्दांकन -यशवंत निकवाडे

 बालाजीनगर ,शिरपूर


Monday, May 10, 2021

दोष आपलाच, पण आपण दोष दुसर्‍यात पाहतो...

 


दोष आपलाच, पण आपण दोष दुसर्‍यात पाहतो


मानवी स्वभाव गुण आहे कि आपण जे करतो तेच खरे आहे .आपण जे बोलतो तेच बरोबर  आहे.आपण जे वागतो तेच  योग्य आहे.समोरच्याच  वागणं,बोलण,चालणं याला सर्व  चुकीचेच वाटते.जे पण काही दोष असतील  समोरच्या  व्यक्तीमध्येच आहेत. माझात अजिबात  दोष नाही. पण परिस्थिती नेमकी उलटी असते दोष  तर याच्यातच असतात पण त्याला स्वतःचे दोष  दिसत नाही.त्याला समोरचा व्यक्तीच दोषी दिसतो.

एकदा पती -पत्नीचा सुखी संसार  चालू होता.वय  वाढत गेल्यामुळे अनेक  शारीरिक  समस्या निर्माण व्हायला लागल्यात. पतीला वाटलं आपल्या पत्नीला ऐकू येत नाही म्हणून डॉक्टरांच्या सल्ला घ्यावा अस ठरवलं. पती  डॉक्टरांकडे गेले ,डॉक्टरांना  विचारले ,डॉक्टर साहेब  पत्नीला ऐकू येत नाही, काय कराव?डॉक्टर  म्हणाले,20 फुटावरून  आरोळी द्यावी,तरीपण  ऐकू येत नसेल तर 15फुट,  10फुट   5फुट अंतरावर थांबून  आरोळी द्यावी.पती  घरी  आला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पत्नीला 20 फुटावरून  आरोळी दिली,अहो कारभारणी  भाजी काय केली? पत्निला ऐकू आले  नसेल म्हणून 15 फुट,10 फुटावरून,5 फुटावरून आरोळी दिली.शेवटी अगदी जवळ जाऊन  विचारले,अगं मी तुला  केव्हाचा विचारतो आहे ,तु काही  उत्तरच देत नाही.तेव्हा पत्नी म्हणाली अहो तुम्हाला 17 वेळा ओरडून ओरडून सांगितले भजीची आमटी  केली म्हणून 

तात्पर्य हेच की तो स्वतःच बहिरा आहे आणि पत्निला  बहिरा समजत आहे

दोष आपलाच असतो पण आपण दुसर्‍यालाच दोषी समजतो


    पल पल जलना पडता है

तब पता चलता है,पितल है या सोना।

समझदारी वही होती है

दुसरो को दोष  देने से पहले ,खुद को परखना।


          शब्दांकन -श्री.यशवंत निकवाडे सर

 बालाजीनगर, शिरपूर

Sunday, May 9, 2021

काळ आधार देण्याचा... गम्मत बघण्याचा नाही

 



काळ  आधार देण्याच्या...

      गम्मत बघण्याचा नाही


कोरोनामुळे परीस्थिती गंभीर  झालेली आहे.परिवारातील अनेक कर्ते पुरूष  जग सोडून जात आहेत.अनेकजण  दवाखान्यात रुग्णशय्येवर पडून आहेत. कुणाला बेड  भेटत नाही  कुणाला ऑक्सिजन मिळत नाही.इंजेक्शन साठी पळापळ सुरू  आहे.हि सर्व  परीस्थिती आपण अनुभवत आहोत. अशा वेळेस आपण माणूसकिचे दर्शन दाखवत  आपल्या परीने जी शक्य होईल ती मदत केली पाहिजे.देशातील मोठे उद्योगपती रतन टाटा देवासारखे धावून आले.त्यांनी पहिल्या 1500 कोटी  व आता 2000 कोटी रू.ची  मदत  केली.अशा माणसाची  निश्चित इतिहासात  नोंद  घेतली जाईल. आपला देश खूप मोठा आहे.फक्त  बोटावर मोजता येतील एवढेच लोक मदत करतांना दिसत आहेत. काही माणसं फक्त  दुरून गम्मत बघत आहेत. अशा संकट समयी आपण  बाधितांना आधार  दिला  पाहीजे.आज लोकांना आधाराची खुप गरज आहे.अशा  प्रसंगी आपण शांत राहून गम्मत पाहणे योग्य नाही.कर्मयोगींची इतिहासात नोंद होते,गम्मत पाहणाऱ्यांची नाही.

