Saturday, October 24, 2020

भोई समाज युवा मंच जिल्हाध्यक्ष प्रदीप भानारकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा


 प्रेस नोट.दि.22/10/2020,



एक अभिनव उपक्रम  भोई समाज युवा मंच यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रदिप नागोराव भनारकर,यांच्या  वाढदिवसा निमित्त भिक्षाधारी स्त्री शक्ती चा सन्मान !

 पांढरकवडा : दिनांक 22/10/20रोजी केळापुर मंदिरा समोर बसून भिक्षा मागून उपजीविका चालवणाऱ्या वृद्ध महिलांची ओटी भरून साडी चोळी व मास्क चे केले वाटप ऐका महिलेने केले  सामाजिक कार्यकर्ते प्रदिप नागोराव भनारकर जिल्हा अध्यक्ष भोई समाज युवा मंच यवतमाळ व ग्राहक प्रहार संघटनेचे तालुका प्रचार प्रमुख व युवा फाउंडेशन केळापूर चे अध्यक्ष सर्व सामान्य जनतेची बुलंद आवाज युवकांचे प्रेरणास्थान सामान्य परिवारातून सामाजिक क्षेत्रात  निस्वार्थपणे कार्य सक्रियतेने करत असून यांच्या वाढदिवसा निमित्त सर्व मित्र परिवार यांच्याकडून एक छोटासा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला आहे.  त्या निमित्य कार्यक्रम ग्राहक प्रहार संघटनेचे जिल्हा सचिव  प्रसाद नावलेकर अभय निकोडे बापू पारशिवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला . केळापुर येथील मित्र परिवार लोकमत चे वार्ताहर गणेश अनमुलवार ,रोशन मसराम ,विजय कोहचाडे ,सूरज पाटील, आकाश वहिले ,अजय शिवरकर ,आशु  चव्हाण ,अभी तोडसाम ,नितीन मडावी  ,उमरी येथील सहकारी  निलेश विभिडकर निरज गुरनुले प्रेम कोहळे संतोष पेंदोर हे उपस्थित  विश्वस्त मंडळाचे काशिनाथ शिंदे चे मौलाचे सहकार्य लाभले .  प्रसाद नावलेकर,  अभय नीकोडे,डॉ.निलेशजी परचाके,रामभाऊ जिड्डेवार, निलेश विभिडकर नीरज गुरूनले आदींनी प्रदीप भनारकरचा वाढदिवस आगळा वेगळा साजरा केल्याने परिसरात कौतुक केल्या जात आहे.

भोई समाज युवा मंच तर्फे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन💐💐💐💐

Wednesday, October 7, 2020

भोई समाज युवा मंच पारोळा तर्फे विविध मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन...



भोई समाज युवा मंच पारोळा तर्फे  आरक्षण व विविध मागण्यांसाठी तहसीलदार अनिल गवांदे यांना  निवेदन देण्यात आले.



निवेदन देताना जयेश भोई (भोई समाज युवा मंच जळगाव जिल्हा संघटक प्रमुख) मयुर भोई (भोई समाज युवा मंच तालुका अध्यक्ष) 

गौरव भोई ( भोई समाज युवा मंच तालुका सचिव)

  भोई समाज हा अत्यंत गरीब समाज असुन महाराष्ट्रातील समाजाची लोकसंख्या ४०लाखाच्या जवळपास आहे

समाजाला मुख्यप्रवाहात आणण्यासाठी भोई समाजाला  आरक्षण फार गरज आहे.

भोई समाजातील ९० %  लोक  पोटापाण्यासाठि  गावोगावी भटकंती करीत असता  आणि या समाजाला संविधान तरतूदीनुसार 

आरक्षणाचा सहारा  मिळाल्यास 

भोई समाजाला न्याय मिळु शकेल

१९७४ भोई समाजाला भटक्या विमुक्त जातीचे तुटपुंजे आरक्षण देण्यात आले परंतु त्यातही ३५ जातींचा समावेश करण्यात आला भोई समाज वर अन्याय झाला असुन या समाजाला मुख्यप्रवाहात येण्यासाठी आरक्षणाची  नितांत गरज आहे.तरी या मागण्या गांभिर्याने व विचार करावा.

प्रमुख मागण्या

१) महाराष्ट्रातील भोई समाजाला अनुसूचित जाती अथवा  जमातीच्या एस सी  किंवा एस टी च्या सवलती मिळाव्यात

२)तलाव ठेके फक्त भोई समाजालाच देण्यात यावे

३) महाराष्ट्रातील मत्स्योदयोग विकास मंडळाचे नाव मत्स्योसहार करावे.

४) भोई समाजाच्या गरीब विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्हा व तालुका स्तरावर शासकीय होस्टेलची  व्यवस्था करण्यात यावी. आणि सर्व विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळावी 

५) फ्रुटपथावर बसुन  चणे फुटाणे विकणारे समाज बांधवांना स्टॉल उपलब्ध करून द्यावे.

६) धरणामुळे डांगरवाडी धारक विस्थापित झाल्यामुळे त्यांना प्रकल्पग्रस्त  घोषित करुन शासनाकडून  उदरनिर्वाह करीता भुमीहीन प्रमाणे कमीत कमी ५ एकर सरकारी जमीन द्यावी 

७) भोई समाजाला मुख्यप्रवाहात आणण्यासाठी उद्योग व्यवसायात  कर्ज व सबसिडीच्या योजना  आणाव्यात.

८) भोई समाजातील मुलींना १० वी पर्यंत शिक्षणाचा मोफत लाभ मिळावा  ....

उपस्थित .किरण भोई . सचिन भोई. सागर भोई. नंदकिशोर भोई.प्रविण भोई. चेतन भोई .विशाल भोई . विनायक भोई विशाल प्रकाश भोई रवि भोई हिलाल भोई कोमल पाटील गणेश बारी अश्विन चौधरी योगेश चौधरी .व भोई समाज युवा मंच पारोळा तालुका व जळगाव जिल्हा संघटना पदाधिकारी

हाक तुमची ✊✊✊

साथ आमची🤝🤝🤝

भोई समाज युवा मंच महाराष्ट्र