 एका जंगलाला भयंकर  आग लागली. एक चिमणी आपले अंग  ओले करून  आग विझवण्याचा प्रयत्न करत होती.कावळा दुरून  चिमणीची गम्मत बघत होता.कावळ्याने चिमणीला विचारले तुझा एवढस्या प्रयत्नाने आग कशी विझेल.तेव्हा चिमणीने अतिशय सुंदर उत्तर दिले,माझा छोट्या प्रयत्नाने जंगलाची आग विझेल कि नाही माहीत नाही. पण जेंव्हा इतिहास लिहला जाईल तेव्हा माझ्या कार्याची नोंद घेतली जाईल. दुरून तमाशा पाहणाऱ्यांची  नाही.


तात्पर्य-संकट समयी लोकांना आधाराची गरज आहे.म्हणून गम्मत पाहू नका तुम्हाला जशी मदत शक्य आहे तशी करा

   

 कोयल अपनी कुक से,

 पेड अपने फल से,

खेत अपने उपज से,

और इंसान  अपने कर्मो से

जाना जाता है।

म्हणून काम करत  रहा,लोकांना  सहकार्य करा, आधार द्या,गम्मत बघू नका

कारण 


      बात उन्ही की होती है,

   जिनमे कोई बात  होती है।


     शब्दांकन- श्री.यशवंत निकवाडे

                    (लेखक: प्रसिध्द कवी,चित्रकार आहेत )

Saturday, May 8, 2021

भोई समाज युवा मंच आयोजित वधु वर मेळावा

 


🚩 जय भोईराज 🚩

राष्ट्रीय संत भिमा भोई यांच्या जयंती निमित्त


      भोई समाजाचा भुतो न भविष्य घडनारा एक अभिनव उपक्रम


भोई समाज जाती व उपजाती ऑनलाईन वधु - वर परीचय मेळावा



*रविवार दि .२३ मे २०२१ रोजी सकाळी ठिक ११.०० वा झूम अँपवर*


✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻

*मुख्य आयोजक - भोई समाज युवा मंच विदर्भ व सलंग्न संघटना*



          सर्व समाज बांध‌व व पालकांना *मानाचा जय भोईराज* कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे कि सर्व समाज बांधव यांच्या आग्रहास्तव *भोईसमाज युवा मंच महाराष्ट्र* व *सलंग्न संघटना* आपल्या सेवेत ऑनलाईन वधु वर परीचय  मेळावा आयोजित करीत आहे.हि नोंद मोफत असुन सर्व पालक व समाज बांधवांनसाठी खुली असेल चला तर मग जाणुन घेऊया नोंदणी कशी करावी.


👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻


*नोंदणीसाठी कृपया खाली दिलेल्या मार्गाचा अवलंब करावा :-*


१.  खाली दिलेल्या गुगल लिंकवर जाऊन आपली माहिती भरावी.


https://forms.gle/9ZxGjnPvKGiBuSKJ9


२. अधिक माहितीसाठी संपर्क- 


श्री किशोर शिवदे - +91 94047 61567

श्री संजय इंगळे - +91 88880 66486

श्री जालीदंर श्रीधर पंडोरे 9890318517

श्री दिलिप परसने- 9970457534

श्री निलेश साटोटे- 9975054010

श्री जयेश भोई - 7028119483

श्री कुंदन डिंबर 9270976456




*काहि महत्वपुर्ण सुचना आपल्या सर्वांच्या हितासाठी* 

१. वधु किंवा वर यांच्या परीचयाची माहिती हि पालकामार्फत किंवा त्यांच्या परवानगीनेच पाठवावी.


२. संपर्क क्रमांक पालकांचाच असने बंधनकारक आहे वधु अथवा वरांना विनंती आहे कि परीचयात स्वःताचे संपर्क नंबर देऊ नयेत.


४. कृपया परीचय पाठवितांना अनअोळखी व्यक्तीचे परीचय पाठवु नये शहानिशा करतांना आढळुन आल्यास तो परीचय नोंद केली जाणार नाहि.


५.वधु वर परिचय नोंदणी पूर्णपणे मोफत आहे याची सर्व समाज बांधव यांनी नोंद घ्यावी.


६.वधु वरांची खरी माहिती देणे   ही प्रत्येक पालकांची जबाबदारी आहे.


७.नोंद झालेल्या वधु वर स्थळांची सत्यता तपासणी ही वधु वर पालकांची वैयक्तिक जबाबदारी आहे, याची नोंद घ्यावी.भविष्यात कोणताही प्रश्न उपस्थित झाल्यास त्यास संघटना जबाबदार राहणार नाही.


८.नाव नोंदणी केल्यावर विवाह जमेलच याची खात्री संघटना देउ शकत नाही.


९.वधु वर यांच्या माहितीचा कोणीही गैरवापर करू नये.तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


१०.आपला विवाह जुळून आल्यास तसे आमच्या पदाधिकारी यांना कळवावे 


११.वरील नियम व अटी मध्ये बदल करण्याचा अधिकार भोई समाज युवा मंच महाराष्ट्र ने राखून ठेवला आहे.


१२.नोंदणी झालेल्या वधु वरांची पुस्तिका (pdf) सर्वांना शेयर करण्यात येईल.


*संघर्ष के मार्ग पर जो वीर चलता हैं,*

*वो ही इस संसार को बदलता हैं,*

*जिसने अन्धकार, मुसीबत और ख़ुद से जंग जीती,*

*सूरज बनकर वही निकलता हैं।*


🌅🌅🌅🌅🌅



 *टीप:*

*दिलेल्या सुचनांचे काटेकोर पणे पालन करुन सहकार्य करावे.*



आपलेच- 

भोईसमाज युवा मंच महाराष्ट्र

व सलंग्न संघटना

*

भोईराज युवा प्रतिष्ठान शिरपुर

कहार(भोई) समाज संघटना, महाराष्ट्र राज्य

केवट ( भोई) समाज महासंघ महाराष्ट्र राज्य


Website:


https://bhoisamajyuvamanch1.blogspot.com

Saturday, May 1, 2021

भोई समाज जाती व उपजाती कुळ यादी लोकार्पण




 🚩 जय भोईराज 🚩


आनंद क्षण


      शेवटी तो दिवस उजेडला ज्या दिवसाची ख-या अर्थाने वाट पहात असणारी व्यक्ति म्हणजे 

श्री सतिषजी फुलपगारे गेल्या सहा महिण्यान पासुन कार्यान्वित असणा-या कार्याला म्हणजेच "भोईसमाजाची कुळ यादिला".

कुळ यादि काहिश्या प्रमाणात अपुर्ण असतांना श्री सतिषजींनी बऱ्याच भोई समाज गृप वर  शेअर केली,त्या यादि वर चर्चा करतांना असे लक्षात आले कि, काहि आडनावे सुटलीत तेव्हा सतिषजींना सांगितले तेव्हा ते थोडे निराश होते कारण,त्याच्या या कार्याची हवी तशी दखल कुणी घेत नव्हतं आणि त्यांनी पण तो विषय सोडुन दिला होता परंतु "भोईसमाज युवा मंच" मार्फत त्यांना सहाय्य करु, असे सांगुन ती पुर्ण करण्याचे विनंती केली. सेवा निवृत्त व जेष्ठ असल्या कारणाने हि यादि पुर्णत्वास येईल याची त्यांना खात्री नव्हती परंतु *युवकांची साथ लाभल्यास* कुठलेहि काम अशक्य नाहि हे पटवुन दिले,असता हे कुळ यादिचे काम आज समाजार्पन करीत आहोत याचा आनंद आहे.













        भोईसमाज युवा मंच महाराष्ट्र भोईसमाजाच्या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन एक ना एक दिवस नक्कीच सोन्याची सकाळ दाखवेल अशी त्यांनी प्रतिक्रीया दिली, भोईसमाज युवा मंच महाराष्ट्र व सलंग्न संघटनाच्या वतिने आनखि एक उपक्रम समाजास सोपवत आहोत हे भाग्यच समजतो.

        भोईसमाज कुळ यादि बघताच सर्व भोईसमाज कसा एक दिसतो! हे पहाण्या जोगे आहे आणि लवकरच तो सुवर्णक्षण आपल्या सर्वांच्या सहकार्याने पहावयास मिळेल असे आश्वासन देतो.


जय भोईराज...!


हाक तुमची........

     साथ आमची......


भोईसमाज युवा मंच महाराष्ट्र